Malvani Katta

सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग प्रदेश, यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे प्रमुख ध्येय आहे. "सिंधुदुर्ग जिल्ह्याची रूपरेखा"
सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळग

ाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाबोलीम (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत. "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास"

सिंधुदुर्ग जिल्हा हा 'कोकण' या उंच पठारी प्रदेशाच्या पश्चिमेला असून ऐतिहासीक रीत्या आपल्या आपल्या लांब तट रेखा आणि सुरक्षित बंदरे यांसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता. परंतु १ मे १९८१ पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास यांच्या साठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा २ जिल्ह्यात विभागीत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग अशा ८ तहसील केंद्रांचा समावेश होतो. 'कोंकण' हा शब्द मुळ भारतीय व पुरातन असून या नावाची पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

काश्मीरच्या हिंदू इतिहासामध्ये कोकणच्या सात राज्याच्या हिंदु पौराणिक कथा उल्लेख केलेल्या आहेत आणि भारताच्या जवळजवळ पूर्ण पश्चिम तटाच्या रुपात सामील केल्या आहेत. पांडवांनी आपल्या अज्ञातवासाचे तेरावे वर्ष या क्षेत्रात व्यतीत केले असा उल्लेख आढळतो. या क्षेत्राचा राजा विराटराय याने कुरुक्षेत्र येथे झालेल्या कौरवांबरोबरील युद्धात पांडवांना साथ केली होती. दुसऱ्या शतकात र्मौर्यांच्या महान साम्राज्याने कोकण तटावर कब्जा केला. सोळाव्या शतकामध्ये मौर्य आणि नल राजवंशाच्या राजांनी कोकणावर राज्य केले असे दिसते. रत्नागिरी जिल्हा हा शिलाहारांच्या अधिपत्याखाली होता आणि बहुधा त्यांच्या राज्याची राजधानी गोवा होती. ह्या राजधानीचे स्थलांतर नंतरच्या काळात अधिक मध्यवर्ती स्थान जसेकी रत्नागिरीच्या आसपास अथवा खारेपाटण येथे केले गेले असावे.

चंद्रपूर हे कोकणातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. ते बहुधा चालुक्य राजा पुल्केशीन दुसरा याचा मुलगा चंद्रादित्यद्वारा स्थापित करण्यात आले होते. सोळाव्या शतकात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्तेचा उदय झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा याला काही अपवाद नव्हता. अखेर १६७५ मध्ये सुलतानाच्या हातून हा जिल्हा शिवरायांच्या हाती आला. मराठ्यांनी १८७१ पर्यंत जिल्ह्यावर वर्चस्व राखले मात्र १८७१ मध्ये ब्रिटीश आणि पेशव्यां मधील संघर्ष संपला आणि जिल्हा ब्रिटिशांच्या हातात गेला. ई. स. १८१९ मध्ये दक्षिण कोकण नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला व त्याचे मुख्यालय प्रथम बाणकोट व नंतर रत्नागिरी येथे ठेवण्यात आले. १८३० मध्ये उत्तरेकडील तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात वर्ग केले गेले आणि सिंधुदुर्गला एका उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.

१८३२ मध्ये रत्नागिरी नावाने एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. ई.स.१९४५ मध्ये कणकवली नावाचे एक नवे महल (तहसील) निर्माण करण्यात आले. तद्नंतर ई.स. १९४९ मध्ये पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे जिल्ह्यात विलीनीकरण करण्यात आले व तालुक्यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. याच वर्षी सावंतवाडी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात आला तसेच कुडाळ आणि लांजा असे दोन तहसील ठरवण्यात आले. १९५६ मध्ये राज्यांचे पुनर्वसन होत असताना हा जिल्हा मुंबई प्रांतामध्ये समाविष्ट करण्यात आला व १९६० पासून तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. या जिल्ह्याला येथील प्रसिद्ध 'सिंधुदुर्ग' किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी मालवण नजीक बांधलेल्या या किल्याचा अर्थ 'समुद्री किल्ला' अस होतो. २५ नोव्हेंबर १६६४ साली सुरु झालेले या किल्ल्याचे बांधकाम तब्बल ३ वर्षांनी अशा रीतीने पूर्ण झाले की अरबी समुद्रा मार्गे येणाऱ्या शत्रूला हा किल्ला दिसणे अवघड होते.

