02/09/2022
आजचा दिवस हा भारतीय नौदलासोबतच मराठी माणसांसाठी खास दिवस आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नवीन नौदल चिन्हाचे अनावरण केले. नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे.