Uday News Jalna

  • Home
  • Uday News Jalna

Uday News Jalna Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Uday News Jalna, News & Media Website, Jalna, .

उदय न्यूज जालना - ३५ वर्षांच्या पत्रकारिता अनुभवासह एक नवा डिजिटल पत्रकारिता प्रवास. संपादक राजेंद्र घुले यांच्या नेतृत्वाखाली आमचे चॅनेल आपल्या प्रेक्षकांना ताज्या घडामोडी, सुस्पष्ट आणि विश्वसनीय बातम्या प्रदान करण्यासाठी तत्पर. उदय न्यूज जालना - ३५ वर्षांच्या पत्रकारिता अनुभवासह एक नवा डिजिटल पत्रकारिता प्रवास. संपादक राजेंद्र घुले यांच्या नेतृत्वाखाली आमचे चॅनेल आपल्या प्रेक्षकांना ताज्या घडामो

डी, सुस्पष्ट आणि विश्वसनीय बातम्या प्रदान करते. आपली वाचा व आपल्या आवाजाचा प्रभावी पोहोच साधत, आम्ही सत्य आणि प्रामाणिकतेची प्रतिष्ठा राखतो. समाजातील प्रत्येक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आमच्या चॅनेलवर मिळवू शकता ताज्या, तंतोतंत आणि निष्पक्ष बातम्या.

12/08/2026

पोलीस प्रशासनातर्फे उद्या जालना शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन.
तिरंगा रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांचे आवाहन

10/08/2026

🚨 जालन्यात मोठा शस्त्रसाठा जप्त!

जालना शहरातील सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा एकूण सुमारे ₹१ लाख ३४ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही धारदार शस्त्रे जालना, भोकरदन आणि परतूर शहरातील विविध ठिकाणी विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आली होती.

या शस्त्रांची मागणी राजस्थानमधील अजमेर येथून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

📍 जालना | महाराष्ट्र
🔎 संपूर्ण बातमी

08/08/2026

रावसाहेब दानवे यांनी आता राज्यपाल व्हावे, आम्ही सगळे पाठिंबा देऊ! — आ. बबनराव लोणीकर

08/08/2026

🚨 **कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू**

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी जवळ शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दफनविधीहून परतत असताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.

या दुर्घटनेत कारमधील दोन महिलांचा मृत्यू झाला. मयत महिला भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्या अवघडराव सावंगी येथे नातलगांच्या दफनविधीसाठी गेल्या होत्या.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी अपघातग्रस्त कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली.

या दुर्दैवी घटनेने धावडा परिसरासह भोकरदन तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

📍 **घटनास्थळ:** वालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना
📰 **Uday News Jalna | उदय न्यूज जालना**

07/08/2026

🚨 तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला आजन्म कारावास

जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २१ वर्षीय आरोपी अजय संतोष विटोरे याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

१० जून २०२६ रोजी जालना शहरात घडलेल्या या धक्कादायक घटनेत आरोपीने चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाचा अल्पावधीत निकाल लागल्याने न्यायव्यवस्थेच्या जलद कार्यवाहीची नोंद घेतली जात आहे.

📍 Uday News Jalna

अजय आढाव खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी २ वाजेच्या सुमारास नूतन वसाहत परिसरात तुफान दगडफेकीची घटना घडली आहे. दग...
07/08/2026

अजय आढाव खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी २ वाजेच्या सुमारास नूतन वसाहत परिसरात तुफान दगडफेकीची घटना घडली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर या परिसरातील दुकाने व आस्थापना बंद करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

07/08/2026

अजय आढाव खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी २ वाजेच्या सुमारास नूतन वसाहत परिसरात तुफान दगडफेकीची घटना !

06/08/2026

🚨 जालना ब्रेकिंग | नूतन वसाहत परिसरात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

जालना शहरातील नूतन वसाहत उड्डाण पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी अजय विक्रम आढाव (वय 25) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून जुन्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

📍 अधिकृत आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Uday News Jalna सोबत राहा.

05/08/2026

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिला. आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

📍 अधिक स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा Uday News Jalna

05/08/2026

🚨 सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

जालना शहरातील महिलांच्या अंगावरील सोनसाखळी चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीचा कदीम जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ५४.९९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तपासादरम्यान चोरीस गेलेल्या सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र आणि गळ्यातील सोन्याची चेन हस्तगत करून संबंधित फिर्यादींना परत करण्यात आले.

२२, २४ आणि ३० जुलै २०२६ रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तीन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा या कारवाईमुळे उलगडा झाला आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलीस शोधमोहीम राबवत आहेत.

📍 Uday News Jalna – आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्यासोबत राहा.

Address

Jalna

431203

Telephone

+917083131907

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uday News Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Uday News Jalna:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share