कोंकण एक स्वर्ग. 😍
16/10/2025

कोंकण एक स्वर्ग. 😍

आज बुधवार.
15/10/2025

आज बुधवार.

मंगळवार Special Patolya.
14/10/2025

मंगळवार Special Patolya.

अभिनंदन छाया ताई. 💐💐'लापता लेडीज' मध्ये साकारलेल्या आपल्या प्रभावी भूमिकेसाठी मराठी अभिनेत्री, कोंकणकन्या छाया कदम यांना...
13/10/2025

अभिनंदन छाया ताई. 💐💐

'लापता लेडीज' मध्ये साकारलेल्या आपल्या प्रभावी भूमिकेसाठी मराठी अभिनेत्री, कोंकणकन्या छाया कदम यांना बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान कडून फिल्मफेअरचा मानाचा पुरस्कार मिळाला.

चाळीतली दिवाळी🪔🎉वयाची बरीच वर्ष चाळीतच गेली. आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे ...
13/10/2025

चाळीतली दिवाळी🪔🎉
वयाची बरीच वर्ष चाळीतच गेली. आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद. एकाच्या घरात काय चाललंय ते बाजूच्या फ्लॅटवाल्यांंनाही समजत नाही, इतकी प्रायव्हसी जपली जाते.
असो.

तर, चाळीची मज्जाच और होती. एका मजल्यावर ५० खोल्या, तिन मजल्यांची चाळ. मागे २५ खोल्या आणि पुढे २५ खोल्या मध्ये दरवाजा. आणि सर्वांना एकच सामायिक (common) गॅलरी. पंचवीस ही खोल्यांचे दरवाजे एकाच दिशेला उघडायचे. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा बारा वाजताच बंद व्हायचे. स्त्री वर्गापैकी कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. एका शेजारच्या घरातील वस्तू, पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटूंबं. म्हणजे कोणाची भांडणं व्हायची नाहीत अशातला प्रकार नव्हता, परंतु अशी भांडणं फार दिवस टिकायची नाहीत. आमच्या चाळीत सर्व सण अगदी धूमधडाक्यात साजरे व्हायचे. आणि दिवाळी म्हणजे तर आठ दिवस अक्षरशः चंगळजत्रा असायची.

शाळेची सहामाही परीक्षा संपलेली असायची. आमच्या आईला मोठे ॲल्युमिनियमचे डबे भरुन भरून दिवाळीचे सर्व पदार्थ करायची भारी हौस होती. दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीपासूनच आमच्या आईची वेगवेगळी पिठे, मसाले, रवा, मैदा, तेल, तूप, डालडा इत्यादी पदार्थांबरोबर घनघोर लढाई चालू असायची. बेसन, रवा, मैदा निवडणे चाळणे, अशी काम चालू व्हायची. आमच्या मजल्यावरील इतर घरातून मुली आणि बायका येऊन करंज्या लाटायच्या. शंकरपाळ्या कापून त्या भाजून द्यायच्या. बेसनचे, रव्याचे लाडू वळून द्यायच्या. साच्यातून शेव आणि चकल्या काढणे, तेलात भाजणे वगैरे सर्व प्रकार दुपारच्या जेवणानंतर चालू व्हायचे ते अगदी अंधार पडेपर्यंत चालू असायचे. अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत प्रत्येकाच्या घरात आलटून-पालटून हाच कार्यक्रम असायचा. सर्वांच्या घरात दणकावून दिवाळीचे पदार्थ बनवले जायचे. या सर्व पदार्थांना पुणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा वेगवेगळ्या चवी असायच्या. प्रत्येक घरातले पदार्थ चवीला वेगवेगळे लागायचे.

तोपर्यंत पुरुष मंडळी घराला रंग काढणे, कंदील बनवणे, कंदील लावणे, तोरणे लावणे अशा कामांना हातभार लावायचे. त्याच दरम्यान नवीन कपडे, रांगोळी, उटणे, कारेटी वगैरे घरात यायची. आणि मग आतुरता असायची दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाची.

दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी सर्वात आधी उठून चाळीच्या खाली येऊन कोण फटाके लावतो ह्याची स्पर्धा असायची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी पहाटे तीन-चार वाजताच कोणीतरी रशीबार पेटवायचं. त्यावेळी चौकोनी खोक्यातला कॅप्टन नावाचा मोठा बार मिळायचा आणि हिरव्या सुतळीचा रशीबार मिळायचा.

धड्डड्डम्म्म्म् करून मोठा आवाज व्हायचा आणि आमची चाळ अर्धवट झोपेतून जागी व्हायची. यात आमच्या चाळीत आसोलकर काका मोठ्याने दिन दिन दिवाळी असं ओरडत त्यामुळे सुद्धा लोकांना जाग येई. या फटाक्यांच्या आवाजाच्या आधीच आमच्या मातोश्री उठलेल्या असायच्या. मग आमची लगबग चालू व्हायची. घाई असायची खाली जाऊन इतर मुलांबरोबर फटाके उडवण्याची. आईने उटणे तयार करून मोरी मध्ये ठेवलेलं असायचं. पटापट दात घासायचे आणि मोरी मध्ये जाऊन आंघोळ करायची यासाठी घाई गडबड व्हायची. मोती साबण वगैरे असली काही थेरं त्यावेळी नव्हती. पण आंघोळीसाठी साबणाची नवीन वडी मिळायची. मग आधी अंगाला उटणं लावायचा, मग साबण लावायचं आणि भसाभसा अंगावर पाणी ओतून घ्यायचो. की झाली आमची पहिली आंघोळ.

दरवाजाच्या बाहेर उंबऱ्याच्या बाजूला कारेटं चिरडलं की दिवाळीला सुरुवात व्हायची. पुन्हा घरात येऊन फटाके निवडणे, मोठ्या माळा सोडवणं असा प्रकार असायचा. लवंगी ची माळही सोडून एक एक लवंगी वेगळी करायचो. ताजमहालची लाल फटाक्यांची माळ सोडवायची आणि एकेक लाल फटाकडी वेगळी करायची. लक्ष्मी बारचं एक पाकीट सोडून पाच लक्ष्मी बार वेगवेगळे करायचे. असेच पाच-दहा चिमणी बार सुट्टे करायचे. आणि मग हे सर्व फटाके, एक माचीस आणि एक-दोन उदबत्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून चाळीच्या खाली यायचं. गॅलरीतून डोकावून एक-दुसऱ्याला पाहून भरभर सर्व मुलं आपापले फटाके घेऊन चाळीच्या खाली यायचे. आणि मग दीड-दोन तास अखंड फटाक्यांचा कडकडाट चालू राहायचा. मध्येच कोणीतरी कानाचे पडदे हलवणारा रशीबार लावायचा. तोपर्यंत लख्खं उजाडलेला असायचं. हाताला फटाक्यांच्या पावडरचा चंदेरी चढलेला असायचा. मग पुन्हा घरात एंट्री मारायची, हात पाय धुवायचे आणि चहा नाश्ता करायला बसायचं. आठवडाभर दिवाळीच्या पदार्थांचा वास नाकात बसलेला असायचा. त्यामुळे दिवाळीचे पदार्थ खायची इच्छा व्हायची नाही. अगदीच नाइलाज म्हणून दोन-तीन चकल्या कुस्करून चहात बुडवून खायच्या हेच ऐकक आवडीचं खाणं होतं. दिवाळीला मिठाई वगैरे प्रकार त्यावेळी फारसे प्रचलित नव्हते. किंवा आम्हाला तेंव्हा कोणी मिठाई देत नव्हतं असं देखील असू शकेल. सकाळी साधारण नऊ दहा वाजता संपूर्ण चाळ लखलखीत सजलेली असायची. सर्वांच्या दरवाजात मुली आणि बायका रांगोळी घालत असायच्या. लाडू करंज्या शंकरपाळे शेव चकली चिवडा अनारसे इत्यादी पदार्थांनी भरलेली ताटं या घरातून त्या घरात पोचती केली जायची. या देवाण-घेवाणीतच दिवस मावळतीला लागायचा.

