Lokshasan

Lokshasan News portal

विजय थलपती तामिळनाडूचा नवा कारभारी
10/05/2026

विजय थलपती तामिळनाडूचा नवा कारभारी

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड! 🔥सुपरस्टार विजय थलपती आता तामिळनाडूच्या नव्या नेतृत्वाच्या भूमिकेत? ऐतिह...

शुssशु... राजकारण करु नका म्हणत...Sushma Andhare यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना डिवचलंलिंक कमेंटमध्ये... 👎
03/05/2026

शुssशु... राजकारण करु नका म्हणत...Sushma Andhare यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना डिवचलं

लिंक कमेंटमध्ये... 👎

ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा विशेष ग...
01/05/2026

ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा विशेष गौरव

खंडाळा : अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली असून “मिसिंग लिंक” या ....

01/05/2026
फकीरा प्रोजेक्ट हा फक्त बँड नाही.तो बदल आणि प्रेरणेची एक चळवळ - हा प्रोजेक्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्र...
30/04/2026

फकीरा प्रोजेक्ट हा फक्त बँड नाही.
तो बदल आणि प्रेरणेची एक चळवळ -

हा प्रोजेक्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित-
बँडचे नेतृत्व संस्थापक व गायक रुपेश खंदार यांचे प्रतिपादन

रायगड :धम्मशील सावंत

द फकीरा प्रोजेक्ट हा कल्याण, महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख इंडियन कल्चरल रॉक बँड आहे.
हा बँड पारंपरिक आणि आधुनिक संगीताचा संगम घडवतो.
या बँडचे नेतृत्व संस्थापक व गायक रुपेश खंदार करतात.
गिटारवर जॉर्ज मॉन्टेरो बँडला रॉक ऊर्जा देतात.
बेस गिटारवर विशाल पोल दमदार रिदम देतात.
कीबोर्डवर राहुल जाधव मधुरता निर्माण करतात.
ड्रम्सवर परेश विजय जोशपूर्ण बीट्स देतात.
त्यांचे संगीत सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देणारे आहे.
हा प्रोजेक्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहे.
तो जागृती, समानता आणि शिक्षणावर आधारित आहे.
त्यांची गाणी समाजाला जागृत आणि प्रेरित करतात.
द फकीरा प्रोजेक्ट हा सामान्य लोकांचा आवाज बनत आहे.
त्यांचे पहिले मराठी गाणे “जाग तू” नव्या विचारांचे प्रतीक आहे.
या गाण्यात शिक्षण आणि आत्मसन्मानाचा संदेश आहे.
बँडचा विश्वास आहे की संगीत बदल घडवू शकते.
ते विविध भाषांमध्ये ओरिजिनल गाणी तयार करत आहेत.
लाईव्ह परफॉर्मन्स त्यांच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे.
ते महाराष्ट्र आणि भारतभर परफॉर्म करण्याची योजना आखत आहेत.
द फकीरा प्रोजेक्ट हा फक्त बँड नाही.
तो बदल आणि प्रेरणेची एक चळवळ आहे.

रायगड न्यूज अपडेट रिपोर्टर: धम्मशील सावंत नागोठणे ते चोळे विभागासाठी अनंत युवा प्रतिष्ठान कडून 2 रुग्णवाहीकांचे लोकार्पण...
13/04/2026

रायगड न्यूज अपडेट

रिपोर्टर: धम्मशील सावंत

नागोठणे ते चोळे विभागासाठी अनंत युवा प्रतिष्ठान कडून 2 रुग्णवाहीकांचे लोकार्पण व गरजुना व्हीलचेअरचे वाटप

अनंत युवा प्रतिष्ठानचा प्रेरक व मानवतावादी सामाजिक उपक्रमाचे होतेय कौतुक

अनंत युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र चे सेक्रेटरी धीरज घुले पाटील यांचा विशेष पुढाकार

युवा उद्योजक अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकविध सेवाभावी उपक्रम

