Mtv News Marathi

Mtv News Marathi News

15/06/2023

*सत्ताधाऱयांच्या दबावाखाली संरक्षणाची गरज नसणाऱयांना ठाणे पोलीस पुरवतात संरक्षण*
*आनंद परांजपे यांचा आरोप*

ठाणे (प्रतिनिधी)- ज्यांना धमकी आलेली आहे किंवा नाही, याची शहानिशा न करताच ठाणे पोलीस आयुक्तालयाने शेकडो जणांना पोलीस संरक्षण पुरविले आहे. जे पुढारी लोकप्रतिनिधीच्या कोणत्याही परिभाषेत समाविष्ट होत नाहीत. जे नोकर सत्ताधाऱयांच्या घरातील भाजी आणण्याचे काम करीत आहेत; त्या आणि सत्ताधाऱयांच्या स्वीय सहाय्यकांसह ज्यांना संरक्षणाची गरज नाही; अशा लोकांना पोलीस संरक्षण पुरवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या अंगरक्षकांना फुलांचे गुच्छ पकडण्यास लावत आहेत. तसेच, त्यांना चक्क मिठाई आणण्यासाठी दुकानात पाठवले जात आहे. अशा पद्धतीने हे सत्ताधारी ठाणे पोलिसांचा अपमान करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला.
100 पेक्षा अधिक लोकांना जी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. त्याची यादी ठाणे पोलिसांनी जाहीर करावी, असे आवाहन बुधवारी अजितदादा पवार यांनी केले. याबाबत अधिकृत माहिती जगजाहीर व्हावी, यासाठी आनंद परांजपे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज केला आहे. या बाबत माहिती देताना त्यांनी सदर आरोप केले.
ते म्हणाले की, कुठल्याही निकषानुसार पोलीस संरक्षणासाठी पात्र ठरत नाहीत, अशा लोकांनीही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. अगदी स्वीय सहाय्यकांच्या दिमतीला कार्बाईनधारक दोन पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. घरातील भाजीपाला खरेदीसाठी जाणाऱया नोकरालाही पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले आहे. पोलीस संरक्षण ज्यांना पुरवण्यात आलेली आहे. त्यांची यादी अत्यंत धक्कादायक असल्याने ठाणे पोलीस ती यादी देणार नाहीत. त्यामुळेच आपण माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन ही सर्व माहिती मागवलेली आहे. 1 जून 2022 पासून ठाणे आयुक्तालयात जे-जे लोकप्रतिनिधी-केंद्रीय मंत्री,खासदार, राज्यातील मंत्री, आमदार असतील; यांच्या व्यतिरिक्त माजी लोकप्रतिनिधी, व्यावसायिक व इतर लोक यांना सुरक्षा पुरवण्यात आली असेल तर त्याची तपशीलवार माहिती आपण मागवली आहे. त्यासाठी किती मनुष्यबळ लागत आहे; ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, त्यांनी सुरक्षेसाठी अर्ज केला होता का? संबधित व्यक्तीला खरोखर धमकी आली होती का किंवा तसा अहवाल राज्य गुफ्तवार्ता विभागाने सादर केला आहे का? तसेच, हे संरक्षण सशुल्क की विनाशुल्क पुरविण्यात आले आहे का? अन् हे संरक्षण सशुल्क असेल तर किती जणांनी हे शुल्क अदा केले आहे? कोणाकोणाचे शुल्क जमा करण्यात आलेले नाही आदी स्वरुपाची माहिती आपण ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे मागवली आहे.
पोलीस संरक्षण ज्यांना पुरवण्यात आले आहे; त्यांच्यामध्ये काही व्यावसायिकही आहेत. त्यांचे व्यवसाय स्वच्छ की 'काळे' हे सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच आपण ही माहिती मागवली आहे. जर, ही माहिती दिली नाही तर आपण कायदेशीर मार्गांचा अवल़ंब करु! कारण, हा जनतेचा कररुपातून जमा झालेला पैसा आहे. त्यातूनच पोलिसांचे पगार होत आहेत. ज्यांना सुरक्षेची गरज नाही. अशा लोकांना संरक्षण देण्यात येत असून प्रत्यक्ष शुल्क अदा करणाऱयांची सुरक्षा काढण्यात येत आहे, अशी टीकाही आनंद परांजपे यांनी केली.

आजमितीला ठाणे आयुक्तालयातील सुमारे 600 पेक्षा अधिक पोलीस हे संरक्षणासाठी पुरवण्यात आलेले आहेत. अनेक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी दबक्या आवाजात मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत आहेत. विशेष शाखेने अनेक पोलिसांना सुरक्षा कामी तैनात केले असल्याची खंतही हे पोलीस अधिकारी खासगीमध्ये व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रिद धारण केलेले पोलीस खरी माहिती देतील, अशी अपेक्षाही आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.

