21/01/2023
"ऐक ना ,काल काय झालं माहितीये..!?" इथून पुढे जे काही घडतं, ते आपल्या सगळ्यांनाच आवडतं! म्हणजे या संवादात पुढे ज्या -ज्या प्रसंगाचं कथन होतं, खरंतर ती असते एक कथा! हो की नाही!
म्हणजेच आपल्या कोणत्याही भाषेचा आत्मा हे कथन, त्यातून निर्माण होणाऱ्या कथा. त्या सांगायला, ऐकायला आपल्याला आवडतंच की. त्यातही जर त्या लेखक मंडळींनी त्यांच्या कल्पनेच्या जोरावर, प्रतिभेवर त्या फुलवलेल्या असतील, तर फारच कमाल. पूर्वी असे कथा- कथनाचे, कथा-अभिवाचनाचे कितीतरी कार्यक्रम असायचे. निखळ आनंद आणि वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणारे. सध्या मात्र असे कार्यक्रम जवळपास नामशेष होत चाललेत. म्हणूनच प्रोज पब्लिकेशन्स, साहित्यकट्टा अंतर्गत; तुम्हा सर्वांसाठीच एक मस्त प्रकट कार्यक्रम घेऊन येत आहे. अर्थात कथा- अभिवाचनाचा.
कार्यक्रमाचं शीर्षक- एक गोष्ट सांगू!?
या कार्यक्रमात तुम्हाला वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या रहस्यकथा, भयकथा ऐकण्याचा थरार अनुभवायला मिळेल.
या कथांचं सादरीकरण सुद्धा तसंच दमदार असेल. वेगवेगळे अभिवाचक त्या सादर करतील, ते ही संगीताच्या साथीने..
येणाऱ्या प्रेक्षक, श्रोतृवर्ग यांना एक उत्तम,सकस मनोरंजनाचा आनंद देण्याचा हा आमचा प्रयत्न.
त्याची ही माहिती-
कार्यक्रम- एक गोष्ट सांगू!?
दिनांक- १२ फेब्रुवारी २०२३, रविवारी
वेळ- संध्याकाळी ५.३० ते ८.३०
स्थळ- नवल फिरोदिया सभागृह ,भांडारकर रीसर्च इन्स्टिट्यूट, भांडारकर रोड, पुणे.
शिवाय या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातल्या काही मान्यवरांची उपस्थितीही असणार आहेच.
प्रवेश - विनामूल्य!
मात्र आपली जागा राखीव ठेवण्यासाठी या खालच्या लिंकवर जाऊन तिथे नाव नोंदवा.
जागा मर्यादित असल्याने, हे आवश्यक आहे.
तर मंडळी नक्की या! तुमच्या मित्र-मंडळींना,कुटुंबियांना ही घेऊन या!
नावनोंदणी साठी लिंक -
https://bit.ly/EkGoshtaSangu
*प्रवेश मर्यादित.
*प्रवेशाचे संपूर्ण हक्क प्रोज पब्लिकेशन्स कडे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
*कार्यक्रम लहान मुलांसाठी नाही. वयोगट १८ आणि पुढे.
-
प्रोज पब्लिकेशन्स