31/10/2025
भारताने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. भारताच्या एकीकरणामागील प्रेरणादायी शक्ती म्हणून त्यांनी आपल्या राष्ट्राच्या घडणीच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राष्ट्रीय ऐक्य, सुशासन आणि लोकसेवेबद्दलची त्यांची निष्ठा आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देते. त्यांच्या एका सशक्त, एकसंघ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून राहण्याचा आपला सामूहिक संकल्प आज आपण पुन्हा दृढ करु. जगातील सर्वात उंच भव्य दिव्य पुतळा," स्टॅच्यू ऑफ युनिटी" या नावाने ओळखला जातो .यावरूनच त्यांची आघात कीर्ती आणि आपले पंतप्रधान श्री .नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलेले आदरांजली, केवडिया येथे गेल्यावर त्यांच्या दिव्य भव्य प्रतिमेचे दर्शन, त्यांचा जीवन प्रवास, नर्मदेचा प्रवाह ,यातून त्यांनी सर्व भारताची केलेली विविधतेतून एकता, ह्याचे सर्वोच्च दर्शन व संध्याकाळचा साऊंड लाईट शो त्यांची पूर्ण जीवनगाथा दाखवून देते. राष्ट्र प्रेमाने पुलकित होऊन भारावून जाते. अशा या लोहपुरुषास कोटी कोटी नमन.🌹⚘️ हा परिसर अतिशय सुंदर, भरपूर लोकांना रोजगार उत्पन्न करून देणारा, कमालीची स्वच्छता व अटीतटीचे नियम, महिलांना रोजगाराची आणि उत्पन्नाची भरपूर संधी, सर्व गोष्टींनी आपल्या पंतप्रधानांची गुजरात राज्यावर व देशावर असलेली पकड आणि विकासाकडे चाललेला भारत याचा पूर्ण साक्षात्कार होतो.