Panchashil News TV

  • Home
  • Panchashil News TV

Panchashil News TV बहुजन वंचित समाजातील समस्या मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी बहुजनांचे हक्काचे न्युज चॅनेल .

आर्वी सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने आर्वी शहर बंद१६/१२/२०२४ ला शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने परभणी येथी...
18/12/2024

आर्वी
सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने आर्वी शहर बंद

१६/१२/२०२४ ला शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने परभणी येथील भारतीय संविधान शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्या देशविरोधी कृत्य करणारी व्यक्तीवार वर देशदोहाचा गुन्हा दाखल करणे बाबत व शहीद सोपनाथ सूर्यवंशी न्याय देण्यात यावा अशा मागणीचा निवेदन उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांना देण्यात आला. व संपूर्ण आर्वी शहर बंद ठेवण्यात आला.
दिलेल्या निवेदनात दि. १०/१२/२०२४ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतीय संविधान शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीस फक्त अटक करून चालणार नाही तर त्याच्यावर प्रशासनाने देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी परभणी भीम सैनिकांचे गुन्हे मागे घेण्यात यावे, व शहीद सोपान सूर्यवंशी यांना तात्काळ न्याय मिळावा अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण देखरेख समिती आर्वी व आंबेडकरी समाज बांधवांच्या च्या वतीने संपूर्ण आर्वी शहरात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. यास महाराष्ट्र सरकार संपूर्ण जबादार राहील याची नोंद घ्यावी असे लिखित निवेदन देण्यात आले.
झालेल्या कृत्यामुळे आंबेडकरि समाज बांधवा तर्फे संपूर्ण आर्वी शहर बंद होते.दर्पण टोकसे, दीपक ढोणे , प्रवीण काळे, रवी गाडगे, सागर मोटघरे, अमरदिप मेहरे, आकाश वाघमारे, अजय बोंद्रे, संदेश डंभारे, गौतम मेश्राम , प्रमोद चौरपगार, अनिल माहूरे, प्रदीप मेंढे, गौतम कुंभारे, मधुकर सवाळे, पंजाबराव कांबळे, निरंजन पाटील, नरेश निवाते, सचिन पाटील, युवराज दहाट, सौरभ टोकसे, मंगेश सरोदे, सूरज डोंगरे, तुषार तळेकर, गजानन वावरे, संदीप पाटील, विनोद पायले, प्रवीण मनवर, विजय धुळे, गौतम पोहणे, रोहित बांबुडकर, सूरज मेहरे, प्रतीक नाखले, किरण कोल्हे, सुमित वाघमारे, अरविंद वाघमारे, सुजित भिवगडे, सुरेश भिवगडे, विलास बेंडे, अनिकेत बांबूडकर, ईशांत हाडके, तेजस मोटघरे, साक्षात हाडके, अभय गायकवाड, रोहित रामटेके,मिलिंद मेहरे, कुंदन वासनिक , राहुल गोसावी, सूरज गजभिये, उज्वल पाटील, सर्व आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....

31/10/2024

मायबाप #आंबेडकर लवकर बरे व्हा..😔

आदरणीय #बाळासाहेब_आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची सध्याची प्रकृती स्थिर असून येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार

साहेब लवकर बरे व्हा!😔😔

चला तर मग उद्या आपल्या हक्काच्या आणि विचाराच्या अनुयानी यांचा फ्रॉम भरायला जाऊ....
28/10/2024

चला तर मग उद्या आपल्या हक्काच्या आणि विचाराच्या अनुयानी यांचा फ्रॉम भरायला जाऊ....

