29/05/2025
भिक नको पण कुत्र आवर...हिच त्यांचा बोलण्यातून समाजातली आजची अवस्था स्पष्ट शब्दात व्यक्त होत आहे
अशाच समाजातील मत आणी अवस्थे मुळे हजारो वैष्णवीताई सारख्या बहिणी सरसकट तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खात खितपत संसार करत असतील कारण तिचा बाप हतबल असतो सामाजिक भितीतुन इज्जत जाईल म्हणुन adjustment कर बाळा होईल सर्व निट जाऊदे बघु असे कठीण आणी अवजड शब्दांचा वापर जे त्या बापाचा हृदयावर प्रचंड तणाव आणणारे असतात तरिही दगड ठेवुन तो मुलीची समजुत काढत असतो आणी शेवटी एक दिवस....शिल्लक राहतो पश्चाताप फक्त....त्या वेळी कुणाही समाज हा 13 दिवसा पलिकडे सांत्वन करायला येत नाही आणी सुरु होते कायद्याची लढाई ज्यात तिचा प्रेतावर तिचा आत्म्यावर शिंतोडा उडवायला सुरु होते...हे वर्षानुवर्ष चालत आलय जे बदलायलाच हव समाजमनातील दुशितता हि स्वच्छ व्हायलाच हवी #वैष्णवीताई असेल वा कस्पटे परिवार असे अनेक उदाहरण आहेत रोज किमान दह तरी अशी प्रकरण होत असतात आणी ति व्यभिचारी होती असे शिंतोडे उडवून तिलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो हि आपल्या कायद्यातील पळवाट शोधुन शोधुन तीला व्यवस्थीत करायलाच हवे......म्हणजे समाजघातक घटक वाचवणारे आणी त्यांना पुन्हा नवीन बळी घेण्यासाठी मोकाट सोडणारे पुन्हा असे वागायला नको की मुलिचा बापाला अस म्हणाव लागेल भिक नको पण कुत्र आवर नको तो न्याय पण माझा मेलेल्या मुलीची अब्रु तरी वेशीला टांगु.....कडवट वाटेल पण अवघड नाही 🙏🏻