08/11/2025
धाराशिव जिल्ह्यातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विविध विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सह माजी आमदार ज्ञानराज चौगुले, मल्हार पाटील, सुरज साळुंखे, मोहन पनुरे, अजित पिंगळे, शिवाजी कापसे, नितीन काळे, अमित शिंदे, किरण गायकवाड तसेच भाजपा व शिवसेनेचे तालुकाप्रमुख उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून तिन्ही घटकपक्ष एकत्र लढवणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समित्यांवर महायुतीचा विजयश्रीचा झेंडा फडकविण्याचा विश्वास या बैठकीत सर्व नेत्यांनी व्यक्त केला आहे.