29/02/2024
जळगावचे अती जलद कलेक्टर
महा संस्कृती महोत्सवात तोंडघशी ...
मागील आठवड्यात नांदेड येथे तेथील कार्यक्षम कलेक्टर व जळगावचे माजी कलेक्टर अभिजीत राऊत यांनी महा संस्कृती महोत्सवाचे अत्यंत शानदार नियोजन केल्याची पोस्ट व काही VDO शेअर केले होते. त्यातुलनेत जळगावला होत असलेल्या हा संस्कृती महोत्सवाचे अत्यंत ढिसाळ नियोजन करणाऱ्या अती जलद कलेक्टर यांच्या संकुचित मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. केवळ फोटो, VDO आणि फेसबुकच्या अडकलेल्या या प्रशासनाच्या महोत्सव नियोजनाविषयी खासदार उन्मेष पाटील यांनी खडे बोल सुनावले आहे.
महा संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन काल पोलीस कवायत मैदानावर होते. जवळपास ६ हजार खुर्च्या लावलेल्या होत्या. उपस्थिती केवळ ७००\८०० होती. या महोत्सवात बचत गटाच्या महिलांच्या सेवा - वस्तूंचे प्रदर्शन आहे. त्याला काहीही प्रतिसाद नाही. हे सारे पाहून खासदार उन्मेश पाटील अती जलद कलेक्टरांना म्हणाले 'हे नियोजन आहे का ? महोत्सवाला नागरिक आलेले नाहीत. गर्दी नाही. महोत्सवाची प्रसिद्धी झालेली नाही !' सरकारचा पैसा विनाकारण खर्च होतो आहे असेही ते म्हणाले.
खासदारांनी तेथेच अती जलद यंत्रणेचे कान उपटले हे बरे झाले. पण प्रशासन आता ठेकेदारावर रोष काढेल.अती जलद कलेक्टर यांनी नियोजन केलेल्या अमळनेर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या व्यवस्थेतील नियोजनाचेही असेच वाभाडे निघाले आहेत. जे स्वतःच, स्वतःच्या फोटोंच्या प्रेमात असतात, ते फक्त जिल्ह्याचा विकास अती जलद करु असे बोलतात. कृतीत मात्र बोंब असते ... _(कलेक्टर जाहीरपणे दिलगीरी व्यक्त करताहेत असाही VDO आहे म्हणे)_
*VDO - सहकार्य खान्देश प्रभात*