आर्वी ता. आर्वी जि. वर्धा शहरातील येथे शासकिय विश्रामगृह परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याबाबत ...
19/08/2024

आर्वी ता. आर्वी जि. वर्धा शहरातील येथे शासकिय विश्रामगृह परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याबाबत शासन मंजूरीस्तव प्रस्ताव सादर करण्याकरीता सर्व पक्ष, सामाजिक संघटना व नगर पालिका आर्वी ठराव झालेलेला आहे व पोलिस स्टेशन यांनी सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र देण्यात असून सा. बा. विभाग विश्रामगृह परिसरातील प्रस्ताविक जागेचा शिट नं. भुमापण क्रमांक, आराजी, आखीव नकाशा, जागेचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा पुतळा बसविण्याबाबत प्रस्ताविक नकाशा, इत्यादी दस्ताऐवज यापूर्वी सादर केलेले असून अजूनही जागेचे मंजूर पत्र प्राप्त झाले नाही. राजकीय दबावा खालील सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर व नागपूर विभाग ताडाताड करण्यात येत आहे. मा. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य मंत्री साहेब तरी कृपया आपणास विनंती की विनाविलंब जागा मंजूरीचे पत्र मिळयांत यावे ही नम्र विनंती.

गोर सेना वर्धा जिल्हा याक्षशन मोडवर पंचायत समिति च्या अधिकार्याना धरले धाऱ्यावर सोमवार पर्यन्त अल्टीमेटम देण्यात आलेवर्ध...
30/07/2024

गोर सेना वर्धा जिल्हा याक्षशन मोडवर पंचायत समिति च्या अधिकार्याना धरले धाऱ्यावर सोमवार पर्यन्त अल्टीमेटम देण्यात आले

वर्धा जिल्ह्याच्या गोर सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड यांनी आर्वी पंचायत समिती अंतर्गत यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या संदर्भात जो काही पंचायत समितिच्या अधिकार्या कडून जो काही गैरप्रकार आढळून आले व अजुन पर्यन्त घरकुल लाभार्त्याच्या खात्यात अजुन पर्यन्त हप्ता न टाकल्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्वी यांना आज निवेदन "स्मरणपत्राच्या" रूपाने सादर केले.या निवेदनामध्ये आजपर्यंत यशवंतराव चव्हान घरकुल लाभार्थ्यांना ज्या काही त्रासदायक बाबी सहन कराव्या लागल्या त्या त्रासदायक बाबीच्या संदर्भामध्ये उपोषणाचा मार्ग अवलंबनाची वेळ आली तर ती सुद्धा आम्ही अवलंबणार असा अल्टिमेट आज पंचायत समिती गटविकास अधिकारी आर्वी यांना गोरसेना वर्धा कडुन देण्यात आले. यावेळी उपस्थित गोरसेना तालुका सचिव बादल राठोड़ व बोथली आणि चांदणी या गावातील घरकुल लाभार्थी फूलचंद राठोड,संजय राठोड, हिरालाल राठोड़ ,गुणवंत झामरे, शेषराव जाधव,मुकेश चव्हाण, दिवाकर चव्हाण, ज्ञानेश्वर बाळनोत, सुरेश बाळनोत, मनोहर बाळनोत,सुरेश राठोड़,गणेश राठोड़,शरद जाधव,किशोर राठोड़ इत्यादि गावकर्यांची उपस्तिथि होती

आज दिनांक 22/07/ 2024  रोज सोमवार ला विविध सामाजिक संघटनाकडून उपविभागीय अधिकारी साहेब आर्वी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी स...
23/07/2024

