Kiran Sonawane

Kiran Sonawane Kiran Sonawane
politician

12 मे रोजी, वसई मध्ये व्याख्यान, तुम्ही आसपास असाल तर नक्की या
06/05/2025

12 मे रोजी, वसई मध्ये व्याख्यान, तुम्ही आसपास असाल तर नक्की या

जाहीर निषेध!औरंगजेबाची स्तुती करणारी आबू आजमी प्रवृत्ती ठेचालीच पाहिजे कुठलंही कारण नसताना, क्रूरकर्मा औरंगजेबाचे गोडवे ...
03/03/2025

जाहीर निषेध!

औरंगजेबाची स्तुती करणारी आबू आजमी प्रवृत्ती ठेचालीच पाहिजे

कुठलंही कारण नसताना, क्रूरकर्मा औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या समाजवादी पक्षाचे आबू आजमी यांचा निषेध करून त्यांच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करत आहोत
देशात वाद निर्माण करून दंगली घडवून आणण्याचे हे कट कारस्थान असून संपूर्ण इतिहासात क्रूरकर्मा अशी ज्याची ओळख आहे, स्वतःच्या कुटुंबातील 27 जणांची हत्या, स्वतःच्या पित्याला तुरुंगात टाकून, रयतेचे राज्य नेस्तनाबुद करण्यासाठी अनेकदा चालून आलेला, छत्रपती शिवाजी महाराज यांना ठार मारण्याचा कट रचणारा, छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ करून त्यांना ठार करणारा क्रूरकर्मा औरंगजेब जर आबू आजमीला प्रिय वाटत असेल तर, आबू आजमी हा शिवद्रोही, हिंदूद्रोही आणि देशद्रोही आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा.
शिवरायांच्या काळात अनेक मुस्लिम, पाठाण शिवरायाच्या सैन्यात होते, ते सर्व शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमी मुस्लिम आजही देशात आहेत, मात्र आबू आजमी सारखे औरंग्याचे वंशज यादेशात आहेत हे दुर्दैब, आबू आजमी वर देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा आणि अश्या प्रवृतीला कायमचा धडा बसेल अशी कारवाई केली पाहिजे अशी मी शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी करतो.

किरण सोनावणे, प्रवक्ता
शिवसेना, (महाराष्ट्र )

हम भारत के लोग !मैने जब पत्रकारिता शुरू की तो मेरे सामने बहुत बडे विद्वान पत्रकार थे, जो पत्रकारिता को समाज में सकारात्म...
23/02/2025

हम भारत के लोग !

