
16/09/2025
जीसीए निवडणुकीत बाळू फडके-चेतन देसाई गटाचे निर्भेळ यश. परिवर्तन गटाचा भोपळा...
गोवा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक; महेश देसाई अध्यक्षपदी
पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या(जीसीए) निवडणुकीत महेश देसाई अध्यक्षपदी विजयी झाले. एकूण १०७ मतांपैकी ६२ मते मिळवत त्यांनी महेश हरिश्चंद्र कांदोळकर (४५ मते) यांचा पराभव केला.
उपाध्यक्षपदासाठी परेश गोविंद फडते यांनी ६३मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी राजेश तुळशिदास पाटणेकर यांना ४३ मते मिळाली.
सचिवपदावर तुळशिदास शेट्ये यांची निवड झाली. त्यांना ५९ मते मिळाली, तर दया पागी (४३) आणि हेमंत भिकू पै आंगले (३) यांना पराभव पत्करावा लागला.
संयुक्त सचिवपदावर अनंत नाईक यांचा दणदणीत विजय झाला. त्यांना ७० मते मिळाली, तर सुशांत नाईक यांना ३६ मते मिळाली.
खजिनदारपदासाठी सैयद अब्दुल मजीद यांनी ५८मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी रूपेश जयराम नाईक यांना ४८ मते मिळाली.
सदस्यपदासाठी महेश बेहकी यांनी ६५ मते मिळवत विजयी ठरले. त्यांचे प्रतिस्पर्धी मेघनाथ अंकुश शिरोडकर यांना ४१ मते मिळाली.
आज १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या निवडणुकीत एकूण १०७ मतदारांपैकी सर्वांनी मतदान केले. निवडणुकीचा निकाल जाहीर करताना निवडणूक अधिकारी ए. के. जोती उपस्थित होते.
Vipul Phadke
#मराठीवृत्त #गोवा #नवप्रभा