Pravin Dilip Jadhav

  • Home
  • Pravin Dilip Jadhav

Pravin Dilip Jadhav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pravin Dilip Jadhav, Digital creator, .

17/08/2024

अर्शद नदीमचे खरे नाव हर्षद निगम होते त्याचे वडील काश्मीरमध्ये एका सेठच्या घरी कारकून म्हणून काम करायचे. मग एके दिवशी मोठ...
17/08/2024

अर्शद नदीमचे खरे नाव हर्षद निगम होते त्याचे वडील काश्मीरमध्ये एका सेठच्या घरी कारकून म्हणून काम करायचे. मग एके दिवशी मोठा पूर आला घाबरलेल्या अवस्थेत हर्षदच्या वडिलांनी छोट्या होडीने संपूर्ण कुटुंबाला बुडण्यापासून वाचवले, मात्र नदीच्या पाण्याचा वेग इतका जास्त होता की बोट वाहून पाकिस्तानात गेली. त्यानंतर हर्षदच्या वडिलांनी नाव बदलले आणि तिथे दुसऱ्या सेठकडे काम करायला सुरुवात केली. जास्त वेतनामुळे हर्षदचे वडील पाकिस्तानात स्थायिक झाले. हर्षद निगमचेही नाव बदलून अर्शद नदीम करण्यात आले.
हर्षद जरी आज पाकिस्तानकडून खेळत असला तरी त्याच्या पूर्वजांचा पूर्वी भारताशी काही ना काही संबंध होता. हर्षदला गुर्जर, जाट किंवा पंडित म्हणणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. तो ज्या पद्धतीने मैदानात शांतपणे खेळतो, त्यावरून त्याच्या स्वभावावरून लक्षात येते की तो पूर्वी नक्कीच कायस्थ होता.
(व्हॉट्सॲप विद्यापीठातून प्राप्त)

!!!...शिवरायांच्या छायेखाली !!!...कधीच नव्हती वाण..!!!..आनंदाने नांदत होते !!!..हिँदू मुसलमान ..!!!...काळ्यारात्री तळपत ...
16/08/2024

!!!...शिवरायांच्या छायेखाली
!!!...कधीच नव्हती वाण..
!!!..आनंदाने नांदत होते
!!!..हिँदू मुसलमान ..

!!!...काळ्यारात्री तळपत होतं
!!!...जिच्या रूपाचं उन,
!!!...अशी देखणी होती
!!!...एका मुस्लीमाची सून,

!!!...त्या तरूणीला आई म्हणाला
!!!...राजा तो शीलवान,
!!!...आनंदाने नांदत होते
!!!...हिँदु मुसलमान....

!!!...बांधीत होता मस्जिद ईथे अन् तेथे मंदिर,
!!!...त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शीर,
!!!...अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान,
!!!...आनंदाने नांदत होते हिँदु मुसलमान...!!

!!!...वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन,
!!!...मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन,
!!!...असाच माझा शिवबा होता माणुसकीची खाण,
!!!...आनंदाने नांदत होते हिँदू मुसलमान....!!!

-महाकवि वामनदादा कर्डक

04/08/2024

देशाच्या अधोगतीचे मुख्य कारण देशातील नागरिकांना भारतीय अस्मीतेहून राजकीय पक्षाची अस्मिता मोठी वाटु लागलीय त्यांनी स्वार्थासाठी अक्षरशः पक्षांची गुलामी सुरू केलीय....

03/08/2024

लोकसभा निवडणकीत संविधान बचाव चा नारा देनारी India आघाडी आणी ती निर्भय बनो ची पिल्लावळ SC/ST क्रिमिलीयर मुद्यावर गप्प का???
✍🏽प्रविण जाधव

!....नाही भाकर पोटाला जरी !....नाही पाणि ओठाला तरी !....नाही लाकूड प्रेताला घरी !....तरी अट्टहास लढ‌ण्याचा. !....तरी अट्...
04/04/2024

!....नाही भाकर पोटाला जरी
!....नाही पाणि ओठाला तरी
!....नाही लाकूड प्रेताला घरी
!....तरी अट्टहास लढ‌ण्याचा.
!....तरी अट्टहास भिडण्याचा...
!....छाती ठोकूण सांगतोय मर्दा
!....कारण वारसा आहे भिमाचा..