रायगड -धम्मशील सावंत,

रायगडच्या नागोठणे ते चोळे परिसरातील नागरिकांसाठी अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रेरणादायी व मानवतावादी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत 2 रुग्णवाहीकांचे लोकार्पण करण्यात आले तसेच गरजू नागरिकांना व्हीलचेअरचे व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अपघातग्रस्त तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहीकांची कमतरता भासत असताना हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे नागरिक व उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी अनंत युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रचे सेक्रेटरी धीरज घुले पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या या सामाजिक जाणिवेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
युवा उद्योजक अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र चे अध्यक्ष राम जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अनंत युवा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
एकूणच, या उपक्रमामुळे समाजातील गरजू घटकांना थेट मदत मिळणार असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून या सेवाभावी उपक्रमाकडे पाहिले जातेय .

मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवरापिजचा पुढाकार; खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीरा...
18/03/2026

मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सव
रापिजचा पुढाकार; खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

रायगड :धम्मशील सावंत

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार नाविन्यपूर्ण उत्पादने एका छताखाली मिळणार आहेत. यासोबतच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून विविध खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे. प्रदर्शनाचे आयोजन 20 ते 24 मार्चदरम्यान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खरेदीसोबतच पारंपरिक खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी नागरिकांसह पर्यटकांनाही मिळणार आहे. यामध्ये गवळण, आडवाटेची आध्यात्मिक यात्रा हा लोकनृत्यावर आधारित कार्यक्रम, मराठी-हिंदी सदाबहार गाण्यांच्या ऑर्केस्ट्रा, ⁠महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम, ⁠शेतकरी मेळावा, नाशिकचे सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक हभप रंगनाथ महाराज नाईकडे यांचे ग्रामविकास प्रबोधनपर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. यासोबतच कार्यक्रमासाठी सिने अभिनेते भाऊ कदम व मराठी अभिनेत्री संजना काळे यांची उपस्थिती लाभणार आहे.
हा प्रदर्शन व विक्री महोत्सव 20 ते 24 मार्चदरम्यान अलिबाग समुद्रकिना-याजवळील मैदानात स. 10 ते रात्री 10 वा. पर्यंत भरणार आहे. या महोत्सवासाठी नागरिकांसह पर्यटकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यक्रारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी केले आहे.

चैकट:
एकूण 102 स्टाॅल:
या प्रदर्शन व विक्री महोत्सवात एकूण 102 स्टाॅल असणार आहेत. तसेच सुमारे 86 बचतगटांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये 69 स्टाॅल हे विविध प्रकारच्या वस्तू, 13 स्टाॅल खाद्यपदार्थ, शासकीय विभागांत कृषी विभागाचे स्टाॅल, जिल्हा उद्योग केंद्राचे 2 स्टाॅल, महिला आर्थिक विकास महामंडळाचे 4 स्टाॅल, महिला बालकल्याण बालकल्याण विभागाचा 1 तर शिक्षण विभागाचा 1 असे स्टाॅल उभारण्यात आले आहेत. यासोबतच जिल्हा परिषद व जिल्हा रूग्णालयाचे 2 आरोग्य पथक कार्यक्रमस्थळी तैनात असणार आहेत.

प्रतिक्रिया:
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणा-या महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकृती आपणा सर्वांना महोत्सवात उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याची खाद्यसंस्कृती व सांस्कृतिक संस्कृतीचा आस्वादही घेता येणार आहे. त्यामुळे या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्या.
- मंगेश वाकडीकर, अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद

प्रतिक्रिया:
मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवात आपल्याला महिला बचतगटांनी तयार केलेल्या कलाकुसर, खाद्यपदार्थ याचा आस्वाद घेता येणार आहे. त्याचप्रमाणे लोकनृत्यावर आधारित कार्यक्रम, मराठी-हिंदी सदाबहार गाण्यांच्या ऑर्केस्ट्रा, ⁠महिलांसाठी खेळ पैठणीचा, ⁠शेतकरी मेळावा, ग्रामविकास प्रबोधनपर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. यासोबतच कार्यक्रमासाठी सिने अभिनेते भाऊ कदम व मराठी अभिनेत्री संजना काळे यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सवाला भेट द्यावी.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

