30/06/2024
“सर,येणार काय हिमालयीन सायकलिंग expedition ला?” अभिजित ने ऑफिस मधेच विचारले.क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो “जाऊया!”Adventure म्हंटलं कि मी सदैव तयार असतो.बेसिक इन्फॉर्मशन घेऊन मी ऑफिसच्या कामात गुंतलो.युथ हॉस्टेल सोबत ट्रेकिंग वा ऍक्टिव्हिटी करण्याची संधी आयती चालून आली होती.
निघण्याची तारीख जवळ येत होती.मी पूर्वीपासून सायकलिंग साठी खूप excited होतो.माझ्या ऍमेझॉन च्या कार्ट मध्ये बराचश्या सायकलिंग रिलेटेड accessories पडल्या होत्या.पण फायनल ऑर्डर दिली नव्हती.तसेही आता ऑर्डर देऊन काही उपयोग नव्हता;कारण डिलेव्हरी मी जलोरी पास ला पोचल्या वर झाली असती कदाचित! म्हणून आदल्या दिवशी घाटकोपरच्या Decathlon मध्ये गेलो.काय घ्यायचं आधीच ठरलं असल्यामुळं मुळे फटाफट एका तासात शॉपिंग आटोपली
तत्पूर्वी त्या दिवशी ऑफिस मध्ये ‘Safe Structure ‘ नावाची miniature मॉडेल बनवण्याची कॉम्पिटिशन होती.मी भाग घेतला होता आणि सुदैवाने म्हणा कि दुर्दवाने आमच्या ग्रुप चा लीडर मीच होतो.माझं अर्ध लक्ष रुटीन प्रोजेक्ट वर्क वर ,थोडं सायकलिंग च्या शॉपिंगवर आणि राहिलेलं थोडं लक्ष कॉम्पिटिशन वर होतं.कुणीतरी पृथ्वी एवढ्या आकाराचा हातोडा करून माझ्या डोक्यावर ठेवलाय अशी अवस्था झाली होती!
निघण्याच्या दिवशी बॅग भरण्यासाठी मी ऑफिस ला दांडी मारली.संध्याकाळी 6 ची flight होती मुंबईहुन दिल्ली साठी.लक्ष्मीथ,मी,अभिजित आणि अजिंक्य उबेर ने एअरपोर्ट ला पोचलो;तिथे आदित्य आणि अशोक आम्हाला जॉईन झाले.सगळ्या formalities कंप्लिट करून airport lounge मध्ये बसलो.मग सेल्फी स्टिक ने सेल्फी काढून फेसबुक वर चेक इन करून ‘going फॉर हिमालयीन सायकलिंग ;फीलिंग excited’ चा कार्यक्रम पार पडला;तितक्यात flight 45 मिनिट्स लेट झाल्याचं कळले. ट्रिप जास्तच adventurous होणार याची चुणूक आत्ताच आली.वेळ घालवण्यासाठी KFC मध्ये जाऊन चिकनच्या लेग piece वर ताव मारला.
दिल्ली एअरपोर्ट वर AHA टॅक्सिस वर आधीच बुक केलेली कार आम्हाला न्यायला आली होती.बॅगा कॅरेज वरती बांधून ,गाडी मनाली च्या दिशेने सुसाट निघाली.श्रीवास्तव;Chevrolet Enjoy चा ड्राइवर इस्कॉन चा भक्त निघाला.त्याने कार मध्ये वेगवेगळ्या foreign लोकांच्या आवाजातील ‘हरे राम हरे राम ,राम राम हरे हरे’ चे चॅटिंग चे music लावले.थोडं गप्पा गोष्टी करून मी माझा मोबाईल कनेक्ट केला आणि माझ्या मोबाईल मधली गाणी चालू केली.वेगवेगळ्या गाण्यांच्या ट्रॅक ने ड्राइवर सहित सर्वजण मूड मध्ये आले.सोनिपत,पानिपत,कर्नाल,चंदीगड क्रॉस करून हिमाचल च्या बॉर्डर ला गाडी लागली. हायवे वर नॉन-व्हेज ढाबा शोधून,थकून शेवटी रात्री एक वाजता व्हेज धाब्यावर गाडी थांबवली.”यहाँ सब व्हेज मिलता है साबजी” श्रीवास्तव हसत बोलला.
रात्रभर गाणं ऐकत,गप्पा रंगल्या होत्या.मोदी पासून ते राज ठाकरे आणि बरेच विषय.राज ठाकरेंबद्दल तिकडच्या लोकांमध्ये अजूनही कुतुहूल होते.बाळासाहेबांना तर खूप चांगलं बोलतात हे ड्राइवर च्या बोलण्यातून जाणवलं.कोणत्याही ट्रिप मध्ये ड्राइवर ला खुश ठेवणं हे मी परम कर्तव्य मानतो. https://marathijodi.co.in/%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-expedition