*शुल्क भरुनही सुरक्षा नाकारली*
*उर्वरित पैसे परत करण्यासही टाळाटाळ*
धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सुरक्षा पुरवण्यासाठी अर्ज केला होता. त्यापोटी त्यांनी 4 लाख 79 हजार 668 रुपये हे शुल्क जुलै ते सफ्टेंबर या तीन महिन्यांसाठी अदा केले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार गेले अन् घटनाबाह्य मिंधे सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या 12 दिवसांतच त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले. हे संरक्षण काढल्यानंतर त्यांचे उर्वरित 3 लाख 80 हजार 662 रुपये परत करण्यात आलेले नाही. म्हणजेच, जी व्यक्ती पोलीस संरक्षणासाठी शुल्क जमा करते; त्या व्यक्तीचे संरक्षण काढण्यात येते आणि ठाण्यात जे माजी नगरसेवक लोकप्रतिनिधीच्या निकषामध्ये बसत नाहीत, त्यांना संरक्षण पुरवण्यात येत आहे, असा आरोप परांजपे यांनी केला.

*शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवूनच चौकशी करावी!*

अजितदादा पवार यांनी बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. आपणही अशीच विनंती करीत आहोत. शेखर बागडे हे जेव्हा कळवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांचे वर्तन उद्धट, उर्मट आणि लोकसेवेला काळीमा फासणारे होते. लोकप्रतिनिधींशी बोलताना ते अरेरावी केल्या आहेत. याबाबत आम्ही अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. आता भाजपचेच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तशी मागणी केली आहे. मिंधे गट आणि भाजपाच्या वादाशी आपणाला देणेघेणे नाही. पण, शेखर बागडे हे वर्तन उद्धट, उर्मट अधिकारी आहेत. आपणाला आशा आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धारीष्टÎ दाखवतील! ते कोणाच्या आशीर्वादाने मानपाडा पोलीस ठाण्यात बसलेत हे सर्वांनाच माहित आहे. आमचे माजी नगरसेवक कुणाला पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. किमान आता तरी चौकशी झाली पाहिजे; लाचलुचपत प्र]ितबंधक खात्यामार्फत चौकशी होत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले पाहिजे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे, असेही परांजपे यांनी सांगितले.

एम टी:व्ही न्युज कडुन देखील सर्व नागरिकांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चार महिने पुर्वी सुरु झालेल्या न्युज चॅनेल्स ल...
01/01/2023

एम टी:व्ही न्युज कडुन देखील सर्व नागरिकांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चार महिने पुर्वी सुरु झालेल्या न्युज चॅनेल्स ला या नव वर्षात पदार्पपण करुन नवी उंची गाटेल सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज बनेल पुन्हा सर्वान नववर्षाचा हार्दिक शुभेच्छा

14/12/2022

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात दाखल झाले

11/12/2022

*शाळेमध्येच शिक्षकांकडून दलित विद्यार्थ्यांचा जातीय छळ*
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

ठाणे (प्रतिनिधी)- वाल्मिकी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जातीय छळ केला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने रामनगर येथील साधना शाळेमध्ये आंदोलन करण्यात आले.
रोड नं 28,रामनगर,वागळे इस्टेट,ठाणे येथे साधना विद्यालय नामक शाळा आहे. या शाळेत रामनगर भागातील वाल्मिकी समाजाचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्याना इतर विद्यार्थ्यांच्यासोबत न बसवता जमिनीवर बसविणे, त्यांना वारंवार शिक्षा करणे, जातीवाचक शब्दात अपमान करणे आदी प्रकार केले जात असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्याकडे काही पालकांनी केल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा केली असता, या शाळेतील एक शिक्षिका जाणीवपूर्वक दलित विद्यार्थ्यांना त्रास देत असून पालकांना भेटायला बोलावून “तुमच्या जातीची मुले शिक्षण घेतातच कशाला? त्यांना इतर मुलांप्रमाणे उनाडक्या करु देत; त्यांची शिक्षण घेण्याची लायकी नाही”, अशा पद्धतीची विधाने केेल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर प्रफुल्ल कांबळे यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, शाळा प्रशासनाने त्यांना भेटही नाकारली. त्यामुळे या शिक्षिकेवर कारवाई करावी; तिच्यावर अट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मा. गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशावरून आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संबधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी प्रफुल्ल कांबळे यांनी सांगितले की, शाळा हे ज्ञानदान करण्याचे माध्यम आहे. मात्र, या शाळेत ज्ञानदान करण्याऐवजी चक्क विषमता पसरविण्याचे काम केले जात आहे. हे काम अत्यंत चुकीचे असून अशा पद्धतीने संविधानातीळ समतेच्या तत्वाला हरताळ फासणार्‍या शिक्षिकेला शिक्षणाच्या क्षेत्रात राहण्याचा अधिकार नाही. या शिक्षिकेला तत्काळ बडतर्फ करुन तिला अटक करावी; अन्यथा, आम्ही हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करु, असा इशारा दिला. यावेळेस शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी फुलसुंदर यांनी आंदोलकांची भेट घेऊन माफी मागितली. तसेच संबधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले
या आंदोलनात वाल्मिकी समाजाचे वागळे विभाग अध्यक्ष सुभाष भाई फुल्सुंदर रमेश दोडके, विक्रांत घाग,समीर नेटके, फिरोज पठाण,अमित खरात,अनिता मोटे, कांता गजमल, फुलबानो पटेल, यांच्यासह अनेक विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते.

