Radio Wardha 90.8 Fm

Radio Wardha 90.8 Fm This is official page of Community Radio Station Radio Wardha 90.8 FM. Founder & Managing Director shri Ajay Tigaonkar

https://youtu.be/BT_vn4Hr98A?si=4yUniQ__yhYSxLlm
16/07/2024

https://youtu.be/BT_vn4Hr98A?si=4yUniQ__yhYSxLlm

Mazi ladaki bahin Yojana | माझी लाडकी बहीण योजना नवीन शासन निर्णय जाहीर | लाडकी बहीण योजना नवीन बदल.News At 1चॅनल सब्सक्राइब करा 🙏🏻🙏🏻majhi...

Phase 02
03/10/2023

Phase 02

01/10/2023
Free Courses Interview Date 29 SeptemberSharp at 11 am
25/09/2023

Free Courses
Interview Date 29 September
Sharp at 11 am

29/08/2023

Addmission open for New Batch

26/08/2023

https://www.facebook.com/profile.php?id=61550510109125&mibextid=ZbWKwL

Follow Radio Wardha New Page☝️रेडिओ वर्धा 90.8 एफ एम च्या सर्व रसिक श्रोत्यांना कळविण्यात येत आहे की गेल्या काही दिवसापासून आमचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्यामुळे आपल्या संवादामध्ये खंड पडला होता.... पण आता आम्ही नव्याने आपल्याशी संवाद साधू इच्छितो त्यासाठी सोबत दिलेली जी लिंक आहे त्यावर आपण क्लिक करून आपण रेडिओ वर्धा च्या फेसबुक पेज ला फॉलो करू शकता.

धन्यवाद

Social media agency

रेडिओ वर्धा 90.8 fm के सभी श्रोताओं और देशवासीयोंको मित्रता दिवस की शुभकामनाएँ!
06/08/2023

रेडिओ वर्धा 90.8 fm के सभी श्रोताओं और देशवासीयोंको मित्रता दिवस की शुभकामनाएँ!

05/08/2023

#फिल्म_लावारिस का बेहद पॉप्युलर गाने का original सुनिए । Can't believe, this song is 140 year old. #बिल्कुल यकीन नहीं होता!!
हा दोस्तों ये गाना रिलीज किया था 1883में!
गाना दादरा में गाया है।
तब इस गानेको शिलाजीने गाया था !
जब, अमिताभ ने इसे गाया, तो हमें लगा कि यह कितना मौलिक है। जरूर सुनिए।

03/08/2023

#ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन!
📻 #रेडिओ_वर्धा
गुरवार ३ ऑगस्ट २०२३
🖊️अजय तिगावकर:
#मराठी_साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवणारे
गीतकार, माजी आमदार #पद्मश्री ना. धों. महानोर यांचे आज निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू होते.
रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबातला.त्यांचे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानातच रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले.
ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.
त्यांनी कवितेतून माती,शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करुन दिली. त्यांच्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' ‘रानातल्या कवितां' आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला !
'हिरव्या बोली'ला साहित्य शारदेच्या दरबारात बसवणारा अस्सल मातीतला कवी.... दादा... नामदेव धोंडो महानोर ......
रेडिओ वर्धा ९०.८ एफ एम कडुन भावपूर्ण श्रद्धांजली.

#चिंब पावसानं रान झालं आबादानी.......

02/08/2023

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील शासकिय आय टी आय ला राज्यस्तरीय तिसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. #ठाणे येथे कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री यांच्याहस्ते प्राचार्य संजय कोपुलवार व माजी प्राचार्य देवानंद गायधने यांनी पुरस्कार स्वीकारला.

 #ओबीसी लाभार्थ्यांना उद्योग, व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज! #पात्र लाभार्थ्यांसाठी कर्जाच्या सहा योजनाØ  काही कर्ज य...
01/08/2023

#ओबीसी लाभार्थ्यांना उद्योग, व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज!

#पात्र लाभार्थ्यांसाठी कर्जाच्या सहा योजना

Ø काही कर्ज योजनांवर व्याज परताव्याचा लाभ

Ø महिलांसाठी स्वयंसिध्दा व्याज परतावा योजना

वर्धा, दि.1 (जिमाका) : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये ओबीसी लाभार्थ्यांना उद्योग, व्यवसाय स्थापन करता यावा यासाठी 1 लाखापासून 10 लाखापर्यंतच्या कर्ज योजनांचा समावेश आहे. केवळ महिलांसाठी स्वयंसिध्दा व्याज परतावा योजना राबविली जाते. या योजनेवर 12 टक्के दराने व्याज परतावा केला जातो. या योजना ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी मोलाचा हातभार लावत आहे.

महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असेल्या योजनांमध्ये 20 टक्के बीज भांडवल योजना ही एक महत्वाची योजना आहे. ही योजना राष्ट्रीयकृत बॅंकेच्या माध्यमातून राबविण्यात येते. योजनेतून 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. त्यात महामंडळाचे कर्ज 20 टक्के, बँकांचा सहभाग 75 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे. महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा दर 6 टक्के असून परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे. कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखपर्यंत व अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.

एक लाखापर्यंत थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबविण्यात येते. या योजनेत लाभार्थ्यांचा सहभाग नसून अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा, अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. परतफेडीचा कालावधी 4 वर्षे असून या कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यास व्याज अदा करावे लागत नाही. थकीत कर्जावर मात्र दरसाल दर शेकडा 4 टक्के दराने व्याज आकारण्यात येते.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ही 10 लाख रुपयापर्यंतची कर्ज योजना आहे. कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र इत्यादी व्यवसायांकरीता कर्जावरील व्याज परतावा उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना आहे. कर्जासाठी नोंदणी केल्यानंतर बँकेमार्फत घेतलेल्या 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम 12 टक्के दराने अनुदान स्वरुपात दिली जाते.