संध्याकाळ होताच कंदील, दिवे, आणि रंगीबेरंगी तोरणांनी आमची चाळ उजळून निघायची. एखाद दुसरा कंदील वेगळा असायचा, नाही तर आमच्या चाळीमध्ये एकाच प्रकारचे कंदील आणले जायचे. दिवाळीच्या दिवसात आमच्या चाळीतील दिव्यांचा लखलखाट मन वेधून घेतो. इतकं सुंदर दिवाळीच दृश्य असतं आमच्या चाळीचं.

सायंकाळी गॅलरीमध्ये पुन्हा मुली आणि बायका नव्याने रांगोळी काढायला बसायच्या. विविधरंगी दिव्यांनी आणि कंदिलांंच्या उजेडात आमची गॅलरी आणि संपूर्ण चाळ उजळून निघालेली असायची. अंधार पडल्यानंतर पुन्हा एकदा चाळीच्या खाली आमच्या मुलांत फटाके उडवण्याची स्पर्धा लागायची. अभ्यंगस्नान, पहिली आंघोळ, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज या सर्व दिवसात दिवसभराचा कमी-अधिक प्रमाणात हाच कार्यक्रम असायचा. आमच्या घरात पाहुण्या-रावळ्यांची अखंड ये-जा असायची. आमच्या संपूर्ण एरियात, सर्वच चाळींमध्ये अशीच दणदणीत दिवाळी साजरी व्हायची. प्रत्येकाच्या घरातून दिवाळीचा आनंद आणि उत्साह अगदी ओसंडून वाहत असायचा. दिवाळीचा हा आनंद आठ-दहा दिवस अखंड ज्योतीप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लखलखत असायचा. दिवाळी दिवाळी म्हणून जी म्हणतात ती या आमच्या चाळ संस्कृतीत आनंदात आणि उत्साहात साजरी केली जायची.

घरात वडील एकटे कमावणारे होते. आणि त्या एकट्या माणसाच्या कमाईत आम्ही दणदणीत दिवाळी साजरी करायचो. त्यावेळी दिवाळीतल्या आनंदाला पारावार नसायचा. आजही आम्ही चाळीतील दिवाळीच्या आठवणीत सहज रममाण होतो. कारण...
..आता आमच्या दिवाळीच्या आनंदाला ती अज्ञानाची आणि निरागसतेची सोनेरी किनार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यासाठी जो बाळबोध मेंदू लागतो तो आता दुनियादारी मुळे बथ्थड झालेला आहे. फटाक्यांच्या मोठाल्या आवाजामुळे आता कानाला त्रास होतो. दिवाळीचे पदार्थ बनविण्यासाठी आता वेळही नाही आणि खाण्याची फारशी इच्छाही नाही. Adulteration च्या भीतीने आता मिठाई खात नाही. पूर्वी मी छान रांगोळी चित्र काढायचो. पाठदुखी मुळे आता जमिनीवर बसून रांगोळी काढणं कठीण झालंय. नवीन कपड्यांचं अप्रूप राहिलं नाहीये. आता फक्त मला दिवाळीतील दिव्यांची रोषणाई आणि लखलखाट आवडतो.

बंदिस्त फ्लॅटमध्ये शांतपणे बसून राहणं हेच आता दिवाळीतलं काम. डोक्यात वेगवेगळे विचार येत राहतात, आणि मग हमखास आठवते ती आणि आम्ही लहानपणी साजरी केलेली चाळीतली दिवाळी.

*अक्षरशः दिवाळीचे दिवस होते ते...*
🪔🪔🪔🏮🏮🏮🧨🧨🎉🎁🎇🎆🎊

माहिती साभार ✍🏻 मिलिंद खोत.
📸© Ajit Rane

#दिवाळी

King Fish Rava Fry.
12/10/2025

King Fish Rava Fry.

कशेळी.
10/10/2025

कशेळी.

09/10/2025

श्री देवी भगवती मंदिर, धामापूर, मालवण.
07/10/2025

श्री देवी भगवती मंदिर, धामापूर, मालवण.

जेवूक येवा!
05/10/2025

जेवूक येवा!

घटस्थापना आणि नवरात्रौत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
22/09/2025

घटस्थापना आणि नवरात्रौत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

Address

Vengurla

Telephone

+919029345459

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malvani Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share