
17/07/2025
*आणि शेवटी धुळ्यामधील कोमल ,शांताराम आणि भुरी यांच्यापर्यंत मदत पोहोचली* ...
धुळ्याच्या निमडाळे गावातून मेंढ्यांना घेऊन गावोगावी स्थलांतरित होणाऱ्या आबा नाना परळकर, निमडाळे यांची मुलं ,नातवंडे कोमल, भुरी ,संतोष, शांताराम दाद्या यांना शेवटी शैक्षणिक साहित्य कपडे बॉटल शूज आणि इतर दैनंदिन जीवन उपयोगी वस्तू दिनांक 15 जुलै 2025 रोजी निमडाळे गावात धनगर वस्तीमध्ये जाऊन आदरणीय विलास मुरलीधर बोडके जिल्हा माहिती अधिकारी धुळे ,संदीप गावित उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय धुळे ,ज्येष्ठ छायाचित्रकार अशोक पाटील निमडाळे येथील सर्व ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते राहुल सूर्यवंशी ,सागर पाटील भूषण पाटील... त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
श्रीमती साधना लहानु पेलमहाले यांच्या माहेरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये.. आलेल्या या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करून त्यांना तिथेही सर्व प्रकारची मदत पोहोचवली गेली. पण त्यानंतर फेसबुक वरती मदतीसाठी आव्हान केल्यानंतर... अनेक लोकांनी पुढे येऊन अत्यंत आनंदाने ही मदत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली..
यामध्ये प्राथमिक शिक्षक संघटना दिंडोरीचे विलास पेलमहाले, सचिन वडजे, मडकीजांब गावच्या पोलीस पाटील रोहिणी वडजे, आशेवाडीच्या पोलीस पाटील सुनीता बोडके मॅडम, दिंडोरीचे आदर्श नगरसेवक आदरणीय नितीन भाऊ गांगुर्डे, श्री देविदास आणि बाळासाहेब पेलमहाले, प्रसाद, दत्ता ,पिंटू, पेलमहाले , जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी चे प्राचार्य आदरणीय श्री शेजवळ सर ,ज्येष्ठ पत्रकार आणि सर्वांना नेहमीच मदत करणारे आदरणीय श्री. संतोष कथार सर, अरुण,पाटील सर, नेहा देशमुख, प्रसाद देशमुख, कुयटे मॅडम , निकम मॅडम ,बच्छाव मॅडम, देशपांडे मॅडम सांजेगावच्या शताक्षी पुरकर, सटाण्याच्या स्नेहा ठोके, श्री ज्ञानेश्वर संधान व संपूर्ण कुटुंब, पेलमहाले परिवार.. आणि इतर अनेक लोकांचे हातभार या पवित्र कार्याला लागले. आणि अखेर या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचली. त्याबद्दल सर्व समाज माध्यमांचे मनापासून आभार