✍🏼 #प्रविण_जाधव ..!

जागतिक महिला दिनाच्या सर्व माताभगिनींना हार्दिक शुभेच्छा.....       स्ञी ही पुरुषाहुन कधीही श्रेष्ठच म्हणावी लागेल कारण ...
08/03/2024

जागतिक महिला दिनाच्या सर्व माताभगिनींना हार्दिक शुभेच्छा.....
स्ञी ही पुरुषाहुन कधीही श्रेष्ठच म्हणावी लागेल कारण प्रत्येक स्त्री किंवा पुरूषाने स्ञीपोटीच जन्म घेतला आहे माझा हा युक्तीवाद कोणीही खोडु शकनार नाही. स्ञी ही आई, बहिण, पत्नी, मुलगी, सुन ह्या रुपात मातृत्व, वात्सल्य आणि मायेचा जो इंद्रधनुष्य तयार करते, त्याला जगात जोड आणि तोड नाही.
आज जागतिक महिला दिन म्हणून व्यक्त होताना प्रकर्षाने नमुद करावेसे वाटते की बालविवाह, सतिप्रथा व चुल आणि मुल ह्या प्रथांविरूध्द प्रचंड संघर्ष करुन ह्या पुरूषप्रधान संस्कृतीत आपली गुलामीची साखळदंड तोडुन प्रधानमंत्री, राष्ट्रपती, खासदार, आमदार, महापौर ही संविधानीक पदापर्यंत ते डाॅक्टर, इंजीनिअर, वकिल, शिक्षक,पायलट अश्या अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मारलेली मजल वाखानन्याजोगी आहे. त्यासाठी स्ञी शक्तीला माझा ञिवार मानाचा मुजरा
पण ह्यात फुले, शाहु, आंबेडकर विचाराची मोलाची भूमिका आहे. फुले दाम्पत्याने स्ञी शिक्षणासाठी खालेले दगड धोंडे, सोसलेला शेणाचा मारा, अपमान, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान, दिलेला हिंदू कोडबिलसाठी लढा त्यासाठी त्यांनी दिलेला स्वतंत्र भारताच्या प्रथम कायदेमंञीपदाचा राजीनामा ह्याचा स्ञी शक्तीला पडलेला विसर दुर्दैवी आहे. गुलामीतुन बाहेर काढून आणलेल्या महापुरुष व साविञीमाईसारख्या माता-भगीनींना स्ञीशक्तीने विसरु नये एवढीच माफक अपेक्षा.......

✍🏽......प्रविण दिलीप जाधव
गंगापूर ता. जि. नाशिक
9850304382........

!!...दिव्यागत स्वतः जळून!!...ज्ञानाचा उजेड झाली!!...धन्य ती साविञीमाय!!...मायेचा सागर झाली #भारतीय_प्रथम_महिला_शिक्षिका ...
03/01/2024

!!...दिव्यागत स्वतः जळून
!!...ज्ञानाचा उजेड झाली
!!...धन्य ती साविञीमाय
!!...मायेचा सागर झाली

#भारतीय_प्रथम_महिला_शिक्षिका #साविञिमाई_फुले_जयंतीदिनी_विनम्र_अभिवादन

✍🏼......प्रविण जाधव.....
मो. 9850304382
मु. पो. गंगापूर ता. जि. नाशिक

!!!!....अंधाराचा सुर्य तु!!!!....गरीबांचा दाता !!!!....अज्ञान्यांचा आधार तु!!!!....सुज्ञानाचा ग्याता !!!!....दिनांचा वाल...
24/08/2023

!!!!....अंधाराचा सुर्य तु
!!!!....गरीबांचा दाता
!!!!....अज्ञान्यांचा आधार तु
!!!!....सुज्ञानाचा ग्याता
!!!!....दिनांचा वाली तु
!!!!...गुलामांचा मुक्तीदाता....

