10/11/2024
Vegetarian Thali #7
भारता बाहेर असा बेत म्हणजे निव्वळ सुख ! 👩🍳🙆♀️🥰🤞
तर आजचा बेत: कैरीचा टिक्कु, शेंगदाण्याची चटणी, काकडीचे धपाटे, घरचं ताजं लोणी, आणि सोबत आंबा. 🥭😋
🎊🎉🎊आली दिवाळी, गेली दिवाळी, पण फराळ अजून शिल्लक आहे आणि तो बघून कंटाळा आला आहे. त्यामुळे आता “येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या”, असं माझी पणजी म्हणायची.
मेलबॉर्नमध्ये १ ते १.५ वर्षांपासून म्हशीचं दूध मिळायला लागलं आहे, पण ते मिळत हजीर तो वजीर सारखं; केव्हा तरी मिळतं कारण लोकांची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. जेव्हा मिळतं, तेव्हा आम्ही घेतो.
यावेळी दिवाळीतच मिळालं, तर आठवडाभर साय साठवली होती. आणि वीकएंड ला त्याचं लोणी बनवलं. आता फराळ बघून बघूनच कंटाळा आला होता.
सकाळी ताजं लोणी आणि धपाटे खायचं ठरवलं होतं. रात्रीच साय फ्रिजमधून बाहेर काढून ठेवली होती. मागच्या वेळी फ्रिजमधून काढून ताक करायला घेतलं, पण तासभर गेल्यावरही लोणी काही आलं नाही, आणि आई उठायची वाट बघत होते. सकाळी सकाळी तिला तिच्या सहा वाजता फोन केला, तर ती घाबरली की इतक्या लवकर का फोन केलाय? मग आईने फोनवर बरोबर उपाय सांगितला. तेव्हापासून साय आदल्या रात्रीच बाहेर ठेवते, त्यामुळे आता १५-२० मिनिटांत लोणी तयार होतं.
पटपट काकडी खिसली, थालीपीठ भाजणी घातली, त्यात मिरच्या ची ठेचा, कोथिंबीर टाकली आणि धपाटे बनवले. सध्या ऑस्ट्रेलियात उन्हाळा सुरू झाला आहे, आणि आत्ता इथले आंबे मिळायला सुरुवात झाली आहे. जसं भारतात हापूस फेमस आहे, तसंच इथे केन्सिंग्टन प्राईड (KP) फेमस आहे, पण हापूसशी त्याची तुलना नाहीच.🙈
या मंडळी खायला.🙏👩🍳