Mouj Prakashan Griha

Mouj Prakashan Griha मराठी साहित्यक्षेत्रातील नामांकित त?

मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रकाशन संस्था म्हणून मौज प्रकाशन गृह ही संस्था गेली ५० हून अधिक वर्षे ख्यातनाम आहे. मौज प्रकाशन गृह नेहमीच नवनव्या प्रतिभावंतांच्या प्रयोगशील रुपांच्या निर्मितीला प्राधान्य देते. साहित्य, कला यातील नव्या-जुन्या विचारप्रवाहांना समजून घेत, त्यांना वाङ्मयात सामावून घेण्याचा प्रयत्न करत `मौज’ने मराठी साहित्यविश्र्वावर स्वत:ची अमीट नाममूद्रा उमटवली आहे. मौज प्रकाशनाने विविध प्रका

रचे निवडक परंतु महत्वाचे लेखन प्रकाशित केले आहे.
सर्वात जास्त साहित्य अकेदमी पारितोषिके मौजेच्या पुस्तकांना मिळाली आहेत. गेल्या २-३ पिढ्यांतील बहुतेक मान्यवर लेखकांची पुस्तके मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. उत्कृष्ट संपादनाचा ध्यास, बिनचूकतेचा आग्रह आणि सुरेख छपाई यामुळे मौज प्रकाशनाची पुस्तके आगळी-वेगळी ठरतात. विष्णुपंत भागवतानी सुरुवात केलेल्या मौज प्रकाशन गृहाच्या आजपर्यंतच्या यशात श्री.पु. भागवत, राम पटवर्धन, श्रीनिवास विनायक कुळकर्णी, गुरुनाथ सामंत व मोनिका गजेंद्रगडकर यांच्या संपादनदृष्टीचा सिंहाचा वाटा आहे.

29/01/2025
05/02/2023

“सत्यकथाः निवडक कविता” -
संपादकः विजय तापस
१००० पृष्ठांचे दोन खंड

दोनही खंडांचा प्रकाशन समारंभ संमेलनाध्यक्ष मा. नरेन्द्र चपळगावकर यांच्या हस्ते वर्धा येथे संपन्न झाला.

पुस्तक खरेदीसाठी, संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#मौज_प्रकाशन #मराठीकविता #श्रीपुभागवत #कविता #श्रीपुभागवतजन्मशताब्दी #निवडकसत्यकथा #सत्याकथा #निवडककविता #मराठीसाहित्य #वर्धासाहित्यसंमेलन #मराठीसाहित्यसंमेलन

31/01/2023

“सत्यकथाः निवडक कविता” -
संपादकः विजय तापस
१००० पृष्ठांचे दोन खंड

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#मौज_प्रकाशन #मराठीकविता #श्रीपुभागवत #कविता #श्रीपुभागवतजन्मशताब्दी #निवडकसत्यकथा #सत्याकथा #निवडककविता #मराठीसाहित्य

30/01/2023

“सत्यकथाः निवडक कविता”
संपादकः विजय तापस
१००० पृष्ठांचे दोन खंड, लवकरच प्रकाशित होत आहेत.

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#मौज_प्रकाशन #मराठीकविता #श्रीपुभागवत #कविता #श्रीपुभागवतजन्मशताब्दी #निवडकसत्यकथा #सत्यकथा #निवडककविता #मराठीसाहित्य #श्रीपुजन्मशताब्दीवर्ष

प्रदीप कर्णिक यांची क्रोधें उत्पाटिला बळें ही कादंबरी रूढार्थाने कुठल्या संप्रदायात बसत नाही.मनोविलेषणात्मक, संज्ञाप्रवा...
23/01/2023