!!!!....विषमतेचा शञु तु
!!!!....समतेचा पिता
!!!!....गुन्ह्यांचा धाक तु
!!!!....न्यायाचा ग्याता
!!!!....सत्याचा वाली तु
!!!!....भ्रष्टाचार्यांचा मृत्युदाता....

!!!!....पाण्याचा सागर तु
!!!!....हिंदूंची गिता
!!!!....मुस्लिमांचे कुराण तु
!!!!....बायबलच्या बाता
!!!!....धम्रनिरपेक्षतेचा आत्मा तु
!!!!....देशवासीयांची भारतमाता....

!!!!....शोषितांचा ईश्वर तु
!!!!...शिक्षनाचा भ्राता
!!!!....संघर्षीचा स्वामी तु
!!!!....संविधानाचा नेता
!!!!....समतेचा मानदंड तु
!!!!....जनसामान्यांचा राष्ट्रपीता....

!!!!....सुशिक्षितांचा प्रतिनिधी तु
!!!!....लोकक्रांतीची छटा
!!!!....धमन्यांतील रक्त तु
!!!!....सैनिकाचा ताठा
!!!!....दुःखीतांचे सर्वस्व तु
!!!!....भुकेल्यांचा अन्नदाता....

✍🏼......प्रविण जाधव.....
मु. पो. गंगापूर
ता. जि. नाशिक

!!!..खितपत पडलेला समाज..!!!!!!..आता सत्ताधीश होतोय..!!!!!!..जो पुर्वी गुलाम होता..!!!!!!..तो आता वाघ होतोय..!!!!!!..कोण ...
30/07/2023

!!!..खितपत पडलेला समाज..!!!
!!!..आता सत्ताधीश होतोय..!!!
!!!..जो पुर्वी गुलाम होता..!!!
!!!..तो आता वाघ होतोय..!!!
!!!..कोण आहे शिकवणारा..!!!
!!!..संघटित करनारा..!!!
!!!..संघर्ष करणारा..!!!
!!!..हे आठवून अस्वस्थ होते..!!!
!!!..खरे सांगतो बाबा..!!!
!!!..तुमची आठवण येते...!!!

!!!..कोण आहे संकटात तारनारा..!!!
!!!..जातिवाद्यांचा घाम घालणारा ..!!!
!!!..मनुवाद्यांचे तोंड फोडणारा..!!!
!!!..एकाकी झुंज देउनही..!!!
!!!..विरोधी सैन्याला ठार करणारा..!!!
!!!..ह्या घटनांनी मन हेलावून जाते..!!!
!!!..खरे सांगतो बाबा..!!!
!!!..तुमची आठवण येते..!!!

!!!..कोण आहे अस्तित्व देणारा..!!!
!!!..स्वाभिमानी जगनं शिकवणारा ..!!!
!!!..विषमतेला सतत ठेचनारा..!!!
!!!..बहुजनांसाठी रक्त आटवणारा ..!!!
!!!..हे आठवून डोळ्यांना पाणी येते ..!!!
!!!..खरे सांगतो बाबा ..!!!
!!!..तुमची आठवण येते..!!!

!!!..कोण आहे गुलामीतुन सोडवणारा..!!!
!!!..कायद्याची वज्रमूठ दाखवणारा..!!!
!!!..बुध्दांना भेटवणारा..!!!
!!!..दलितांना पित्याचे प्रेम देणारा..!!!
!!!..अशा विचारांनी गहिवरून येते..!!!
!!!..खरे सांगतो बाबा..!!!
!!!..तुमची आठवण येते..!!!

✍🏼 #प्रविण_जाधव

09/06/2023

' जात ' ही भारत देशाला झालेली हजारो वर्ष जुनी आणि प्रचंड मोठी जखम आहे स्वातंत्र्याची ७५ वर्ष उलटली पण अजूनही ही जखम नित्यनियम भळभळत आहे.

19/03/2023

'शुद्र' हा शब्द मी जरुर मानतो, पण माझ्यामते जो देशद्रोही, आतंकवादी, जातिवादी आहे तो 'शुद्र ' आहे.
✍🏼......प्रविण जाधव.....

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pravin Dilip Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share