Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़

  • Home
  • Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़

Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़ Lokvruttant Media is covering its fascinating namesake without fear or favour with insight accuracy. We bring to you news online.

30/06/2025

वर्तक नगर येथील बाधीत झालेल्या ८० गाळे धारकांनी सोमवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर वर्तकनगर शॉपकिपर्स सोसायटीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. पीपीपी तत्वावरील पुर्नबांधणीस ठाणे महापालिकेकडून होत असलेल्या दिंरगाई बाबत, अनाधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यासाठी हे उपोषण करण्यात आल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली. Vikrant Chavan Rahul Gandhi

30/06/2025

पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिंणी पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते. Pratap Sarnaik Thane City Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Shivsena - शिवसेना Naresh Mhaske

30/06/2025

नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आज पक्षप्रवेश झालेल्यामध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. Thane City Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़ Naresh Mhaske Shivsena - शिवसेना Pratap Sarnaik

30/06/2025

महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिक क्रीडाविश्वाशी जोडणाऱ्या प्रो गोविंदा लीग सीझन ३ ची शानदार सुरुवात ठाणे येथे झाली. यंदाच्या पात्रता फेरीनंतर १६ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून, ७ ते ९ ऑगस्टदरम्यान मुंबईतील डोम एसव्हीपी, वरळी येथे ही महाअंतिम स्पर्धा रंगणार आहे.या लीगमध्ये राज्यभरातून आलेल्या ३२ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. त्यांनी शिस्त, ताकद आणि टीमवर्कचे उत्तम प्रदर्शन करत आपले कौशल्य सादर केले. यंदाचा हंगाम अधिक भव्य होत असून, ही लीग राष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहे. Thane City Shivsena - शिवसेना Pratap Sarnaik Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

*संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत  युतीसाठी विनवण्या करण्याची उबाठा गटावर आली वेळ*  *नाशिकमध्ये एकनाथ शिंदे या...
29/06/2025

*संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत युतीसाठी विनवण्या करण्याची उबाठा गटावर आली वेळ*

*नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला जोर का धक्का...*

*उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह सात नगरसेवक आणि अनेक सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश*

ठाणे :- नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आज पक्षप्रवेश झालेल्यामध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. तर त्यांच्याशिवाय उबाठा उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये, सरपंच रमेश भोये, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन कर्डीले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना, विलास शिंदे यांच्याकडे मी लग्नाला गेलो तेव्हापासून मला त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार असा प्रश्न प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विचारत होते. मात्र त्यांनी आजचा दिवस निवडला. आज त्यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्याने नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल अशी खात्री वाटत असल्याचे सांगितले.

आज विलास शिंदे यांचा पक्षप्रवेश होत असताना काहींनी सकाळी बोलताना कोण विलास शिंदे असा प्रश्न विचारला..? अयोध्येत जाताना त्यांना सोबत विलास शिंदे हवा होता, निवडणुकीत काम करताना विलास शिंदे हवा होता, वारंवार आपल्याला एकत्र काम करायचे आहे असं त्यांना सांगितले जात होते. मात्र आता इथे पक्षप्रवेश करणार हे निश्चित झाल्यावर कोण विलास शिंदे असे विचारले जात आहे..? असेच धोरण राहिले तर एक दिवस तुम्ही कोण ? असा प्रश्न लोकं विचारल्याशिवाय राहणार नाहीत. काही जण 'कम ऑन किल मी'.. म्हणत आहेत मात्र त्यांची अवस्था आज 'शोले' सिनेमातील असरानीसारखी झाली आहे. त्यामुळे जेव्हा ते प्रत्यक्ष मैदानात लढायला उतरतील तेव्हा मागे कुणी राहील की नाही ते सांगता येत नाही. प्रत्येक दिवशी होणारी गळती थांबवायची कशी असा प्रश्न उबाठा यांना पडला आहे. त्यामुळे अगतिक होऊन ज्यांची संपलेला पक्ष अशी अवहेलना गेली त्यांनाच सोबत घेऊन आज युती करण्यासाठी विनवण्या कराव्या लागत असल्याचे सांगितले.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, किशोरअप्पा करंजकर, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबाडे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन-२०२५'च्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात उपम...
29/06/2025

विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन-२०२५'च्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या साथीने चहापानाचा आस्वाद घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे आणि इतर सहकारी आमदार उपस्थित होते.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share