06/09/2025
AI चा कसून अभ्यास करणे . हे क्षेत्र केवळ प्रोग्रॅमर्स साठी नाही:
- "केवळ" पाच कोटी डॉलर्समध्ये, मी कॉम्प्युटर मधे मानवी मेंदू निर्माण करून दाखवीन असे एका अमेरिकन उद्योजकाने नुकतेच म्हटले आहे. यावर तात्विक आक्षेप भरपूर आहेत: मानवी कॉन्शसनेस म्हणजे "कॉम्प्युटेशन" ('संगणन "?) नव्हे, "कॉम्प्युटेशन" ला स्वतःचे "भान" किंवा "स्वेच्छा" नसते, ती कशी आणणार या जातीचे ते आक्षेप आहेत.
- पण माझा मुद्दा वेगळाच आहे, ते म्हणजे तुमच्या डोक्यातही आज हे किमान पाच कोटी डॉलर्सचे "यंत्र" नक्कीच आहे. मानवी मेंदू एक सेकंदात जे करू शकतो त्याला सुपरकॉम्प्युटरला चाळीस मिनिटे लागायची. (आता नव्या शक्तीशाली चिप्समळे हे कुठवर आले आहे माहिती नाही. ) मुद्दा मेंदूची ही व्हॅल्यू "प्रत्यक्षात" (म्हणजे तुमच्या खिशात!) कशी आणायची हा आहे.
- आता भारतातली अर्थव्यवस्था मला समजत नाही, त्यामुळे मी फारसे काही बोलू शकत नाही, पण मराठी माणसासाठी काही निरीक्षणे:
- तुमची "बिरादरी" तुमच्या उत्पन्नाचा परीघ ठरविते. बरेचसे लोक आपल्या बिरादरीच्या (आप्तेष्ट आणि इष्टमित्र) +/- १५ टक्के या उत्पन्नाच्या सीमांमध्येच राहतात. एखादा जो त्यापलीकडे यशस्वी होतो त्याचा अनेकदा बिरादरीशी संबंध तुटतो. पण बिरादरीच्या "विचार-परिघामुळे " जर तुम्ही मर्यादित राहत असाल तर त्याच्या बाहेर पडणे अत्यंत महत्वाचे. बिझनेस कास्ट्स (गुजराथी, मारवाडी, सिंधी-पंजाबी) मधले मित्र प्रयत्नपूर्वक जोडणे. त्यांची विचार-प्रक्रियाच वेगळी असते: तुमच्याच बुद्धिमतेचा माणूस तुमच्या अनेक-पट पैसा का आणि कसा मिळवतो?
- नव्या AI मुळे जुने प्रोग्रामिंग मधले शिक्षण झपाट्याने कालबाह्य होत चालले आहे हे लक्षात घेणे. जुने प्रोग्रामिंग चे शिक्षण घेतलेली मुले आज बेकारीच्या खाईत सापडली आहेत. ज्यांना आय टी मध्ये नोकऱ्या आहेत त्याही धोक्यात येऊ लागल्या आहेत.
- याउलट AI मध्ये जगभरात १० ट्रिलियन डॉलर्सची नवी गुंतवणूक येऊ घातली आहे. यात केवळ यूरोप अमेरिकाच नाही तर भारत आणि चीनही सामील आहे. बाहेरचा टॅलन्ट आयात करण्यासाठी चीनने नुकताच "K" व्हिसा काढला आहे.
- "nanobanana" हा AI एजंट , कोणतेही कोडिंग न करता तुम्हाला AI वापरू देतो. कॉम्प्युटरला जन्मात हात न लावलेली ८० वर्षांची बाई, कॉम्प्युटरला "तोंडी" आज्ञा देऊन काम करून घेऊ शकते.
- सर्व बिझनेस प्रोसेसेस मध्ये AI येऊ लागले आहे. परवा (अमेरिकेत) मी गाडीतून एका "टॅको बेल" मध्ये ऑर्डर दिली ती पूर्णपणे AI-बेस्ड होती: मी बोललेले समोर फलकावर दिसत होते, त्याची टोटलही दिसत होती. (यात एका माणसाचा जॉब गेला हे उघड आहे!).
AI चा कसून अभ्यास करणे . हे क्षेत्र केवळ प्रोग्रॅमर्स साठी नाही, त्यात कसे शिरता येईल ते बघणे. (कृपया " AI for Non-coders " या जातीचा सर्च करणे , भरपूर माहिती आणि कोर्सेस सापडतील. )
शुभेच्छा!
Milind Padki
facebook[.]com/milind.padki.1