मैने जब पत्रकारिता शुरू की तो मेरे सामने बहुत बडे विद्वान पत्रकार थे, जो पत्रकारिता को समाज में सकारात्मक बदल लाने का एक माध्यम के स्वरूप में देखते थे और इस के लिये बहुत अध्ययन करते थे. चिंतन करते थे और चर्चा भी करते थे. इस के लिये इन पत्रकारो के पास काफी किताबे रहती थी और अक्सर वो किताबे खरिदा करते. मै भी इसलिये पत्रकारिता में आया था और उन्ही की आदत मुझ में पनप गई. मै भी कई विषयो को लेकर अध्ययन करतात था, इसी कारण मेरे घर में हजारो किताबो का अंबार लग गया.
इस के काफी अच्छे और काफी बुरे परिणाम हुए. क्यो के पुंजीवादी पत्रकारिता का दौर शुरू हुआ तो, पत्रकार बहुत अध्ययनशील हो इस की जरुरत नही बची, बस समसामाईक घटना पर इन्स्टंट मॅगी के जैसे खबर बना दे, दो तीन पक्ष है तो वो दे दे, उसे अध्ययन और उस पर चिंतन करने की जरुरत नही बची. बल्की ऐसा करनेवाला पत्रकार काम का समय फिजूल की बातो में गवा रहा है, ऐसा इन्स्टंट मॅगी टाईप पत्रकारो को लगता और वो मुझ से दूर रहते या, हा में हा मिला कर अपना दामन निकाल बाजू हो जाते.
उन की नजर में मै, ना समझ में आनेवाला पत्रकार था . लेकिन इस का फायदा यह हुआ की मै पत्रकारिता के किसी गिरोह का हिस्सा कभी नही रहा. दुसरा मै प्रगतीशील विचारधारा से प्रभावीत था, और इन्स्टंट मॅगी वाले पत्रकार कोई टिका लगाने वाला, कोई नमाज पढने वाला तो कोई अन्य रूप में डर, अज्ञान और लालच के कारण पूजा पाठ करनेवाले, तो कोई केवल धार्मिक दिखाना चाहिए इसलिये उस तरह का भेस बनाकर रहनेवाला. मेरा किसी की श्रद्धा को लेकर कोई आपत्ती कल भी नही थी, आज भी नही, लेकिन स्वाँग करनेवालो को लेकर और अंधश्रद्धा को श्रद्धा बतानेवालो को लेकर मेरा गुस्सा अक्सर फुटता
मै अपना अकेला या कभी एखाद काम चलावू दोस्त लेकर चालता था
मुझे इस अलग थलग पण का अध्ययन में काफी फायदा हुआ. मैने दुनिया के तकरीबन सारे दर्शन, क्लासिक साहित्य और तत्वज्ञान के अध्ययन के साथ सारे धर्मो का भी अध्ययन कर लिया. जिस का उपयोग मुझे आज बहुत अच्छा हो रहा है. आज भी व्याख्यान, किताबे और घुमना यह मेरी जैसी दिनचर्या हो गई है.
अब तो पत्रकारिता एक गाली बनकर उभरी है, जिस में फिलिंग द ब्लँक का काम सिर्फ हो रहा है. इस लिये पत्रकारिता यह संज्ञा ही अपने अर्थ और विचारो से भटक गई है. जैसे वो पुंजीपती, राजनेता और धर्म के ठेकेदारो के पैर की जुती मात्र रह गई है. उसे इस घेरे से बाहर निकालना होगा...
मै बहुत शक्तिशाली, पुंजीपती नही हू, मगर आप लोग अगर साथ दे तो आप और मै, मतलब हमलोग यह कर सकते है. पत्रकारिता का फिर से आवाज दे सकते है. इस की योजना मेरे पास है. आप अगर इस नई पत्रकारिता के आंदोलन से जुडना चाहते हो तो आ सकते है. लेकिन इस के लिये सत्य के साथ समता, स्वातंत्रता, बंधुत्व और न्याय इन मुल्यो पर आप की श्रद्धा होना अनिवार्य होगा. यह देश के निर्माण में मुल्यो को बोने की कोशिश है.
काम बहुत बडा है, लेकिन मुश्किल नही है, और आसान काम करने का क्या मजा, जो हर कोई कर ले
अगर इस नये दौर की पत्रकारिता आंदोलन में आप शरीक होना चहाते हो तो
मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, तेलगू, मळ्याळी, पंजाबी, भाषा जाननेवाले कोई किसी भी धर्म और मत मान्यता के 20 से 50 उम्र के व्यक्ती संपर्क कर सकते है
मुझे 7506000040 इस नंबर पर मेसेज करे. जिसमे
आप का नाम,
पता,
शिक्षा
और
किस स्वरूप योगदान दे सकते हो, इसे विस्तार से लिखे
(*उप्पर दिये नंबर पर कॉल मत करे, यह केवल मेसेज के लिए है*). 5000/7000 लोग भारत के अलग अलग प्रदेश और भाषा से जुडने के बाद मै खुद
आप से संपर्क करुंगा. एक मिटिंग के लिये, जो मुंबई या दिल्ली में होगी.
तब तक के लिये मुझे आज्ञा दीजिये. जल्द ही मुलाकात होगी. धन्यवाद, स्वस्थ राहिये, अपना खयाल राखिये! हम एक 100 मित्रो का ग्रुप " हम भारत के लोग " ग्रुप है. इसलिये

*हम भारत के लोग*

12/02/2025
राहुल सोलापूरकरचे अकलेचे तारे काल परवा राहुल सोलापूरकर या अभिनेत्याने आपल्या अकलेचे तारे तोडत चक्क छत्रपती शिवाजी महाराज...
06/02/2025

