11/10/2024
श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलेल्या वरील काव्यपंक्ती आज रतन टाटा यांच्या निधनानंतर आपसुकच स्मृतिपटलावर विसावल्या. एक दूरदर्शी आणि द्रष्टे उद्योजक म्हणून देशासह जगभरात टाटा ख्यातकीर्तच! पण, टाटांच्या अवघ्या आयुष्याकडे केवळ एक दिग्गज भारतीय उद्योजकाच्या चष्म्याने पाहिले, तर ते त्यांच्या कमावलेल्या लौकिकाचे अवमूल्यन ठरावे. कारण, हे उद्योग‘रत्न’ व्यवसाय आणि व्यवहारजगाच्याही पलीकडचेच रसायन. रतन टाटा हे प्रत्येक भारतीयासाठी, देशासाठी जणू दीपस्तंभच होते. तरुण उद्योजकांसाठी देदिप्यमान आदर्श, तर सामाजिक क्षेत्रातील मंडळींसाठीही रतन टाटा यांचे कृतिशील विचार तितकेच मार्गदर्शक. त्यामुळे टाटांच्या निधनाने भारतमातेने या मातीशी नाळ जोडलेला सुपुत्रच गमावला आहे. आज भारताचा सर्वार्थाने विश्वगौरव होत असताना, या दीपस्तंभाचे असे जगाचा निरोप घेणे ही वेदनादायी काळरात्रच...
श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलेल्या वरील काव्यपंक्ती आज रतन टाटा यांच्या निधनानंतर आपसुकच स्मृतिपटलावर विसाव.....