Digital Maharashtra - डिजिटल महाराष्ट्र

  • Home
  • Digital Maharashtra - डिजिटल महाराष्ट्र

Digital Maharashtra - डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चैनल

01/11/2025

मी राज ठाकरेंच्या छातीवर चढेन, सुरक्षा रक्षकांचे आव्हान

01/11/2025

ठाण्यातील उपवन तलावात आसणाऱ्या विठ्ठलाच्या भव्य मूर्ती चे आकर्षण रूप !

01/11/2025

राज ठाकरे यांच्या West End Hotel Churchgate येथे आगमन.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांसोबत लोकलने प्रवास
01/11/2025

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांसोबत लोकलने प्रवास

31/10/2025

अमृत नगर कबरस्थान प्रकरणात दोन्ही पक्षाच्या विरोधात कारवाईची मागणी — माजी विरोधीपक्षनेते शानू पठाण यांच्यासह पदाधिकार्‍यांकडून मुंब्रा पोलिसांना निवेदन !

31/10/2025

नईम खान यांचा मोठा खुलासा! — जफर नुमानींसोबत काय बोलणं झालं, रेकॉर्डिंगद्वारे समोर!

31/10/2025

“मुंब्रा अमृता कबरस्थान प्रकरणावर जमेतुल मुस्लिमिन पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद — सत्य समोर आणण्याची मागणी”

31/10/2025

भुसावळमध्ये संताप: छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान – पोलिसांवर विरोधाचा आरोप!

भुसावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
आज, ३० ऑक्टोबर २०२५, रोजी नागरिकांच्या वतीने अपर पोलीस महासंचालक श्री. नवल बजाज यांना या संदर्भात माहिती देण्यात आली.

नागरिकांनी सांगितले की, पोलिस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या नाकाखाली अवैध धंदे सुरू असून, या सर्व गोष्टींची माहिती देताना बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ येथील पोलिसांनीच आमचा विरोध केला.

प्रश्न उपस्थित केला जात आहे —
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू देण्यास अडथळा का आणला?

स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.

31/10/2025

ठाण्यात महिला कार्यकर्तीला मारहाण — अजितदादा गटावर आरोप!

अजित पवार गटातील महिला रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.

पीडितेचा आरोप आहे की, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली तिच्यावर हल्ला करण्यात आला.
स्थानिकांनी संताप व्यक्त करत म्हटलं — “सत्तेची मस्ती लवकर उतरवू!”

31/10/2025

कल्याण ग्रामीण मतदार यादीत १७ हजार दुबार नावे; "ज्यांनी चोरी केली तेच तक्रार करायला येतील?" — मनोज प्रधान

आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक २०२५ स्पर्धेतील दुसरा उपांत्यफेरी सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. या रो...
30/10/2025

आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक २०२५ स्पर्धेतील दुसरा उपांत्यफेरी सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित षटकांत ३३८ धावांचा डोंगर उभारला.

तथापि, भारतीय महिला संघाने खऱ्या अर्थाने विजयाचा झंझावात उभा केला. जेमिमा रॉड्रिग्जने जबरदस्त खेळी करत १२७ धावांची शानदार शतकी खेळी केली, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या नेत्रदीपक ८९ धावांच्या खेळीने संघाला भक्कम आधार दिला. दोघींच्या उत्कृष्ट भागीदारीसह इतर फलंदाजांच्या मोलाच्या योगदानामुळे भारताने ३३८ धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला.

या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संपूर्ण भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. आता लवकरच होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत विजयी होईल, असा ठाम विश्वास आहे. संपूर्ण महिला क्रिकेट संघाला हार्दिक शुभेच्छा..!!

30/10/2025

मुंब्रा हकीम अजमल खान हॉस्पिटलच्या कोरोना कर्मचाऱ्यांचा आवाज — कायम नोकरीसाठी राजन किणेंकडे धाव
Rajan Narayan Kine

Address

1, Digital Maharashtra Office, Near Aadarsh School, Achanak Nagar, Shankar Mandir, Mumbra. Thane

400612

Opening Hours

Monday 00:00 - 18:00
Tuesday 00:00 - 18:00
Wednesday 00:00 - 18:00
Thursday 00:00 - 18:00
Friday 00:00 - 18:00
Saturday 00:00 - 18:00

Telephone

8286190195

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Maharashtra - डिजिटल महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Maharashtra - डिजिटल महाराष्ट्र:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

आपल्या हक्काचं मराठी न्यूज चैनल

नमस्कार..

मी रोहित शिर्के, ‘डिजिटल महाराष्ट्र’ या चैनलचा संपादक आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या हितासाठी किंवा आपल्या हक्काचं चैनल वाटावे अश्या चैनलची सुरूवात करावी असे वाटत होते. मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. अनं पत्रकारीता सोडून राजकारणात प्रवेश केला. मात्र तीचं संधी नकळत मला 1 जानेवारी 2019 साठी चालून आली. अनं पुन्हा राजकरणातून पत्रकारीतेत प्रवेश केला. खरचं मला सुद्धा विचारात पडण्यासारखा दिवस होता. ज्यावेळी आपल्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ या सोशल मीडिया चैनलचा शुभारंभ करण्यात आला. भूतकाळात पाहिलेले स्वप्न भविष्यात नक्कीचं पूर्ण होतात, याची जाणीव झाली व इंटनशिप करण्याऱ्या मुलींना घेवून चैनलची सुरूवात केली.

ह्या चैनलची सुरूवात करताना कमीत-कमी बातम्या, जास्तीस-जास्त चांगल्या बातम्या, अप्रतिम मुलाखती, सर्वसामान्य घरातील हिरे शोधण्याचा प्रयत्न, गरजूंना मदतीचा हाथ, सरकारी योजना बातमीद्वारे घराघरात पोहचवणे, सेल्फ रिपोर्टींग, तसेचं विचारवंताना समोरासमोर बोलण्याची संधी यांसारख्या असंख्य गोष्टी आहेत. मात्र चैनल सुरू करण्याची जिद्द, खिश्यात नाही पुरेल ऐवढा पैसा तरीही लढण्याची धमक, अशा स्वत:वर अभिमान वाटेल. अश्या नकळत घडत असलेल्या गोष्टी सुद्धा आहेत. त्यामुळे हा चैनल आपल्या समोर सुरू करणे शक्य झाले.

महाराष्ट्रमध्ये जन्मले असल्याचे गर्व, देशाचे नाव संपूर्ण जगात मोठे व्हावे, म्हणजेचं आपण काही तरी समाजाला देण लागतो, या सर्व गोष्टी मनापासून वाटत असल्याकारणाने पत्रकारीतेच्या माध्यमातून माहितीजनक गोष्टींचा विचार व प्रसार करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे. मात्र साथ जनसामान्यांची असणे तेवढेचं महत्वाचे. येणाऱ्या दिवसातं काही तरी नविन, काही तरी वेगळे, घेवून येण्याचा प्रयत्न आपल्या समोर करणार आहे. मात्र त्यात कुठे चुकते व कुठे बरोबर याची जाणीव आपण नक्की करून द्यावी. तरचं ‘‘आपल्या हक्काचं मराठी न्यूज चैनल’’ ची टॅगलाईन सार्थ ठरेल.