ममदापूर ठाकूरवाडी व आखाडवाडी या आदिवासी वाड्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या साखळी उपोषणास यश           कर्जत :- ममदापू...
11/12/2022

ममदापूर ठाकूरवाडी व आखाडवाडी या आदिवासी वाड्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या साखळी उपोषणास यश

कर्जत :- ममदापूर ठाकूरवाडी व आखाडवाडी,ता.कर्जत, जि.रायगड या आदिवासी वाडीतील लोकांनी,पिण्याच्या पाण्यासाठी दि.८ डिसेंबर २०२२ पासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.पेयजल योजनेचे काम पूर्ण होवूनही,आमच्या आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.स्थानिक आदिवासी लोकांचा पाणी प्रश्न दिवसेन दिवस गहन होत चालला असताना पाणी प्रश्न सोडविणेसाठी संबंधित ग्रामपंचायतीवर जन आक्रोश,हंडा मोर्चा काढला होता.त्यावेळेस पत्रकार बंधू,भगिनी यांच्या समक्ष ग्रुप ग्राम पंचायत ममदापूर पदाधिकारी,ग्रामसेवक यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत,आपल्या आदिवासी वाड्यांना अधिक दाबाने पिण्याचे पाणी सुरळीत केले जाईल असे आश्वासन दिले होते.सदर आश्वासनाअंती सदर मोर्चाची सांगता करण्यात आली होती.परंतु अद्यापही जैसे थे ! अशी अवस्था असल्यामुळे, आमच्या आदिवासी बांधवांचा विश्वासघात झाला असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे सदर आदिवासी बांधवांनी सुरू केलेलं साखळी उपोषण अधिक तीव्र होत चालले होते.पेयजल योजनेचे काम पूर्ण होवूनही स्थानिक आदिवासी बांधवांना त्याचा लाभ मिळत नसून धनदांडग्या बिल्डर लॉबीला अनधिकृतपणे पाणी पुरवले जात असल्यामुळे आम्हाला पिण्याचे पाणी मिळत नाही ! असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप होता.आमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही साखळी उपोषणाचे रूपांतरण अमरण उपोषणामध्ये करणार आहोत.प्रसंगी पाण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करण्यासही मागे सरसवणार नाही असे प्रशासनास ठणकावून सांगितले होते.संबंधित कार्यालयाला निवेदने सादर केल्यानंतर उपोषणाला यश प्राप्त झाले आहे.दुसऱ्या दिवशी पाण्याचा पुरवठा व पाण्याच्या दाबाची पहाणी करून ग्रामस्थ उपोषणाची सांगता करणार आहेत.सदर उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी आदिवासी समाजसेविका कविताताई निरगुडे/हंबीर सह विविध संघटनांचे पदाधिकारी आदि.चेतन बांगारे(बिरसा क्रांती दल ठाणे जिल्हा अध्यक्ष)प्रकाश शिद,अनंता हंबीर,एकनाथ वारघडे,पंडित पारधी,सांज वाघ,भगवान ठोंबरे,संगीता निरगुडे व अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.

08/12/2022

राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे ठाणे विधान सभा क्षेत्र अध्यक्ष श्री.आभिषेक पुसाळकर यांचे चिरंजीव कु.आर्णव पुसाळकर यास कर्नाटक येथे आयोजित राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत रौप्य पदक (Silver Medal) मिळविल्या बद्दल एम टी:व्ही न्युज मराठी तर्फे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा...
#

नाव: दिलीप रामचंद्र माने वय :३१ वर्षे राहणार : खारघर, नवी मुंबई  माझा भाऊ दिनांक ३०.११.२०२२ संध्याकाळी ५.३० वाजता पासून ...
08/12/2022

नाव: दिलीप रामचंद्र माने वय :३१ वर्षे राहणार : खारघर, नवी मुंबई माझा भाऊ दिनांक ३०.११.२०२२ संध्याकाळी ५.३० वाजता पासून बेपत्ता आहे. तो काही मानसिक आजाराने पीडित आहे. तरी या फोटो मध्ये दिसणारी वक्ती कोणाला कुठेही आढळून आल्यास कृपया त्वरीत या नंबर वर कळवावे.
शर्ट चा कलर : निळा रंग, चौकोनी पट्ट्याचा आहे. पँट: काळा रंग तुमची खूप मोठी मदत आम्हाला होईल. मनीष माने ८२९१७६०२८८ ८७७९१२८६९४

Address

Thane West

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mtv News Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mtv News Marathi:

Share