Sunil Dmello Videos

Sunil Dmello Videos Thank you for visiting our page. We love making videos on traveling, history, trekking, cooking, cy

06/06/2026

हे नक्की काय आहे

वसईतील इग्नेशियस विला पाहायला गेलेलो असताना आमच्या दृष्टीस हे मातीचं दुर्मिळ भांडं पडलं. वसई, कोकण व मंगलोर परिसरातील लोकांची एक पारंपरिक भाकरी बनवण्यासाठी या भांड्याचा उपयोग केला जात असे.

तुमच्या परिसरात या भांड्याला काय म्हणतात? तुम्ही अजूनही या पारंपरिक भाकऱ्या करता का? नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा.

धन्यवाद!


02/06/2026

इग्नेशियस व्हिला आणि ५० वर्षांपूर्वीचे रहस्य | Ignatius Villa and the mystery of 50 years ago

अनेकदा आधुनिकतेच्या नावाखाली आपण जुना वारसा विसरून जातो, पण वसईमध्ये एक असं घर आहे जे तब्बल ८५ वर्षांनंतरही तितक्याच दिमाखात उभं आहे. आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 'इग्नेशियस व्हिला' या ऐतिहासिक वास्तूची सफर घडवायला. हे घर म्हणजे जुन्या संस्कृतीचे आणि वास्तूचे संगोपन कसे करावे याचे एक उत्तम उदाहरण आहे.

पण गोष्ट फक्त एवढ्यावरच संपत नाही! या देखण्या आणि शांत घराच्या भिंतींआड दडलेली आहे ५० वर्षांपूर्वी झालेल्या रहस्यमय चोरीची एक अनोखी कहाणी.

या विशेष व्हिडिओमध्ये तुम्हाला या घराचा सुंदर इतिहास आणि काही जुन्या वस्तू पाहायला मिळतील व खूप साऱ्या गप्पा गोष्टी ऐकायला मिळतील.

छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो

विशेष आभार:
इग्नेशियस व्हिला कुटुंबीय

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

यू ट्यूब शॉर्ट्स चॅनल
https://youtube.com/?si=UNtKL4Ierv8kBqqc

व्हॉट्सॲप चॅनल https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos

इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/sunil_d_mello/

जुन्या घरांचे इतर व्हिडिओज
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2&si=Yl7LEcSrfePrrjKH


30/05/2026

शंखातील प्राणी खेकडे खातात का

व्हिडिओची लिंक 👇🏼
https://youtube.com/shorts/gc47pmLAeZI?si=3Me5lU45913UZfLj

कोकणातील सर्जेकोट किनाऱ्यावर फिरत असताना माझ्या नजरेस हे खेकडे पडले आणि त्यांच्या बाजूला शंखातील एक प्राणी चालून येत होता. मला वाटलं हे खेकडे या शंखातील प्राण्याचे भक्ष आहे की काय? त्यामुळे मी थांबून त्याचं निरीक्षण केलं आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.

तुम्हाला निसर्गातील अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आकर्षित करतात का? या खेकड्यांविषयी आणि शंखातील प्राण्याविषयी विषयी अधिक माहिती असेल तर जरूर प्रतिक्रियाद्वारे कळवा.

धन्यवाद

27/05/2026

वसई गोव्याच्या मार्गावर

मंडळी, सध्या गोव्यातील कळंगुट परिसरात आहे आणि येथे पायी भटकंती करत असताना जे स्थानिक भेटले त्यांच्याशी केलेल्या गप्पा आणि त्यावरून काढलेला निष्कर्ष या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल.

आपली स्थानिक संस्कृती, रीती रिवाज, भाषा जपून ठेवायच्या असतील तर आपल्या जमिनी आपल्याकडेच असायला हव्यात, त्या विकता कामा नये असं मला वाटतं.

तुम्हाला काय वाटतं हे नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा.

धन्यवाद!

27/05/2026

कोकणात आम्ही कोणता रानमेवा लुटला

मंडळी, सध्या कोकणात सहलीवर आहोत आणि येथे आमच्या नजरेस बालपणी लुटलेला पण सध्या आमच्या वसईत दृष्टीस न पडणारा काजूच्या बोंडाचा रानमेवा आमच्या दृष्टीस पडला आणि आम्ही मनसोक्त लुटला.

तुम्ही देखील बालपणी काजूच्या बोंडावर ताव मारलाय का नक्की प्रतिक्रिया द्वारे कळवा.

धन्यवाद!

25/05/2026

मी कुठे आहे ओळखा पाहू

मंडळी, पुन्हा एकदा कोकणामध्ये फिरायला आलेलो आहोत आणि हा सुंदर समुद्रकिनारा आणि त्याच्यापासून काही फुटावर आम्ही एका सुंदर ठिकाणी राहत आहोत.

हा समुद्रकिनारा नक्की कोणता आहे तुम्ही ओळखू शकता का? समोर तुम्हाला एक दीपस्तंभ दिसतोय आणि त्याच्या पलीकडे एक जंजिरा म्हणजे पाण्यातील किल्ला दिसतोय यावरून तुम्ही हे ठिकाण ओळखू शकता का? नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा.

धन्यवाद!

20/05/2026

हे पाहून नक्कीच बालपण आठवेल

रायजलला म्युझिकक्लास वरून आणायला गेलेलो असताना रस्त्यावरून पिकलेल्या आंब्यांचा घमघमाट आला. रायझल, मी आणि ॲलीन आंबे शोधायला गेलो आणि मी बालपणीच्या आठवणीत रमून गेलो. बालपणीत आंबे जांभळं आणि इतर अनेक खायच्या वस्तू मिळवण्यासाठी अक्षरशः मुलांची झुंबड उडायची, मारामाऱ्या व्हायच्या. आता रस्त्यावर पिकलेले आंबे, जांभळं तशीच पडलेली पाहून खूप वाईट वाटतं. मुलांना, मोठ्या माणसांना ह्या पिकलेल्या आंब्या-जांभळांची कदरच नाही असं वाटतं.