प्रदीप कर्णिक यांची क्रोधें उत्पाटिला बळें ही कादंबरी रूढार्थाने कुठल्या संप्रदायात बसत नाही.
मनोविलेषणात्मक, संज्ञाप्रवाही, आस्तित्ववादी असल्या चौकटीत मावणारी ही कादंबरी नाही. या कादंबरीला म्हणावे असे कथानक नाही, नायक-खलनायक नाही.
या नायकाच्याच नव्हे तर येथील प्रत्येक पात्रांत एक शून्यावस्था, एक पोकळी भरलेली आहे. ह्या शून्यावस्थेला छेदून बाहेर कसे पडायचे, या ध्यासाने मृत्यूच्या विहिरीत गरगरणाऱ्या नायकाने कादंबरी लेखनाचा गळ पकडून, स्वत:ला त्या विहिरीतून बाहेर पडता येईल याची धडपड चालवली आहे.
ही कादंबरी वाचताना मानवी असतेपणाचे, मानुषतेच्या मूल्यांचे, प्रश्नांचे मोहोळ पानोपानी उठलेले दिसेल. माणसं इतकी क्रूर कां होतात असा प्रश्न उपस्थित झाला की, त्याचा मूळ स्वभावच रानटी आहे का? असा उपप्रश्न पुढे येतो, पाठोपाठ क्रोध शमवण्याचे मार्ग कोणते? हिंसा हा क्रोध शमवण्याचा मार्ग असू शकतो का? हिंसा मनातून जाऊन शांती कशी निर्माण होईल? मग महात्मा गांधींचा अहिंसा विचार येणार, बुद्धाची शांती येणार, तेंडुलकरांचे हिंसा आणि क्रौर्याचे चिंतन येणार. अशा संदर्भसंपृक्ततेतून प्रश्नांचे मोहोळ बाजूला सारून, उत्तराचा शोध घेण्यासाठी तडफडणाऱ्या मनाची कालवाकालव हा या कादंबीरचा विषय आहे. पराभव चालेल, पण पक्षी मरता कामा नये ही भूमिका असल्यामुळे निष्कर्षाप्रत येताना कथानिवेदकाची दमछाक होते. निवेदकाची सर्व बाजूंनी होणारी दमछाक हेच या अनुभवाचे संघटन-तत्त्व आहे आणि कलाद्रव्यही आहे. अशा या प्रायोगिक वळणाने जाण्याचे धाडस केल्याबद्दल प्रदीप कर्णिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
–रमेश वरखेडे
(‘प्रस्तावने’तून)


“क्रोधें उत्पाटिला बळें” -
लेखकः प्रदीप कर्णिक

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#मौज_प्रकाशन #मराठीकादंबरी #मानवीमनोव्यापार #कादंबरी #मराठीसाहित्य #श्रीपुभागवत #श्रीपुजन्मशताब्दीवर्ष

उस्ताद विलायतखाँ यांच्यामुळे सतारीला व्यक्तित्व मिळालं, प्रतिष्ठा मिळाली. ती गाऊ लागली.खाँसाहेब म्हणजे शास्त्रोक्त संगीत...
20/01/2023

उस्ताद विलायतखाँ यांच्यामुळे सतारीला व्यक्तित्व मिळालं, प्रतिष्ठा मिळाली. ती गाऊ लागली.
खाँसाहेब म्हणजे शास्त्रोक्त संगीतातला शुक्रतारा. सतारीसाठी डोंगराएवढे कष्ट घेतले. घराण्याचं नाव आकाशावर खोदलं.
बापापेक्षा पोर सवाई निघालं.
खाँसाहेबांनी कधी लोकानुनय केला नाही; तब्येतीत वाजवलं, तब्येतीत जगले. सतारमय झाले.
खाँसाहेबांचा रागविस्तार गूढ नि गाढ. प्राजक्ताच्या मेंदीपावलांची पाण्यावर थिरकनच जणू. तलय म्हणजे धुवाधार तानांची तेजाळ वर्तुळं...विजांचा पाऊस. वारा पानांतून सरसर उतरतो तसे खाँसाहेब तारांतून समेवर उतरत.जसं वाजवणं, तसं जगणं. अनाकलनीय नि अवघड. बेफाट, बेभान...व्रतस्थ आणि ज्ञानलीन. एकीकडे चिरंतनाचा ध्यास तर दुसरीकडे ऐहिक सुखाची बालिश लालसा.
यश, कीर्ती नि मान-सन्मानांचा हर्ष मानावा तर कौटुंबिक
कलह, वाद, स्थलांतर, स्वप्रतिमा-मोह, अहंकार हे विकार
पिच्छा सोडत नव्हते. सख्खेही बाजूला झाले. हे कमी की काय म्हणून पंडित रविशंकरांशी आपली तुलना होते ही खंत.
सगळा छाया-प्रकाशाचा खेळ.
विलायतखाँ साहेबांचं आयुष्य म्हणजे कधीही न संपणारी मैफल.
‘दिड दा...दिड दा’च्या प्रत्येक पानावर खाँसाहेबांची तृप्त मुद्रा आहे. श्रीमती नमिता देवीदयाल यांच्या मूळ इंग्रजी चरित्राचा हा मराठी अनुवाद रसिकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास वाटतो.


