06/07/2025
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील शिरवळ,दावकोण येथे चार गावांतील ११५ शेतकऱ्यांनी ३४ हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली आणली आहे, ज्यामुळे गोव्यातील हे सर्वात मोठे क्षेत्र सामुदायिक शेतीखाली पुनरुज्जीवित होणार आहे. भारत सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या पाणलोट विकास घटकाच्या बॅनरखाली विभागीय कृषी कार्यालय धारबांदोडा यांनी गोवा सरकारच्या कृषी संचालनालयाच्या सामुदायिक शेती योजनेच्या सहाय्याने हा प्रकल्प राबविला आहे.