आज दिनांक 22/07/ 2024 रोज सोमवार ला विविध सामाजिक संघटनाकडून उपविभागीय अधिकारी साहेब आर्वी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी साहेब वर्धा श्री राहुल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की आधार सेंटर वर जन्म दाखला नसल्यास शाळेतील टी.सी .घेऊन आधार कार्ड अपडेट करण्यात यावे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जन्म दाखला हा शक्तीचा करण्यात आले आहे .जन्म दाखल्याशिवाय आधार कार्ड अपडेट होत नाही. जन्म दाखला नसल्यास शाळेची टी.सी .हा पर्याय देण्यात यावे. आर्वी शहरातील बरेच नागरिकांना आपला जन्म कुठे झाले व कोणत्या दिवशी झाले हे माहीत नसल्यामुळे ते जन्म दाखला आणू शकत नाही. जन्म दाखला नसल्यामुळे आधार कार्ड अपडेट होत नाही. जर आधार कार्ड अपडेट झाले नाही तर जवळपास सर्व कामे बंद होतात. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावे लागते. जन्म दाखला नसलेल्या व्यक्तीचे शाळेतील टी.सी .वरून आधार कार्ड अपडेट करण्याची मुभा द्यावी .जेणेकरून संबंधित नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाचे प्रतिलिपी माननीय आमदार दादारावजी केचे आर्वी विधानसभा. तसेच माननीय खासदार अमर भाऊ काळे वर्धा जिल्हा यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळेस दर्पण टोकसे ,ज्ञानेश्वर राठोड, नितीन आष्टीकर ,आनंद वंजारी ,अबरार खान, प्रवीण शर्मा, गुड्डू पठाण ,संकेत थुल,सुहास ठाकरे, प्रवीण काळे, आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आज दिनांक 26/ 2/ 2024  रोज सोमवारला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. दर्पण पंजाबराव टोकसे यांच्या नेतृत्व...
26/02/2024

आज दिनांक 26/ 2/ 2024 रोज सोमवारला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. दर्पण पंजाबराव टोकसे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन दिले. राजधानी दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आंदोलन सुरू आहे ज्या आंदोलनात शेतकऱ्यांची प्रमुख मागणी किमान आधारभूत किंमत देण्यात यावी तसेच किमान हमीभाव मुद्दा हा एपीएमसी कायद्यात ज्या तीन तरतुदी केल्या त्याच्याशी निगडित आहे. या तिन्ही कायद्यामुळे निर्माण होणारे काही धोके लक्षात घेतले तर यातून पुढील अडचणी निर्माण होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात असे नमूद केले आहे की शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्यात यावी जेणेकरून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण होणार नाही . अनेक व्यापारी व कंपन्या अस्तित्वात येऊन शेतकऱ्यांची सामूहिक बार्गेनिंग शक्ती कमी होऊन बाजार समितीचे अस्तित्व कमी होईल. जेव्हा शेतमालचे भाव कमी होईल तेव्हा हमी भावाची शक्ती नसल्याने व्यापारी व कंपन्या त्याचा फायदा घेईल . मोठ्या व्यापारी व कंपन्यांची यामुळे मक्तेदारी स्थापित होऊन शेतकरी व बजार समित्यांचे अस्तित्व कायमचे संपून जाऊ शकते. करार शेती असल्यामुळे अमर्यादा साठवणूक करण्याची तरतुदीमुळे साठेबाजी वाढेल. शासनाने या कायद्यामध्ये शेतकऱ्याला त्याच्या शेतीमाल व्यवहारासंबंधी काही तक्रार असल्यास त्याला न्यायालयीन पर्याय बंद करून प्रशासकीय पातळीवर उप जिल्हाधिकारी स्तरावर दाद मागण्याची तरतूद केली आहे. ज्यामुळे त्याला मोठ्या कंपन्यांच्या विरुद्ध न्याय मिळणे अवघड होईल. प्रशासकीय अधिकारी हे शासनाच्या हितसंबंधासाठी काम करतील व हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध व मूलभूत मानवी हक्काचे उल्लंघन आहे. वरील तीन कायदे राज्याच्या अधिका-क्षेत्रावर अतिक्रमण आहे. शेतकऱ्यांचे मालाची प्रतवारी ठरविणे ,मूल्य ,वजनमापन पद्धती याबाबतीत कुठलीच स्पष्टता नसल्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होईल. बाजार समित्या कमजोर झाल्या तर बेंचमार्क निश्चित करणे अवघड जाईल. करार शेतीमध्ये कंपन्यांची लेखी करा सक्तीची तरतूद नसल्यामुळे तोंडी शेती करार पद्धती नेहमी वापरली जाण्याची भीती आहे. करार शेतीमध्ये शेत पिकांचे नुकसान झाल्यास त्याचे भरपाई कोण देणार याची स्पष्टता नाही. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा आणि त्या हमीभावाची कडक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने, ज्या एपीएमसी च्या आवारात हमीभाव पेक्षा कमी किमतीने खरेदी होईल त्या मार्केट कमिटीच्या संचालका विरोध कायदेशीर कारवाई करावी तसेच व्यापारी अथवा अडत्या दोषी असल्यास त्यांना तुरुंगवास व आर्थिक दंड करावा आणि त्यासाठी कायदा तयार करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. निवेदन देतेवेळी कमलेश कामडी वंचित बहुजन आघाडी वर्धा महासचिव, अंकुश पखाले ,युवा आघाडी आर्वी ता. अध्यक्ष ,प्रज्वल यावले युवा आर्वी ता.महासचिव, पंकज गडलिंग ता. उपाध्यक्ष , सचिन नेताम ता. उपाध्यक्ष ,सुखदेव नंदागवळी, मार्गदर्शक, प्रवीण काळे, रवींद्र नान्हे, संजय हाडके व वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त आयोजित भीम सकाळने जिंकले सर्व आर्वीकरांची मनआर्वी येथे आयोजित दिनांक 26 नोव्हेंबर 2023 भारतीय संविधा...
28/11/2023