सुधागड सन्मान समितीच्या सर्व उमेदवारांचासुधागडातील जनतेतून होतोय सन्मान जांभूळपाडा जिल्हा परिषद उमेदवार सौ.शर्मिला बोडके...
05/02/2026

सुधागड सन्मान समितीच्या सर्व उमेदवारांचा
सुधागडातील जनतेतून होतोय सन्मान

जांभूळपाडा जिल्हा परिषद उमेदवार सौ.शर्मिला बोडके , परळी पंचायत समिती उमेदवार सौ. प्रणिता परदेशी यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद

पाली/बेणसे दि.......(धम्मशील सावंत)रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष व नेतेमंडळीसाठी ही निवडणूक सामाजिक राजकीयदृष्ट्या अस्तित्व व प्रतिष्ठा जपणारी बनलीय. जांभूळपाडा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची होताना दिसतेय. सुधागड सन्मान समिती च्या माध्यमातून सुधागड च्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी सुधागडातून जांभूळपाडा जिल्हा परिषदेचे उमेदवार शर्मिला शरद बोडके निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात नीलिमा धैर्यशील पाटील निवडणूक लढवीत आहेत, त्यामुळे ही लढत अटीतटीची व काटेकी टक्कर अशी होणार आहे. तर परळी पंचायत समिती उमेदवार प्रणिता राजेश परदेशी या निवडणूक मैदानात ताकतीने उतरल्यात. मतदारसंघात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचार केलाय. जनतेतून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळतोय. विकासात्मक दृष्टी, जनतेच्या प्रश्न व समस्यांची जाण, अडी अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देण्यात पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वाना निवडणूक लढविण्याची संधी मिळालीय. यावेळी बोलताना राजेश परदेशी म्हणाले की ही निवडणूक मायबाप जनतेने पूर्णपणे हातात घेतली आहे. धनशक्ती आणि हुकूमशाहीच्या विरोधात आणि जे उमेदवार आपल्यावर लादले गेले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही लढवतोय. आज आम्ही गावोगावी प्रचार रॅली च आयोजन करतोय, या रॅलीत तरुण वृद्ध ज्येष्ठ सारेच चेहरे पहावयास मिळतात, आता विरोधकांना संधी का हवी, मागील 40 वर्षात त्यांना सुधागडचा विकास करता आला नाही , मग या पाच वर्षात आता हे कोणता विकास करणार? यांच्याकडे विकासाच काय धोरण आहे असा सवाल परदेशी यांनी उपस्थित केला. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, मग ते कार्यकर्ते माझ्या पक्षातील असोत की इतर पक्षातील असोत, ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून येत्या 9 तारखेला या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागलेला पहावयास मिळेल असा विश्वास राजेश परदेशी यांनी व्यक्त केला. सुधागडाचा स्वाभिमान आपला धनुष्यबाण , पेटवा स्वाभिमानाची मशाल, या जयघोषाने आता परिवर्तन अटळ व निश्चित असल्याचे सक्षम युवा नेतृत्व राजेश परदेशी व उमेदवारांनी सांगितलंय. जांभुळपाडा जिल्हा परिषद उमेदवार शर्मिला बोडके म्हणाल्या की मी सुधागड वासीय जनतेला निवेदन करते की मी कोणालाही न घाबरता मी निर्भीडपणे मैदानात उतरली आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ताकतीने लढायचं आहे,आणि सुधागडला जिंकवायचा आहे. असे सौ. बोडके म्हणाल्या. या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न,समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही उमेदवार सौ. बोडके व उमेदवार सौ. परदेशी यांनी दिलीय.

19/12/2025


राज्यमंत्री पंकज भोयर आणि यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक जुगलबंदी I Pankaj Bhoyar I

नितीन नबीन कोण आहेत ? भाजपने का दिली राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी ? Nitin NabinWho is Nitin Nabin? Why did ...
15/12/2025

नितीन नबीन कोण आहेत ? भाजपने का दिली राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी ? Nitin Nabin

Who is Nitin Nabin? Why did the BJP entrust him with the responsibility of the National Working President post?

नवी दिल्ली / पटना बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन (Nitin Nabin) यांची भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्...

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokshasan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokshasan:

Share