तुम्ही तुमच्या बालपणी अशी धमाल केलेली आहे का? आता ही रस्त्यावर पडलेला आंबा पाहिला तर तो न उचलता तुम्ही पुढे जाऊ शकता की तो उचलल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही हे नक्की प्रतिक्रियाद्वारे कळवा.

धन्यवाद!

18/05/2026

पावसाची बेगमी

मे महिन्याची चाहूल लागली की आम्हा वसईकरांत आणि गावात राहणाऱ्या सर्व लोकांत पावसाळ्यामध्ये जेवणासाठी वापरणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करण्याची जणू स्पर्धाच लागते.

बऱ्याच वस्तू पावसाळ्यात मिळत नाहीत म्हणून त्या साठवून ठेवल्या जातात म्हणजे आंब्याचं लोणचं, कोलिम, पांढरे कांदे, सुके बोंबील, जवळा, मसाला अशा एक ना अनेक वस्तू सर्वजण भरून ठेवतात म्हणजेच साठवून ठेवतात. यालाच म्हणतात पावसाची बेगमी असे म्हणतात आणि ह्या सर्व वस्तू साठवून ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत असते.

आज अनिशा, कुपारी लोकांचं सुप्रसिद्ध रायांब्या लॉनसा, आंब्यायो शिरी म्हणजेच आंब्याचं लोणचं एका काचेच्या बरणीत भरून ठेवत आहे. याची रेसिपी तुम्हाला खालील लिंकवर गेल्यास मिळेल.

https://youtu.be/M_xsbKl5nmw?si=3g95iMM0qpigxJ4X

तुमच्या परिसरामध्ये तुम्ही पावसाची बेगमी म्हणून कोण-कोणत्या वस्तू साठवून ठेवता ते नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा.

धन्यवाद!

16/05/2026

मुंबईजवळ निसर्गाच्या कुशीतील Beach होम स्टे | Beach home stay in the lap of nature near Mumbai

ॲलीनने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही चिंचणी समुद्रकिनारी एका सुंदर होम स्टे मध्ये गेलो होतो. पश्चिम रेल्वेच्या डहाणूच्या दिशेने असलेल्या वानगाव स्थानकातून रिक्षाने अवघ्या १५-२० मिनिटांत या होम स्टेवर पोहोचता येतं.

हे टुमदार होम स्टे समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या शंभर दीडशे मीटरवर आहे, त्यामुळे येथे नेहमी आल्हाददायक वारा वाहत असतो. समोर फेरफटका मारण्यासाठी सुंदर नारळीबाग देखील आहे.

येथे अटॅच्ड बाथरूम असलेल्या स्वच्छ आणि प्रशस्त अशा पाच ए.सी. खोल्या आहेत. या होम स्टेची खासियत म्हणजे एका वेळेला ते फक्त एकाच ग्रुपची बुकिंग घेतात त्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रायव्हसी मिळते. खोल्या मोठ्ठ्या असल्यामुळे जमीनीवर गाद्या टाकल्यास एकावेळेला तब्बल २५ ते ३० माणसं येथे राहू शकतात.

सकाळी ११ वाजता चेक इन केल्यावर तुम्हाला दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा व नाश्ता, रात्रीचं जेवण तुमच्या मागणीनुसार वेज आणि नॉन वेज प्रकारात मिळतं. येथील जेवण अतिशय रुचकर आहे. जवळच्या मासळी बाजारातून मासे आणून दिल्यास काही दर आकारून तुम्हाला ते शिजवून देखील मिळतील.

होम स्टेच्या प्रशस्त गच्चीवर कॅरम, पत्ते किंवा इतर बरेच खेळ तुम्ही खेळू शकता आणि संध्याकाळी येथील सुंदर समुद्रावर धमाल करायला जाऊ शकता, जिकडे मुलांसाठी बरेच खेळ उपलब्ध आहेत व तिकडेच चौपाटीवरील चमचमीत पदार्थांवर तावदेखील मारू शकता. शिवाय निसर्गप्रेमींना येथील एका अनोख्या झाडांचं बन विशेष आनंद देऊन जाईल.

कुटुंबाच्या गेट-टुगेदरसाठी, महिलांच्या किंवा पुरुषांच्या ग्रुपसाठी, ऑफिसच्या आउटिंगसाठी, कोणत्याही छोट्यामोठ्या ग्रुपसाठी किंवा एखादा प्रसंग साजरा करण्यासाठी हे होम स्टे अत्यंत सोयीस्कर आहे.

तर मुंबईपासून अवघ्या दीड दोन तासांच्या अंतरावर असलेल्या बीच अँड ब्लिस या सुंदर होम स्टेचा अनुभव घेण्यासाठी खालील क्रमांकावर जरूर संपर्क साधा.

विशेष आभार:
बीच अँड ब्लिस (होम स्टे बुकिंग)
चिंचणी समुद्रकिनारा
९१३६०४३२३१ | ९८२०४३१४६७

वाणगाव स्थानक ते चिंचणी रिक्षासाठी
शाहरुख भाऊ ७८७५४२५८४५

छायाचित्रण व संकलन: अनिशा डिमेलो

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

यू ट्यूब शॉर्ट्स चॅनल
https://youtube.com/?si=UNtKL4Ierv8kBqqc

व्हॉट्सॲप चॅनल https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos

इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/sunil_d_mello/

Address

Vasai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil Dmello Videos posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sunil Dmello Videos:

Share

Category