संविधान दिनानिमित्त आयोजित भीम सकाळने जिंकले सर्व आर्वीकरांची मन

आर्वी येथे आयोजित दिनांक 26 नोव्हेंबर 2023 भारतीय संविधान दिनानिमित्त भीमसकाळ या कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद आर्वी समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक आर्वी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन संविधान युवा मित्रपरिवार आर्वी तर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पहाटे सहा वाजता पासून सुरू झाली या कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या बुद्ध वंदनेने धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाला विविध सोशल मीडिया इन्फ्लुंसर, रील्स स्टार व वक्ता उपस्थित होते
या कार्यक्रमाला वनश्री वनकर यांच्या बहारदार सुत्र संचालनाने रंगत आणली तर युवा गायक सचिन मनवरे व धम्मपाल इंगोले मी भीम गीत सादर केले तर भारतीय संविधानावर आधारित हिमांशू पाटील अमरावती व आशिष फुलझेले नागपूर या वक्त्यांनी विचार व्यक्त केले
तसेच मेहेक पानेकर व आदिश्री पेंढारकर या बालकलाकारांनी आपले नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली
तसेच मुस्कान बनसोड यांनी सुद्धा आपली नृत्यकला सादर केली या कार्यक्रमाला रिल स्टार
रवी वानखेडे अमिता पवार रूचा जंगले साक्षी चिंचखेडे खतरनाक सुमित कांबळे डॉली भाई तसेच बीट रॅपर राजा या कलाकारांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला आंजी येथील भीम कन्या ग्रुपने सुंदर नृत्य सादर केले.
संविधान दिनाला अनुसरून विलास थोरात यांनी एकपात्री नाटक आपल्या अभिनयातून साकार केले
याप्रसंगी झूंड चित्रपट फेम विपीन तातड व स्वप्नील गणवीर मंगेश इंगोले यांनी आपला रॅपटोली व्दारे कडक जयभीम हा रॅप साँग सादर करुन उपस्थिती सर्वांना नाचवून सोडले. तसेच नागपूर येथील जयभीम मित्र मंडळ द्वारे आयुप परीपगार यांच्या समुहातील मुला मुलींनी उस्फुर्त नृत्य सादर केले.
तसेच मुलींनी संविधान दिनाला पोस्टर रंगोली काढून आपल्या कलेतून विशाखा दवाळे सोनम काळपांडे
पल्लवी वैद्य मिना काळपांडे
बुलबुल पाटील, दिपाशा मून आदी संविधानाचा गौरव केला.
या कार्यक्रमाच्या आयोजनात तरुण मुलामुलींचा मोठया प्रमाणात सहभाग दिसून आला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संविधान युवा मित्र परिवार परिश्रम घेतले

चलो संविधान दिनानिमित्त भीम सकाळ आर्वी ला....
20/11/2023

चलो संविधान दिनानिमित्त भीम सकाळ आर्वी ला....