राहुल सोलापूरकरचे अकलेचे तारे

काल परवा राहुल सोलापूरकर या अभिनेत्याने आपल्या अकलेचे तारे तोडत चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह असे वक्तव्य केले. ते वक्तव्य तुम्ही वाचले किंवा ऐकले असेलच. इथे ते पुन्हा टाकून जागा भरायची गरज नाही.
पण हे आता का होते आहे याचा विचार जरूर केला पाहिजे. थोडा अभ्यास आणि निरखून पाहिलं तर हे सहज समजून येते. येथील तथाकथित उच्चवर्णीय समाजाची लॉबी सदैव स्वतःच वर्चस्व आबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असते. त्यांना जे अडचणीचे ठरते त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष, नंतर विरोध आणि त्यानंतर ते आमचेच आहे असं बोलत वरकरणी स्वीकार आणि त्यात पुढे हळू हळू प्रदूषण करून शेवटी त्याला बदनाम करून नष्ट करणे असा मार्ग अवलंबीला जातो.
ही गोष्ट महावीर, भगवान बुद्ध यांच्या पासून अनेक संत, महंत आणि समाज सेवाकाच्या बाबतीत घडल्याला इतिहास साक्षी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातही हीच गोष्ट घडत आल्याचे आपण बारकाईने बघतील्यास दिसेल. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वेगवेगळ्या खोट्या नाट्या बखरी लिहून त्यांचा इतिहास आणि गड किल्ले इतिहासात गाडून टाकले होते.
मात्र महात्मा ज्योतीराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधली, त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास सुरुवात केली तसे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समोर येऊ लागला. जेंव्हा 40/60 च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आणि देशातील नव्याने उभे रहाणाऱ्या समूहाचे प्रेरणा आणि आदरस्थान होतं आहे असे दिसताच, इथला एक वर्ग सक्रिय झाला आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र हे हिंदू स्वराज्य, हिंदू धर्म, गो ब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लिम विरोधी चितरण्यास सुरुवात केली त्यातून हिंदू मुस्लिम द्वेष्याची बीजे पेरून पोसली गेली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य कर्तृत्व आणि निर्भयता बाजूला सारून, छत्रपती शिवाजी म्हणजे क्षुल्लक जो काही चमत्कार, पराक्रम घडला आहे तो भवानी तलवार, देवीचा आशीर्वाद आणि रामदास स्वामी नावाच्या गोसाव्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे घडला. महाराज कसे देव आणि ब्रह्माणाच्या आशीर्वादाने विश्व पराक्रमी राजे झाले याच्या कथा, कादंबऱ्या, अख्यायिका पसरवल्या गेल्या. यामुळे ज्यांची पहिली पिढी शिक्षणात आली होती, ते यासर्व प्रकाराने प्रभावीत झाले. शिवाय शाळा आणि महाविद्यालयात शिक्षक आणि प्राध्यापक वर्गात एकाच वर्गाचा मोठ्या प्रमाणात भरणा होता. त्यामुळे इथून तिथून सर्वत्र तेच प्रसारीत झाले.
नाटक, सिनेमा यातून अफजल खान वध, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, रामदास स्वामीच्या झोळीत राज्य टाकले, भवानी मातेने तलवार दिली. हेच वारंवार सांगण्यात आल्याने हिंदू मुस्लिम आणि दलित सवर्ण यांच्यात दरी निर्माण करण्यात यश आले. याच कारण शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन दलित ओबीसी वर्ग नव्याने उभा राहत होता आणि तो ब्राह्मण यांच्या धर्म वर्चस्व आणि उच्च वर्णीय मराठा जमीनदार यांच्या एकछत्री सत्तेला आवाहन देऊ लागला होता.
अश्या विखारी प्रचारामुळे देशात हिंदू मुस्लिम आणि दलित सवर्ण दंगलीची बीजे रुजली गेली. आणि त्यामुळे आता पर्यंत हजारो दंगली होऊन त्यात लाखो बळी गेल्याचा इतिहास आहे.
मात्र शिक्षण प्रसारमुळे दलित बहुजन समाजातील तरुण शिकू लागले, त्यांना खरा इतिहास आणि इतिहासातील विकृतीकारण समजू लागले, ते याबद्दल लिहू लागले, बोलू लागले, नवे नवे खुलाशे करू लागले यामुळे प्रस्थापित बदमाश लोकांचा डाव उघडा पडू लागला आणि आता तर स्पष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समोर आला आहे आणि तो अडचणीचा ठरू लागल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्चस्व कमी करण्यास सुरुवात केली गेली.
सुरुवातीला छोटे छोटे प्रहार, काही खोट्या अख्यायिका पसरवल्या गेल्या, मात्र मोठा प्रहार अलीकडे जेम्स लेन याच्या माध्यमातून शिव चरित्र वर केला गेला. चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ माँ साहेब यांचेच चरित्र हनन केले गेले. त्यावरून महाराष्ट्रात प्रचंड वादळ उठले, स्वतः लिहिले तर अडचण होईल म्हणून पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे तंत्र वापरले गेले. यात पाहुणा जेम्स लेन होता. मात्र त्याचे कर्ता करविता धनी इथलेच प्रस्थापित जातीय वर्चस्व वादी होते हे आता उघड झाले आहे
मधल्या काळात असेच छोटे प्रकार झाले मात्र आता राहुल सोलापूरकर या अभिनेत्याच्या माध्यमातून जो वाद निर्माण करण्यात आला हा या अंकाचा दुसरा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देणे आणि घेण्याच्या वर्गातील होते असे अप्रत्यक्ष सुचवायचे आहे.
पुढे पुढे मराठे साम्राज्य बुडाले याची बीजे कशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारभारत होती, त्यांनी धर्म आणि ब्राह्मण दूर केला त्यामुळे हे घडले असा निष्कर्ष काढून संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र बाद करण्याचे हे कुटील कारस्थान आहे.
अश्या वेळी समस्त शिवप्रेमीनी जागृत राहून हे षडयंत्र ओळखले पाहिजे अन्यथा बुद्ध, महावीर, नामदेव तुकाराम, बसवेश्वर हे जसे विकृत करून संपवले गेले तोच प्रकार महाराजाच्या संदर्भात होतो आहे, यासोबत त्यांचे पुढील टारगेट ज्याच्यावर ते अजूनही काम करत आहेत ते म्हणजे महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर. समाज आणि देश वाचवण्यासाठी हे आणि असे सर्व प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत

*किरण सोनावणे*

कृपया लेख दुसरीकडे कॉपी पेस्ट करतांना, मालकाचे नाव काढून टाकू नये, अशी सभ्य लोकांना विनंती आहे

21 व्या शतकात जर ही परिस्थिती आहे, मागास जातीतील तरुणाला आपल्या लग्नाची मिरवणूक घोड्यावरून काढण्यासाठी पोलीस सुरक्षा घ्य...
24/01/2025

21 व्या शतकात जर ही परिस्थिती आहे, मागास जातीतील तरुणाला आपल्या लग्नाची मिरवणूक घोड्यावरून काढण्यासाठी पोलीस सुरक्षा घ्यावी लागत असेल तर. हा देश किती मागासलेल्या, नीच लोकांचा आहे, यांना 1000 वर्ष मुस्लिमांनी राज्य केलेले चालते, ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलेले चालते पण या देशातील मागास वर्गीय समाजाचा विकास झालेला पाहवला जात नाही. हा देश घंटा विश्वगुरू होईल!

उल्हासनगरचे भाजपचे आमदार आणि आमचे मित्र कुमार ऐलानी  यांच्या एकुलत्या एक मुलगा धीरज याचे मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दु...
16/01/2025

उल्हासनगरचे भाजपचे आमदार आणि आमचे मित्र कुमार ऐलानी यांच्या एकुलत्या एक मुलगा धीरज याचे मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. काही दिवसापासून मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. धीरजच्या मागे त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत. कुमार ऐलानी यांच्यावर हा दुःखाचा प्रचंड मोठा आघात आहे.

धीरज यांस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼

Address

Ulhasnagar
421005

Telephone

+917506000040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Sonawane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kiran Sonawane:

Share