Yuva Mashal News

  • Home
  • Yuva Mashal News

Yuva Mashal News निर्भीड निपक्ष आपल्या हक्काचा न्यूज चॅनल

03/11/2025

रविराज साबळेपाटील प्रकरणी धाराशिव मध्ये दिव्यांग प्रहारचा ज्वालामुखी! जिल्हाधिकारी दरबारी आक्रमक निषेध

उस्मानाबाद |

रविराज साबळेपाटील यांच्या हत्येप्रकरणी सोशल मीडियावरून सुरू असलेल्या भ्रामक, दिशाभूल करणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रचाराविरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) तर्फे आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते एकत्र जमले आणि प्रशासनाविरुद्ध प्रखर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “प्रशासन जागं हो! दोषींवर कारवाई करा!” अशा घोषणांनी वातावरण तापले.

या वेळी बाळासाहेब कसबे, महेश माळी, दिनेश पोतदार, इसाक शेख, शब्दार्थ सय्यद, इलाही शेख, सिद्राम पवार, नागराज मसरे, पैगंबर मुलानी, धनंजय खांडेकर, विकास शिरसागर, गौतम दुधे, बाबासाहेब भोईटे, दत्ता पवार, विठ्ठल चव्हाण, नाना इंगळे आदींसह प्रहारचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, काही व्यक्ती सोशल मीडियाद्वारे शेतकरी समाजात तणाव निर्माण करण्यासाठी खोटे आरोप व भडकावू पोस्ट्स करत आहेत. या समाजविघातक कृतींवर तात्काळ कारवाई करून संबंधितांवर IT Act आणि BNS कलम 197(1)(D) नुसार गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी संघटनेने केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी, संघटनेने स्पष्ट इशारा दिला — “जर शासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर पुढील पाऊल अधिक तीव्र असेल!”

सोशल मीडियावरून शेतकरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रारधाराशिवमध्ये प्रहार संघटनेतर्फे...
02/11/2025

सोशल मीडियावरून शेतकरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

धाराशिवमध्ये प्रहार संघटनेतर्फे निवेदन सादर; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
धाराशिव (प्रतिनिधी):
रविराज साबळे-पाटील या व्यक्तीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी समाजात संभ्रम आणि तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून सायबर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या संदर्भात जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, शहराध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार आणि दत्ता पवार आदींनी संयुक्त निवेदन सादर केले.

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती रविराज साबळे-पाटील हे सध्याच्या शेतकरी आंदोलन, शेतकरी नेते आणि सरकार यांच्यातील चर्चांवर तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये सोशल मीडियावर करत असून, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष आणि गोंधळ निर्माण होत आहे. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यातील बैठकांचा चुकीचा अर्थ लावून अफवा पसरवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “सध्याच्या काळात शेतकरी अतीवृष्टीमुळे अडचणीत आहे. त्याला मदत मिळावी म्हणून शेतकरी नेते सरकारशी संवाद साधत आहेत. मात्र, संबंधित व्यक्ती हे आंदोलनाशी कोणताही संबंध नसताना चुकीची माहिती पसरवत आहेत, ज्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो.”

तक्रारीत संबंधित व्यक्तीवर BNS कलम 197(1)(D) तसेच IT Act अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात रविराज साबळे-पाटील यांचा इंस्टाग्राम लिंक व मोबाईल क्रमांक (9021361877) नमूद करण्यात आला असून, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

🔹 निष्कर्ष:
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील दिशाभूल करणारी माहिती ही संवेदनशील ठरू शकते. त्यामुळे सायबर पोलिसांकडून याप्रकरणी तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा शेतकरी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.

माणुसकी, सेवा आणि समर्पण यांचं प्रतीक — कोरोना काळात मानवतेचा दीप पेटवणारा धाडसी युवक प्रशांत बापू साळुंके नगरपालिकेतून ...
02/11/2025

माणुसकी, सेवा आणि समर्पण यांचं प्रतीक — कोरोना काळात मानवतेचा दीप पेटवणारा धाडसी युवक प्रशांत बापू साळुंके नगरपालिकेतून जनसेवेसाठी सज्ज