संविधान दिन सप्ताह निमित वंचित बहुजन युवा आघाडी वर्धा आयोजित शिक्षण हक्क परिषद 2023रविवार , दिनांक 19- नोव्हेंबर 2023 वे...
13/11/2023

संविधान दिन सप्ताह निमित वंचित बहुजन युवा आघाडी वर्धा आयोजित शिक्षण हक्क परिषद 2023

रविवार , दिनांक 19- नोव्हेंबर 2023
वेळ सायंकाळी ५ वाजता पासून
स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्याजवळ , सिव्हिल लाइन वर्धा

मुख्य मार्गदर्शक : युवा नेते सुजात दादा आंबेडकर

सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्तिथ राहावे ही विनंती.....

आपली सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे.....
01/11/2023

आपली सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे.....

आर्वी शहरात आदिवासी ( गोंडीयन ) रावण राजा मडावी दैवत यांचे दहन करण्याची परवागी रद्द करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी आर...
10/10/2023

आर्वी शहरात आदिवासी ( गोंडीयन ) रावण राजा मडावी दैवत यांचे दहन करण्याची परवागी रद्द करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी आर्वीच्या वतीने निवेदन देण्यात आले...

आज दिनांक - ०५/ १०/ २०२३/ रोजी मा. उपजिल्हाधिकारी साहेब ( दंडधिकारी साहेब ) आर्वी , जि. वर्धा व मा. आमदार दादाराव केचे साहेब यांना वंचित बहुजन युवा आघाडी आर्वी व सर्व गोंडीयन आदिवासी समाज बांधव यांच्या वतीने गोंड राजा रावण मडावी यांचे दहण करण्याची परवानगी रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले, आर्वी शहरामध्ये (गोंडीयन ) रावण राजा मडावी दैवत यांच्या दहन कार्यक्रमाकरिता काही लोकांनी तहसिल कार्यालयातून परवानगी मागीतली होती, गोंड राजा रावण हे आदिवासी समाज बांधवांचे दैवत असून ते आदिवासी समाजाचे १० धर्म गुरू मुठवा असुन ते आमच्या गोंडीयन संस्कृती चे दैवत आहे , सर्व समाज बांधव दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी एकत्र येऊन महात्मा गोंड राजा रावण मडावी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम साजरा केला जातो, करिता गोड राजा रावण दहण हा कार्यक्रम रद्द करण्याकरिता आज निवेदन देण्यात आले. ऑल इंडिया समता सैनिक दल आर्वी सुखदेव नंदागवळी मुख्य संघटन, गोर सेना वर्धा ज्ञानेश्वर राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नितीन भाऊ आष्टीकर विधानसभा आर्वी अध्यक्ष, यांनी पाठिंबा दिला. दर्पण पंजाबराव टोकसे उपजिल्हाध्यक्ष, निरंजन भाऊ पाटील विधानसभा समंवेक, ज्ञानदीप धूर्वे महासचिव,विनोदभाऊ पायले तालुका अध्यक्ष, प्रज्वल यावले तालुका महासचिव, आकाश सौदागर, राजुभाऊ कोवे,देवा भलावी, विलासभाऊ गेडाम, संजय कूसराम, संजय हाडके, गौतम पोहणे, सम्यक पाचोडे, दीक्षांत गवळी,प्रमोद भाऊ चौरपगार, अनिकेत बांबुडकर, अंकुश पखाले प्रवीण काळे,पंकज गडलिंग, बादल खंडारे, प्रतीक सूर्यवंशी, क्षितिष भगत, रोशन काळपांडे, राहुल आहाके, सचिन नेताम, योगेश राठोड, गोपाल आत्राम,सुनील वरखडे, सुगत ढोले, यश पवार, सचिन परतेकि,आकाश कौरती, उपस्थित होते

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panchashil News TV posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share