Wangdoos Production

  • Home
  • Wangdoos Production

Wangdoos Production This is an Entertainment page & Visit Our Youtube Channel Please Like, Share & Subscribe... Thank you

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कम...
18/10/2025

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात.

ते उंचीने ताकदीने मराठ्यांपेक्षा जास्त आहेत. तेव्हा महाराजांनी यावर अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आले की मराठ्यांची शारिरीक ठेवण लहान आणि त्यांच्या तलवारीची लांबी कमी यामुळे मराठा कितीही पराक्रमी असला तरी त्यांना मोगलांपुढे हार खावी लागत असे. महाराजांच्या दुरदर्शी बुद्धीला मराठ्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण दिसु लागले.

ते म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पद्धतीने शस्त्र नसणे.

मग त्यावर संशोधन चालू केले. यावर सर्व बाजुंनी म्हणजे शस्त्राचा धातु, लांबी, रूंदी, वजन, धार या सर्वांवर विचार करून नवीन शस्त्रे बनवायला घेतली.

पुर्वी ज्या तलवारी वापरत त्याला उघडी मुठ असायची. ती महाराजांनी मुठ बंद करून घेतली. एखादा तलवारीचा वार घसरून खाली हातावर आला तरी हात सुरक्षित राहतो यासाठी मुठीला आवरण लावलं. त्याच बरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करुन एक फुटापर्यंत आणखी लांब केली.

पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही याची काळजीही घेतली आणी शञुच्या मोठ्यातमोठ्या घावाने तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. त्यासाठी तलवारीला मधुन पन्हाळ ठेवला जाई. त्याचा प्रभाव इतका दिसुन आला की हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज मावळ्यांनी व्यक्त केली आणी अशा तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून संबोधले जाऊ लागले.

महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐन प्रसंगी हा गजही शञुच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकता येई. त्यामुळे तोल साधण्याबरोबर तलवारीच्या मारक क्षमतेचे आणखी एक वैशिष्ट्य आपोआप भरीला आले.

अनेक प्रकारे ही तलवार चालवुन हाताला घाम येईल किंवा मुठ सैल झाल्याने हातातुन गळु नये, पकड एकदम मजबुत रहावी म्हणुन मुठीला आतुन गादीचा अस्तर लावुन घेतला म्हणुनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालवु शकले.

मराठ्यांच्या या विकसित तलवारींना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे नावे पडली. जसे धोप, खांडा, फिंरग, कत्ती, समशेर इत्यादी. महाराजांच्या तलवारीही अशा खास वैशिष्ट्यांनी बनवलेल्या आहेत .

केरळच्या गोपीका गोविंदने रचला इतिहास  राज्यातील पहिली आदिवासी एअर होस्टेस बनली! ✈️🌾केरळच्या करिंबला आदिवासी समाजातील २४ ...
16/10/2025

केरळच्या गोपीका गोविंदने रचला इतिहास राज्यातील पहिली आदिवासी एअर होस्टेस बनली! ✈️🌾

केरळच्या करिंबला आदिवासी समाजातील २४ वर्षीय गोपीका गोविंद हिने इतिहास रचला आहे. ती केरळ राज्यातील पहिली आदिवासी एअर होस्टेस बनली असून, तिच्या या यशाने आदिवासी आणि दुर्बल घटकांतील अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

अलक्कोडजवळील कवुंकुडी या छोट्या वस्तीतील गरीब घरात जन्मलेल्या गोपीकाचे पालक पी. गोविंदन आणि व्ही. जी. हे दैनंदिन मजुरी करून घर चालवत होते. आर्थिक संकटात वाढूनही गोपीकाचे स्वप्न होते आकाशात झेप घेण्याचे.

तिने स्थिर भविष्याकरता केमिस्ट्रीमध्ये बी.एस्सी. पूर्ण केली, पण तिच्या मनात एव्हिएशन क्षेत्राविषयीची ओढ कायम राहिली. त्यानंतर तिने वायनाडमधील ड्रीम स्काय एव्हिएशन ट्रेनिंग अकादमी येथे प्रवेश घेऊन एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला.

दुसऱ्याच प्रयत्नात तिने यश मिळवले आणि खाडी देशाकडे जाणाऱ्या उड्डाणावर प्रथमच एअर होस्टेस म्हणून कार्यरत झाली. तिचा हा क्षण म्हणजे संघर्ष, आत्मविश्वास आणि चिकाटीचं मूर्त उदाहरण ठरला.

गोपीका सांगते “स्वप्नांना आकार देण्यासाठी धाडस आवश्यक असतं. परिस्थिती कठीण असली तरी आत्मविश्वास आणि मेहनत असेल, तर यश नक्कीच मिळतं.”

आज गोपीका केवळ स्वतःच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजाचा अभिमान बनली आहे. तिच्या या प्रवासाने दाखवून दिले की, निर्धार आणि प्रयत्न यांची जोड असेल तर कोणताही पार्श्वभूमी माणसाच्या उंच भरारीला अडवू शकत नाही.