गट कर्ज व्याज परतावा योजना, या योजनेंतर्गत विहित वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांचे बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, नोंदणीकृत कंपनी अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणी करीता कर्ज दिले जाते. या कर्जावरील व्याज परतावा केला जातो.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, या योजनेंतर्गत देशातील उच्च शिक्षणासाठी 10 लाख व परदेशी उच्च शिक्षणासाठी 20 लाखापर्यंतच्या बँक कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा केला जातो. देशांतर्गत अभ्यासक्रमामध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषि अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान अभ्यासक्रमाचा समावेश असावा. परदेशी अभ्यासक्रमामध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, विज्ञान कला या अभ्यासक्रमाचा समावेश असावा.

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा कर्ज योजना, राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मुल्य आधारित उद्योगाकरीता बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 ते 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील 12 टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा केला जातो. महामंडळाच्या योजनांची सविस्तर माहिती www.msobcfdc.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या 07152-232881 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा 8329983870, 7972029150 या क्रमांकावर उपलब्ध होऊ शकते.

31/07/2023

१ रु.पिक विमाची मुदतवाढ ३ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे

रेडिओ वर्धादिनांक २९/०७/२०२३अजय तिगावकर :पोलीस अमलंदाराच्या बुलेट गाडीवरच केली वाहतूक शाखेची कारवाही.   आता बुलेटला  पंज...
29/07/2023

रेडिओ वर्धा
दिनांक २९/०७/२०२३
अजय तिगावकर :

पोलीस अमलंदाराच्या बुलेट गाडीवरच केली वाहतूक शाखेची कारवाही.
आता बुलेटला पंजाबी सायलेन्सर लावने पडेल महागात !
रस्ते अपघात कमी करण्यासाठी वर्धा पोलीसांची विशेष मोहीम!
आज आर्वी नाक्यावर पोलिसांनी केली तपासणी!
वर्धा जिल्हयामध्ये मागील तिन वर्षात प्राणांकित अपघातामध्ये २०२१ मध्ये १९६, २०२२ मध्ये २१० व जुन २०२३ पावेतो १०७ नागरिकांना रस्ते अपघातामध्ये जीव गमावला असुन,रस्ते अपघातात घट करण्यासाठी पोलीस अधिक्षक श्री नूरूल हसन यांचे मार्फत इतर विभागाच्या समन्वयाने कसोशिने प्रयत्न करण्यात येत आहे.

पोलीस अधिक्षक यांचे सुचने प्रमाणे जिल्हा वाहतुक शाखा, तसेच जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन मार्फत विना हेल्मेट, सिटबेल्ट न लावता चारचाकी गाडी चालविणे, पंजाबी सायलेन्सर लावुन बुलेट गाडी चालवणारे तसेच नो पार्किंग मध्ये लावण्यात येणा-या वाहण चालकावर कारवाहीचे विषेश मोहीम सुरु असुन दर दिवशी कारवाही चा आढावा पोलीस अधिक्षक यांचेमार्फत घेण्यात येत आहे.
रस्त्याचे मधोमध गाडया पार्कींग करणार्याची संख्या वाढली असुन शहरात मोठा आवाज करणारे पंजाबी सायलेन्सर लावुण शहरात फिरणा-या गाडयांवर कारवाही करित असतांना मुख्यालय येथे कार्यरत पोलीस अमलदार याचे गाडीवर जिल्हा वाहतुक शाखेमार्फत कारवाही करण्यात आली व त्यांना दंड आकारण्यात आला आहे. शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत असुन बुलेट दुचाकीवरिल पंजाबी सायलेन्सरवर कारवाही करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्री नूरूल हसन यांचेमार्फत देण्यात आले आहे.

28/07/2023

#जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरग्रस्त सोनोरा ढोकला भेट व नुकसानीची पाहण

वर्धा, दि.२८ जुलै २०२३
#रेडिओ_वर्धा
: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी देवळी तालुक्यातील मौजा सोनोरा ढोक या पुरग्रस्त गावास भेट देऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला.

या भेटीत जिल्हाधिकारी यांनी पुराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबासोबत समस्या निवारणार्थ चर्चा केली, सोबतच त्यांनी पुराच्या पाण्याने बाधित व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर आढावा घेतला.
सोनोरा ढोक गावाच्या दोन्ही बाजूने नाले असून दरवर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येऊन गावात पूर परिस्थिती निर्माण होते.

मागील वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जवळपास 200 कुटुंबाच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. तसेच काही कुटुंबांना गावातील समाज मंदिर तसेच इंजाळा येथील यशवंत महाविद्यालय येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी दिनांक 26 व 27 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे दोनही नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येऊन गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या गावाला आज जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

या भेटीत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच पूर परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी देवळीचे तहसीलदार सचिन यादव, पुलगावचे अपर तहसीलदार दत्ता जाधव तसेच नायब तहसीलदार, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, गावातील नागरीक उपस्थित होते.

Address

RADIO WARDHA 90. 8 FM
Wardha
442001

Opening Hours

Monday 6am - 10pm
Tuesday 6am - 10pm
Wednesday 6am - 10pm
Thursday 6am - 10pm
Friday 6am - 10pm
Saturday 6am - 10pm
Sunday 6am - 10pm

Telephone

+918484044908

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radio Wardha 90.8 Fm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Radio Wardha 90.8 Fm:

Share