महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहर

  • Home
  • महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहर Maharashtra state Marathi reporter organisation

दुबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री वसंत मुंडे साहेब यांना लोकमत वृत...
01/06/2023

दुबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री वसंत मुंडे साहेब यांना लोकमत वृत्त समूहाचा एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

13/03/2023
उत्तम आरोग्यासाठी प्रिव्हेंशन गरजेचे - डॉ. दीपाली चिंचोलेपिंपरी : स्पर्धात्मक युगामध्ये माणसाचे जगणे अधिक अस्थिर आणि धाव...
13/03/2023

उत्तम आरोग्यासाठी प्रिव्हेंशन गरजेचे - डॉ. दीपाली चिंचोले

पिंपरी : स्पर्धात्मक युगामध्ये माणसाचे जगणे अधिक अस्थिर आणि धावपळीचे होऊन गेले आहे. अशा स्थितीत उत्तम आरोग्यासाठी "प्रिव्हेन्शन" हा एकच कानमंत्र असू शकतो असे मत अ‍ॅकॉर्ड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिपाली चिंचोले यांनी सोमवारी व्यक्त केले.

अ‍ॅकॉर्ड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे . यावेळी डॉ. दिपाली चिंचोळे बोलत होत्या . यावेळी क्रांती चव्हाण, डॉ. अभिजित घंगाळे , न्यूरोसर्जन डॉ. विवेक बोन्डे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, तसेच पराग कुंकूलोळ उपस्थित होते.

१३ ते १५ मार्च या कालावधीत हे शिबीर पार पडणार आहे. या शिबीरा दरम्यान एक्स रे, सोनोग्राफीसह, टूडी इको यांसह इसीजी, सीबीसी, आरएनटी, फिजिशियन ओपिनियन देण्यात येणार आहेत.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. दिपाली चिंचोळे, म्हणाल्या बऱ्याचदा अनेक जण आपल्या आरोग्याच्या बाबत दुर्लक्ष करताना दिसतात. सुपर स्पेशलिटी कन्सल्ट अर्थात सल्ला घेणे टाळतात. यामध्ये आर्थिक भाग महत्त्वाचा असतो. मात्र तरी देखील कोणत्याही आजाराची गुंतागुंत वाढल्यानंतर येणारा आर्थिक भार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो. हे टाळण्यासाठी रोग निदान किंवा प्रिव्हेन्शन ही काळाची गरज बनत चाललेली आहे. एखाद्या रोगाचे निदान किती महत्त्वाचे होते हे जवळचा व्यक्ती गमावल्याशिवाय कळत नाही मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हा उशीर टाळण्यासाठीच वर्षातून एकदा सर्व प्रकारच्या तपासण्या करणे गरजेचे आहे. कॅन्सर, हृदयविकार यांसारख्या आजारांमध्ये खूप उशिरा आजार कळल्यानंतर त्यातील गुंतागुंत वाढत जाते. मात्र आपली मानसिकता ही कोणताही आजार अंगावर काढण्याची असल्याने अनेकदा रुग्ण यामध्ये आजार बळावून बसतात.
हाच विचार करून अ‍ॅकॉर्ड हॉस्पिटलने यंदाच्या वर्षात दहा हजार हेल्थ कार्ड वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर हे कार्ड नागरिकांना दिले जाणार आहे. ज्या माध्यमातून एका कार्डवर कुटुंबातील सहा सदस्यांना उपचार घेता येणार आहे. असेही डॉ. दिपाली चिंचोले यांनी सांगितले.
शिबिरासाठी पहिल्या दिवशी शहरातील पन्नास हून अधिक पत्रकारांनी नोंदणी केली.
शिबिराबाबत मनोगत पराग कुंकूलोळ यांनी व्यक्त केले. तर आभार नितीन शिंदे यांनी मांडले. या शिबिरासाठी जमीर सय्यद, प्रमोद सस्ते, नवनाथ कापले, महादेव मासाळ, बेलाजी पात्रे, योगेश घाडगे, विजय जगदाळे, संदीप सोनार, आदींनी परिश्रम घेतले.

13/02/2023
26/08/2022
भावपूर्ण श्रद्धांजली....!ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवा...
07/06/2022

भावपूर्ण श्रद्धांजली....!

ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते.

Address

Dharma Building 1st Floor, Opp Dena Bank Bhosri Pune
Pimpri Chinchawad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share