“दिडदा दिडदा” -
मूळ लेखिकाः नमिता देवीदयाल
अनुवादः अंबरीश मिश्र

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#मौज_प्रकाशन #उस्तादविलायतखा #सतार #हिंदुस्तानीसंगीत #वाद्यसंगीत #घराना

मौज दिवाळी २०२२ः शंभर वर्षेजिवाचा मैतर : संतोष शेणईसंशोधनातून हाती आलेल्या मालवणी लोकगीतांच्या माध्यमातून स्त्री-पुरुष न...
27/10/2022

मौज दिवाळी २०२२ः शंभर वर्षे

जिवाचा मैतर : संतोष शेणई
संशोधनातून हाती आलेल्या मालवणी लोकगीतांच्या माध्यमातून स्त्री-पुरुष नातेसंबंधांबद्दल मांडलेलं एक प्रगल्भ चिंतन.


घरपोच अंक मिळण्यासाठी आजच संपर्क करा.

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#दिवाळी२०२२ #मौज_प्रकाशन #दिवाळी_अंक

मौज दिवाळी २०२२ः शंभर वर्षेवर्तमानाच्या इतिहासाचे सम्यक भान : प्रधानमंत्री संग्रहालय : विनय सहस्रबुद्धेआधुनिक तंत्रज्ञान...
27/10/2022

मौज दिवाळी २०२२ः शंभर वर्षे

वर्तमानाच्या इतिहासाचे सम्यक भान : प्रधानमंत्री संग्रहालय : विनय सहस्रबुद्धे
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे दिल्लीत तीनमूर्ती भवनात नव्याने उभारलेल्या संग्रहालयाविषयी जिवंत अनुभव देणारा लेख.



घरपोच अंक मिळण्यासाठी आजच संपर्क करा.

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#दिवाळी२०२२ #मौज_प्रकाशन #दिवाळी_अंक #प्रधानमंत्री_संग्रहालय #विनय_सहस्त्रबुद्धे

मौज दिवाळी २०२२ः शंभर वर्षेपुतीन नावाचा दहशतवाद! : निळू दामलेरशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्व...
26/10/2022

मौज दिवाळी २०२२ः शंभर वर्षे

पुतीन नावाचा दहशतवाद! : निळू दामले
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरून विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या क्रूर कारनाम्यांबद्दलचा मनात अस्वस्थता नि अनेक प्रश्न निर्माण करू पाहणारा लेख.

घरपोच अंक मिळण्यासाठी आजच संपर्क करा.

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#दिवाळी_अंक #रशिया #निळू_दामले #दिवाळी२०२२ #मौज_प्रकाशन

मौज 100 वर्षांची परंपरापरिसंवादमौजमधील वेगवेगळे परिसंवाद, साहित्य आणि कला यांचा अभ्यासपूर्ण वेध घेता घेता मराठी साहित्यव...
23/10/2022

मौज 100 वर्षांची परंपरा

परिसंवाद
मौजमधील वेगवेगळे परिसंवाद, साहित्य आणि कला यांचा अभ्यासपूर्ण वेध घेता घेता मराठी साहित्यविश्वातील बदलत्या साहित्य रूपांची अभिरूचीची प्रतिबिंब टिपणारा महत्त्वपूर्ण परिसंवाद.
संयोजन : रणधीर शिंदे
सहभाग : वसंत आबाजी डहाके, अविनाश सप्रे, गणेश कनाटे

#दिवाळी२०२२ #मौज_प्रकाशन

घरपोच अंक मिळण्यासाठी आजच संपर्क करा.

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashaMouj Prakashan Gruhan Gruha

मौज 100 वर्षांची परंपरा - मौज २०२२व्यास, त्रिज्या आणि परीघ : विनय हर्डीकरपन्नासच्या दशकातील पुण्याच्या नू. म. वि.तील शिक...
22/10/2022

मौज 100 वर्षांची परंपरा - मौज २०२२

व्यास, त्रिज्या आणि परीघ : विनय हर्डीकर
पन्नासच्या दशकातील पुण्याच्या नू. म. वि.तील शिक्षक पु. ग. सहस्रबुद्धे त्यांच्या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या आणि विद्यार्थ्यांना नव्या राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करणाऱ्या व्यक्तित्वाविषयी लिहीत आहेत ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर.

घरपोच अंक मिळण्यासाठी आजच संपर्क करा.

संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]

https://moujprakashan.com

#दिवाळी_अंक #दिवाळी२०२२ #मौज_प्रकाशन

Address

Municipal Bhaji Market, Vallabhbhai Patel Road, LIC Colony, Suresh Colony
Vile Parle West
400056

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919769526577

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mouj Prakashan Griha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mouj Prakashan Griha:

Share

Category