01/01/2026
ब्रेकिंग न्यूज..ओडीसा/आंध्रप्रदेश राज्यातून इन्होवा कारमधुन अंमली पदार्थाची तस्करी करणारा आरोपीस 638 किलो वजनाचा गांजा या अंमली पदार्थासह मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे पथकाकडून अटक
मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा, नेमणुकीतील पोहवा / जयकर जाधव यांना मिळालेल्या बातमीवरून इकडील घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 30/12/2025 रोजी 18:15 वा. खारेगाव टोल नाक्याकडून कळवा बाजूकडे जाणारे रोडवर, टोल नाक्यापासुन सुमारे 100 मिटर अंतरावर ठाणे प. याठिकाणी सापळा कारवाई करून इन्होवा कार क्र. AP-09-BF-9382 या वाहनातून ओडीसा व तेलंगना (आंध्रपंदेश) राज्यातून गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करणारा इसम नामे चिन्ना टागुर लक्ष्मण नायक वय 36 वर्षे रा. गाजुलाय तांडा, कन्मानूर गाव, ता. मरकेल, जि. मेहबुबनगर, राज्य तेलंगना आघ्रप्रदेश यास ताब्यात घेवून त्याचेकडून 2,04,16,000/- रू. किमतीचा एकुण 638 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व 10,00,000/- रु. किमतीची इन्होवा कार असा एकुण 2,14,16,000/- रु. किमतीचा मुददेमाल हस्तगत करून त्याचेविरूध्द कळवा पोलीस ठाणे येथे गुरन 958/2025 एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 चे कलम 8 (क), 20(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयात एक आरोपी अटक करण्यात आला आहे. आरोपी यास दि. 03/01/2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर असुन पुढील तपास मालमत्ता कक्षाकडून चालू आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. पंजाबराव उगले (गुन्हे), मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमरसिंह जाधव, गुन्हे, ठाणे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विनय घोरपडे, गुन्हे शोध 2. गुन्हे, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी/ गोरखनाथ घार्गे, पोउनि/संजय भिसे, मपोउनि/शितल पाटील, सपोउनि/शिवाजी गायकवाड, पोहवा/4487 दिनेश कुंभारे, पोहवा /6567 प्रशांत भुर्के, पोहवा/6436 संदीप भांगरे, पोहवा/2788 महेश साबळे, पोहवा /2958 जयकर जाधव, पोहवा /4888 राहुल शिरसाठ, पोना/5799 सचिन कोळी, पोना/6626 तौसीफ सैयद, पोअं/8301 महेश सावंत, चापोअं/1029 सदन मुळे, तसेच मपोहवा /3192 आशा गोळे, मपोना/4085 गिताली पाटील यांनी केलेली आहे.