25/12/2019
प्रिय मित्र,
राहुल भंडारे आणि मिलिंद शिंत्रे,
मित्रांनो, खरंतर मला अशा पद्धतीने इथे व्यक्त व्हावं लागेल असं वाटलंच नव्हतं आणि मला ते आवडत देखील नाहीये पण हा माझा नाईलाज आहे असच समजा.
इतर माध्यमांशी संपर्क करण्याआधी खरंतर तुम्ही दोघे नाटक क्षेत्रातील मित्र म्हणून मैत्रीखातर तुम्हाला आधी संपर्क केला, पण तुमच्या अनपेक्षित उत्तरांमुळे आणि अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळेच हे पुढचे पाऊल उचलण्याची गरज भासली.
"झी" हे माध्यम खरंतर खूप पॉवरफुल असताना आम्हाला या प्लॅटफॉर्मचा पुढे फायदाच झाला असता, पण मी वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही मला सहकार्य न करण्याच्या तुमच्या भूमिकेमुळे मला माझ्या या भूमिकेवर इच्छा नसतानाही उतरावे लागले. कारण मी माझ्या क्षेत्राशी आणि कलेशी नेहमीच प्रामाणिक राहत आलेलो आहे आणि यापुढेही तसाच राहणार आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आम्ही संपर्कात आहोतच. त्यातूनही पुढे काय मार्ग निघतोय या प्रतीक्षेत आम्ही आहोत.
सारासार विचार केला तर मराठी नाटकाचे भविष्य कमीत कमी काही महिने किव्वा एखादे वर्ष तरी असते, टीव्ही मालिकेचे आयुष्य हे कमीतकमी एक वर्ष ते अनेक वर्ष असते. परंतु एका मराठी चित्रपटाचे भविष्य फारतर फार एखादा किंवा दोन आठवडे. इतकी भयानक स्पर्धा असताना देखील दिग्दर्शक-निर्माते चांगल्या दर्जाची कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची धडपड करत असतात. त्यात असे अनेक घोटाळे घडताना दिसतात. त्यात शीर्षकाहून झालेल्या घोटाळ्यावरून अशा पद्धतीचा आर्थिक किंबहुना अधिक मानसिक त्रास आपल्या क्षेत्रामधील अनेक निर्माते-दिग्दर्शक अनुभवत असतात.
या संदर्भात सर्व निर्माते-दिग्दर्शक यांनी एकत्र येऊन सपोर्ट करावा अशी माझी कळकळीची आणि प्रामाणिक विनंती आहे.
हे सर्व माझे मित्र मला याबाबतीत नक्कीच सहकार्य करतील अशी आशा आहे.
खाली दिलेल्या हॅश टॅगला सपोर्ट करून आपापली प्रतिक्रिया नोंदवण्यात यावी.