09/24/2025
भारताचा क्रिकेटचा देव… भारतरत्न सचिन तेंडुलकर!
ज्यांच्या प्रत्येक फटक्याने लाखो हृदयांत आनंदाची लाट उसळली…
तोच सचिन आज खेळाच्या पलीकडे, माणुसकीचा खरा खेळ खेळताना दिसतोय.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातलं घराडी हे दुर्गम गाव…
इथे आहे स्नेह ज्योती अंध विद्यालय
अंध मुलींसाठी आशेचा किरण ठरलेली शाळा,
जिला आशाताई कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता यांनी संघर्षातून उभी केली.
पण या अंध मुलींच्या आयुष्यात एक अवघड अडथळा होता –
मासिक पाळी!
अस्वच्छता, वेदना, लाज आणि अडचणी…
या सगळ्यामुळे त्यांचं जगणं अत्यंत कठीण झालं होतं.
ही वेदना समजून घेत सचिन तेंडुलकर देवदूत बनून धावले!
सचिन यांनी तब्बल ९ लाख रुपये किमतीची
सॅनिटरी नॅपकिन तयार करणारी मशीन शाळेला भेट दिली.
आज या मशीनमुळे अंध मुली स्वतःच्या हातांनी
“नेहा प्रॉडक्ट्स” या नावाने सुरक्षित, नैसर्गिक नॅपकिन तयार करत आहेत.
त्यांचं आरोग्य सुधारलंय… आणि
त्यांना मिळालाय आत्मसन्मानाने जगण्याचा नवा मार्ग!
सचिन यांच्या या कार्यामुळे सिद्ध झालं
खरा देव फक्त खेळात नसतो,
तो माणुसकीतही असतो!
स्नेहज्योती अंधविद्यालयमु.पो. घराडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, पिन - ४१५२०३ महाराष्ट्र, भारतमोबा: ७४९८६१७५१४ , ९५०३.....