
06/18/2025
📰 भोकरमध्ये पोलीस पाटील कार्यशाळा व मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न 📰
भोकर (प्रतिनिधी) — महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ, भोकर यांच्या वतीने आयोजित पोलीस पाटील कार्यशाळा व मार्गदर्शन मेळावा नुकताच भोकर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मा. प्रवीण मेंगशेट्टी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विनोद गुंडमवार, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, मंडळ अधिकारी मनोज खंदारे, मारोती मगरे, सतीश दांतुलवाड, पो.उ.नि. कराड, पो.नि. सुरेश जाधव, परमेश्वर गाडेकर, सौ. वच्छेवार मॅडम, जमादार बालाजी लक्षटवार तसेच भोकर पो.स्टे.चे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात राज्य संघटक संभाजी पाटील मांडगीकर, नांदेड जिल्हा अध्यक्ष भास्करराव कंकाळ पाटील, उमरी तालुकाध्यक्ष व मराठवाडा उपाध्यक्ष आनंदराव मोरे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस पाटील व संघाचे तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सूत्रसंचालन धावरी बू. येथील पो.पा. पंकज चोंडे यांनी, प्रास्ताविक सुनील राठोड यांनी तर आभार शेषेराव हुरदुके यांनी मानले.
कार्यक्रमादरम्यान भोकर तालुका पोलीस पाटील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली:
---
भोकर तालुका कार्यकारिणी:
व्यंकटराव लक्ष्मणराव कापसे – तालुकाध्यक्ष
शिलानंद रामजी गायकवाड – उपाध्यक्ष
किरणकुमार बापूराव जाधव – उपाध्यक्ष
संदीप आप्पाराव राठोड – सचिव
शेषेराव दतरामजी हुरदुके – कार्याध्यक्ष
होनाजी नारायण बोडके, श्रीराम सूर्यवंशी – सहसंघटक
सुनील अशोक किनेवाड – संघटक
बालाजी शानमवाड – कोषाध्यक्ष
सुनील जयवंतराव राठोड – पोलीस स्टेशन प्रभारी
नितीन आप्पाराव राठोड – कार्याध्यक्ष
पुंजाराम कोरे – सोशल मीडिया प्रमुख
श्रीनिवास श्रीमलवार – प्रसिद्धी प्रमुख
नारायण कुलुरवाड – सहसंघटक
---
महिला कार्यकारिणी:
सुलोचना प्रकाश खांडरे – जिल्हा उपाध्यक्ष
कविताबाई चंदरवाड – तालुकाध्यक्ष
यशोदाबाई खंदारे – उपाध्यक्ष
कोंडुबाई आलुरे – सचिव
सुरेखा राठोड – सहसचिव
सुजाता राजपवाड – संघटक
सुनिता काळेकर – सहसंघटक
आशाताई चव्हाण – कोषाध्यक्ष
स्वाती पानपट्टी – पोलीस स्टेशन प्रभारी
विद्याताई मेंडके – सहप्रभारी
---
कार्यशाळेच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या कार्यातील अडचणी, प्रशासनाशी संवाद व सुधारणा यावर सखोल मार्गदर्शन