Shravi Media & Film Production

  • Home
  • Shravi Media & Film Production

Shravi Media & Film Production SHRAVI Media And Film Production is a one of the popular Production House in India.

आज सायंकाळी बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका आयोजित  स्वरूप भाळवणकर LIVE CONCERT  नक्की या दिनांक 26 जून 2025...
26/06/2025

आज सायंकाळी
बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका आयोजित
स्वरूप भाळवणकर LIVE CONCERT
नक्की या
दिनांक 26 जून 2025
सायंकाळी 7:45 वा.
ठिकाण -बालगंधर्व रंगमंदिर जंगली महाराज रस्ता पुणे
Pune Karaoke Superstar Shravi Media & Film Production

28/10/2024

भरपूर आकर्षक फटाके आहेत एकदा नक्की भेट द्या..

आमचे जीवलग मित्र बंधुतुल्य दैनिक विद्यासंस्कार चे संपादक आणि श्रेष्ठ समाजसेवक आनंदी उत्साही व्यक्तिमत्त्व सन्माननीय हेमं...
01/09/2024

आमचे जीवलग मित्र बंधुतुल्य दैनिक विद्यासंस्कार चे संपादक आणि श्रेष्ठ समाजसेवक आनंदी उत्साही व्यक्तिमत्त्व सन्माननीय हेमंतजी बळवंत कुळकर्णी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. श्रावी मिडिया अँड फिल्म प्रॉडक्शन्स तर्फे भावपुर्ण आदरांजली...
😭😭😭😭 Hemant Kulkarni

12/07/2024

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' गोष्ट… 'घरत गणपती'

कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने नात्यांचे बंध जपत उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही. याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन 'घरत गणपती' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होत असतो. हाच धागा घेऊन सर्वांगसुंदर अशी ‘लंबोदर’ कथा 'घरत गणपती' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कोकणातल्या एका सुखवस्तू कुटुंबातील ही गोष्ट आहे. घरातील गणपतीच्या निमित्ताने घरत कुटुंबात घडणाऱ्या सहज-साध्या गोष्टी, ज्यात गमतीजमती आहेत, राग-लोभ आहेत, एकमेकांविषयी वाटणारी माया आहे.

चित्रपटाला साजेशी चार गाणी चित्रपटात असून 'माझा कोकण भारी' आणि 'नवसाची गौराई माझी' या गाण्यांना सोशल माध्यमावर उत्तम प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवी, समीर सामंत,अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अली, विशाल ददलानी, अभय जोधपूरकर, सायली खरे, ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स यांनी स्वरबद्ध केलं आहे.

‘घरत गणपती’ हा #कौटुंबिकचित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास व्यक्त करताना नात्यांचा हा प्रवास प्रत्येकाला समृद्ध करेल, असं #दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी सांगितलं.

#पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
‘ #घरतगणपती’ हा भव्य #मराठीचित्रपट २६ जुलैला सर्वत्र #प्रदर्शित होत आहे.
Shravi Media & Film Production Pune Karaoke Superstar

11/07/2024

सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशी येतोय 'बाई गं' चित्रपटातून 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवी कोरा, धमाल असलेला 'बाई गं' हा नवा चित्रपट येत्या १२ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ .आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे.

आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोड बदलणार आहे. एक अभिनेता आणि सोबत तब्बल ६ नायिका ही संकल्पनाच या सिनेमाची उत्सुकता वाढविणारी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.

दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू ठरणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असून यामध्ये तो वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा अफलातून अभिनेत्री 'बाई गं' चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सोबतच सागर कारंडे देखील विशेष भूमिकेत असणार आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. तर, गाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सामंत यांनी लिहीली आहेत. वरुण लिखते यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे.
#बाई #बाईगं Shravi Media & Film Production Pune Karaoke Superstar

11/07/2024

हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्याच्या प्रमोशनसाठी मुख्य कलाकार अभय वर्मा आणि शर्वरीसह चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार पुण्यात

मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांची आणि प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार मुख्य कलाकार अभय वर्मा आणि शर्वरीसह प्रमोशनसाठी पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंडमध्ये येथे आले होते. यावेळी सर्वांनी पत्रकार परिषदेत उपस्थित माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले, “आधुनिक प्रेक्षकांना चित्रपटात वेगळ्या प्रकारचा आशय हवा आहे, हे लक्षात घेऊन आम्ही हा चित्रपट बनवला आहे, ज्यामध्ये भयपटांसोबतच प्रेक्षकाचा विशेष कल आहे विनोदी चित्रपटांना हा चित्रपट आवडेल.

या कथेबद्दल बोलताना अभिनेता अभय वर्मा म्हणाला, "मुंज्या हा सिनेमा चेतुकवाडीच्या कथेवर आधारित आहे, जे एक शापित ठिकाण आहे. मुंज्या ही चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा आहे, ज्याची हाडे या ठिकाणी म्हणजेच चेतुकवाडीत कोरलेली आहेत. खरं तर मुंज्याला .मुन्नी नावाच्या मुलीशी लग्न करायचे असते परंतु त्याआधी तो मरण पावतात आणि मुंजा हा नेहमी सूर्यास्तच्या नंतर येतो. तो मुन्नीशी लग्न कसे करेल का हे पाहणे अतिशय मजेदार आणि रोमंचकारी असणारे आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी शर्वरी म्हणाली, "मी खात्रीने सांगू शकते की, हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक दशकांना खिळवून ठेवेल. एकीकडे हा चित्रपट तुम्हाला घाबरवणार आहे, तर दुसरीकडे तुम्ही मोठ्याने हसेन मी चित्रपटाला प्रेक्षकांच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहे.

मॅडॉक फिल्म्सचा नवीन हॉरर-कॉमेडी चित्रपट मुंज्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. दरम्यान, दिनेश विजन आणि अमर कौशिक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. योगेश चांदेकर यांनी त्याची कथा लिहिली आहे. चित्रपटात अभय वर्मा आणि शर्वरीशिवाय मोना सिंग आणि एस सत्यराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची आणि प्रेक्षकांची खूप प्रशंसा केली. नुकतेच 'तरस' हे चित्रपटातीळ पहिले गाणेही रिलीज झाले असून, या गाण्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे.

हा चित्रपट 7 जून 2024 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल आहे.
Shravi Media & Film Production

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Shravi Media & Film Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shravi Media & Film Production:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share