धाराशिव -
धाराशिव नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय समीकरणांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक 04 हा यंदा सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. या प्रभागात जनतेचा विश्वास संपादन केलेले नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि समाजसेवक प्रशांत उर्फ बापू साळुंके. “80% समाजकारण आणि 20% राजकारण” या विचारधारेनुसार काम करत त्यांनी गेल्या 22 वर्षांत जनतेच्या सेवेला स्वतःला वाहून घेतले आहे. कोरोना काळात जेव्हा लोक भयभीत झाले होते तेव्हा बापूंनी गरजू रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे, ऑक्सिजन आणि औषधांची व्यवस्था करणे, भाजीपाला व वाफेच्या मशीन पोचवणे अशा अनेक कार्यातून मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवला. प्रभागातील मुस्लिमबहुल भागात 35-40 वर्षे थांबलेली विकासकामे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पूर्ण करून दाखवली. रस्ते, नाले, वीज केबल टाकणे, पावसाच्या पाण्याचा निचरा या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. धर्म आणि मानवतेचा सेतू बांधत ईदच्या वेळी इफ्तार पार्टी तसेच दिवाळीत हिंदू-मुस्लिम फराळ सोहळे आयोजित केले. लसीकरण मोहीमा, आरोग्य शिबिरे, रेशन कार्ड, आधार, निराधारांना शासकीय मदत अशा शेकडो उपक्रमांतून जनतेच्या घरपोच सेवा दिल्या. दरवर्षी “संकल्प” रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. नवरात्र उत्सव, हिंदू संस्कृती संवर्धन, महिलांसाठी फिजिओथेरपी शिबिरे अशा विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी धाराशिवमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रशासन आणि राजकारण यांची जोड घालून अधिकारी वर्गासमोर जनतेचा हक्क मिळवून देणारा ठाम लढवय्या चेहरा म्हणजे प्रशांत बापू साळुंके. प्रामाणिकपणा, धैर्य आणि जनसेवेची निष्ठा यांच्या बळावर या वेळेस प्रभाग 04 मधील निवडणूक एकतर्फी बापूंच्या बाजूने झुकलेली असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे. धाराशिवसाठी एक प्रामाणिक, जनतेशी निगडीत, कार्यक्षम नेतृत्व उभं राहत आहे — प्रशांत बापू साळुंके!

02/11/2025

गैरसमज पसरविण्यासाठी देवेंद्र फडणीस सारखा हुशार माणूसच नाही - मनोज जारांगे पाटील

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार; राजमाता जिजाऊ चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनशिवसेना जिल्हाप्रमुख य...
01/11/2025

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार; राजमाता जिजाऊ चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या प्रयत्नांना यश

धाराशिव -
धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते सांजारोड भवानी चौक या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. कायम रहदारी असलेल्या या मार्गाच्या कामाला एमएसआयडीसी अंतर्गत हायब्रीड अ‍ॅन्युटीमधून मंजुरी मिळालेली असून धाराशिव शहराची खड्डेमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक, आर्य समाज चौक, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक या मार्गावर कायम रहदारी असते. याच मार्गावर बहुतांश शाळा आणि कॉलेज आहेत. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत नेहमी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्याचबरोबर या मार्गावर व्यापारी संंकुल आहेत. या रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होेती. त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे सतत पाठपुरावा करून निधी मंजूर करवून घेतला. त्यानंतर शुक्रवारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संघटक सुधीर (अण्णा) पाटील, धाराशिव शहरप्रमुख आकाश कोकाटे यांच्यासह शिवसेनोचे प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

01/11/2025

धाराशिव: मारहाणीच्या घटनेनंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल

धाराशिव शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता दोन्ही पक्षांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत

बातमी लिंक कॉमेंट मध्ये

01/11/2025

तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे मागील वादातून जीवघेणा हल्ला — युवक जागीच ठार!

तुळजापूर तालुक्यातील केशेगावमध्ये भर दिवसा खून!
३५ वर्षीय सिद्धाराम दहिटणे यांचा कुऱ्हाडीने वार करून जागीच मृत्यू.
आरोपी निखिल कांबळे पोलिसांच्या ताब्यात.
मागील वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती.
📹 घटना सीसीटीव्हीत कैद, गावात भीतीचे वातावरण!

01/11/2025

राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून चोरी करणारी अंतरजिल्हा टोळीच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या

reels

01/11/2025

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांचा धाराशिव नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर वर्क ऑर्डर देण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप



31/10/2025

प्रभाग क्रमांक 18 मधून जनसेवक इरफान भाई कुरेशी काँग्रेस पक्षा कडून निवडणूक लढवीणार जनतेतून जोरदार चर्चा.

31/10/2025

आ. राणा पाटील व खा. ओमराजे निंबाळकर हे विरोधक नसून एकच आहे लवकरच पुरावे देणार : शिवसेना नेते सुधीर पाटील यांचा मोठा वक्तव्य

31/10/2025

धाराशिव येथे शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा एकच नाण्याचे दोन बाजू

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Mashal News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuva Mashal News:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share