02/06/2026
🔔‼️ तिकीट बुकिंगसाठी शेवटचे ४ दिवस शिल्लक!
आजच तुमचं तिकीट बुक करा!! आमची तयारी जोरदार सुरू आहे!!
🌱 अनेक युगांपासून चालत आलेल्या ऋतुचक्राला जर निरनिराळ्या भावभावनांची जोड दिली तर त्यातून एक कथा साकार होऊ शकते, हाच मध्यवर्ती धागा घेऊन निसर्ग आणि भावना या दोघांची प्रेमकहाणी असलेली निसर्गायन ही एक आगळ्यावेगळ्या संकल्पनेची मैफल सादर होते.
🍃✨ निसर्गाचे सहा सखेसोबती म्हणजेच शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म आणि वर्षा हे ऋतू या दोघांची प्रेमकहाणी पुढे नेतात त्यानुसार त्यांच्या प्रेमात वेगवेगळे टप्पे येत जातात.
☘️ आपल्या अतिशय जवळची, वर्षांनुवर्षं आजूबाजूला घडणारी, तरीही अनोळखी असलेली, शुभसूर क्रिएशन्स निर्मित, दादर सांस्कृतिक मंच यांच्या सहकार्याने, "निसर्गायन - एक अनोखी प्रेमकहाणी"
लवकरच साकार होणार आहे प्रभादेवी येथे ६ जून २०२६ रोजी.
🎵🎞️🌸 संगीत, दृश्यं आणि सुगंध या तिन्हीची अप्रतिम सांगड असलेली, एक भन्नाट संकल्पनेची, ऐकण्याची,
पाहण्याची आणि अनुभवण्याची मैफल!
🌿 "निसर्गायन - एक अनोखी प्रेमकहाणी!" 💕
🖊️🎵 संकल्पना | संहिता | संगीत -
सुखदा भावे-दाबके
🎤 सादरकर्ते
• केतकी भावे-जोशी
• अभिषेक नलावडे
• सौरभ सोहोनी
📹 व्हिज्युअल्स – पराग दाबके
🌸 सुगंध सहकार्य – हेमंत सुगंधी भांडार
🖊️ काव्य - कविवर्य मंगेश पाडगांवकर, कवयित्री शांता शेळके, पराग दाबके, सुखदा भावे-दाबके
🗓️ शनिवार, ६ जून २०२६
⏱️ रात्री ८:३० वाजता
📍 पु. ल. देशपांडे अकादमी मिनी थिएटर (रवींद्र मिनी), प्रभादेवी
🎶🍀 एक दर्जेदार अनुभव एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेच्या मैफलीचा, अजिबात चुकवू नका!
🎫 प्रवेशिका मर्यादित
लवकर संपर्क साधा खाली दिलेल्या क्रमांकावर.
बल्क बुकिंगवर खास सवलत!
📞 संपर्क –
शुभसूर क्रिएशन्स 9819204232