10/11/2021
फाल्गुनी नायर पहिल्या सेल्फ मेड बिलेनियर वुमन
नायका शेअरच जोरदार लिस्टिंग
एफएनस ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या मालकीचा नायका ब्रँडचं शेअर लिस्टिंग जोरदार झाले. नायका एक शेअर ११२५ रुपयांना आयपीओच्या वेळी होत आणि लिस्टिंग ७९.४ टक्के प्रीमियमसह २०१८ रुपयांना लिस्ट झाला. कंपनीचं मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांवर, तर फाल्गुनी नायर यांची नेटवर्थ (मालमत्ता) ६५० कोटी डॉलर झाली. यामुळे कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर या अब्जाधीश झाल्या असून त्या देशातील पहिल्या सेल्फ मेड वूमन आहेत.
नायका आयपीओपूर्वी नफ्यात असणारी भारतातील पहिली युनिकॉर्न (१०० कोटी डॉलर व्हॅल्यूएशन असणारी कंपनी) असून, हे सेल्फ मेड वुमनने सुरू केलेल्या युनिकॉर्नच लिस्टिग होण्याचे दुर्मीळ उदाहरण. ऑनलाइनबरोबर नायका ४० शहरांतून २००० ब्रँडची २ लाखांहून अधिक प्रॉडक्ट ८० स्टोअरमधून विक्री करते. एफएनस ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या मालकीचा नायका ब्रँड असून, ब्यूटी प्रॉडक्ट ते फॅशनवेअरची विक्री केली जाते.
आयपीओ पूर्वी नायका ब्रँडचं व्हॅल्यूएशन ७ अब्ज डॉलर होतं व लिस्टिंगनंतर ते १४ अब्ज डॉलरवर पोचलं. फाल्गुनी नायर यांच्याकडे कंपनीचे विविध माध्यमातून 50 टक्क्यांपेक्षा अधिक शेअर आहेत. नायकाचा लिस्टिंगमुळ त्यांची नेटवर्थ (मालमत्ता) ६५० कोटी डॉलर झाली.
सेल्फ मेड वुमन असलेल्या फाल्गुनी नायर यांनी बिझनेस वुमन लीडरमध्ये बायोकॉनच्या किरण शॉ मुजुमदार यांना मागे टाकल आहे.