#गोपीका_गोविंद #आदिवासी_यशकथा #प्रेरणा #साहसआणिविश्वास ✨

2002 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चँपियनशिपच्या स्पर्धेत अनिता अल्वारेझ या अमेरिकेच्या कलात्मक जलतरणपटुने पाण्या...
15/10/2025

2002 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चँपियनशिपच्या स्पर्धेत अनिता अल्वारेझ या अमेरिकेच्या कलात्मक जलतरणपटुने पाण्याखालचा एक अचुक, सुंदर, ग्रेसफुल परफॉर्मन्स दिला आणि एकदम शांतता पसरली. परफॉर्मन्स संपल्यावर ती नेहमीसारखी पाण्याबाहेर आली नाही. पाण्याखाली असतानाच अनिता बेशुद्ध झाली होती. काही सेकंद तिचं शरीर तरंगलं आणि नंतर हळूहळू बुडायला लागलं. हे सगळं तिला टाळ्यावाजवुन चिअरअप करणार्या प्रेक्षकांच्या आणि स्मित करणार्या जजेसच्या नजरेतून सुटलं.

ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीच्या लक्षात आली ती म्हणजे अनिताची कोच ऍंड्रिया फ्युएन्टेस. ती अनिताला चांगलं ओळखत होती त्यामुळे तिला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली आणि क्षणाचाही विलंब न करता तिने नेसत्या कपड्यानिशी आणि बूट घातलेल्या अवस्थेतच पाण्यात उडी घेतली. जलतरण तलावाच्या तळाशी पोहोचून तिने अनिताचे निःचेतन शरीर वर काढले आणि अनिताचे प्राण वाचवले.

ऍंड्रियाने हे तिचं कर्तव्य म्हणून नाही तर अनिताला पूर्ण ओळखत असल्याने एका अंतःप्रेरणेने तिच्या काळजीपोटी केलं. यामुळे एका प्रश्नाने मन झपाटून जातंय: आपल्या आयुष्यात असं आपल्याला पूर्ण ओळखणारं कोण आहे की सगळं आलबेल आहे असं वर वर दिसत असताना तुम्ही बुडत आहात हे ज्याच्या लक्षात येईल?

Aparna Lalingkar यांच्या वॉल वरून

अगं अगं आई...’चा ‘कोकण कोहिनूर’ पुन्हा मंचावर!😍🔥संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या निरागस हास्याने आणि भन्नाट टायमिंगने वेड ला...
14/10/2025

अगं अगं आई...’चा ‘कोकण कोहिनूर’ पुन्हा मंचावर!😍🔥
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या निरागस हास्याने आणि भन्नाट टायमिंगने वेड लावणारा ओंकार भोजने पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर परतला आहे. त्याचा हा पुनरागमन एपिसोड सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
‘अगं अगं आई...’मधील त्याचा साधाभोळा पण खळखळून हसवणारा अंदाज प्रेक्षकांना अजूनही आठवतो. आता पुन्हा हास्यजत्रेच्या रंगमंचावर त्याच्या एन्ट्रीने सर्वच कलाकार आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे.
चाहत्यांनी सोशल मीडियावर “कोकणचा राजा परतला!”, “हास्यजत्रेला पुन्हा चार चाँद लागले!” अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ओंकारच्या परतण्यामुळे महाराष्ट्राच्या कॉमेडी विश्वात पुन्हा एकदा धमाल होणार, यात शंका नाही!

काश्मीरच्या बर्फाच्छादित शिखरांपासून कन्याकुमारीच्या सूर्यकिरणांनी न्हालेल्या किनाऱ्यांपर्यंत — राजस्थानच्या अजमेर येथील...
14/10/2025

काश्मीरच्या बर्फाच्छादित शिखरांपासून कन्याकुमारीच्या सूर्यकिरणांनी न्हालेल्या किनाऱ्यांपर्यंत — राजस्थानच्या अजमेर येथील अल्ट्रा रनर सुफ़िया खान हिने अशक्य वाटणारा पराक्रम साध्य करत इतिहासात आपले नाव कोरले आहे. 🇮🇳❤️

तिने तब्बल ४,०३५ किमीचे अंतर फक्त ८७ दिवसांत पार केले! म्हणजेच, तिने केवळ भारत पार केला नाही — तर कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात स्थान मिळवले. 🌈

प्रत्येक पावलामागे होती झुंज — थकवा, हवामानातील तीव्र बदल, आणि असंख्य आव्हाने. तरीही तिचा आत्मविश्वास कधीच ढळला नाही. 🌟
तिने दाखवून दिलं की मर्यादा फक्त मनात असतात, आणि त्या मोडायच्या असतील तर इच्छाशक्ती पुरेशी आहे. 💪✨

सुफ़ियाचा हा विक्रम फक्त वेग किंवा सहनशक्तीबद्दल नाही — तो धैर्य, चिकाटी आणि स्वप्नांना साकार करण्याच्या ताकदीबद्दल आहे. 🏅

ती भारताची अशी कन्या आहे जिने दाखवून दिलं की जर आवड आणि प्रयत्न एकत्र आले, तर कोणतीही वाट लांब नसते आणि कोणतंही स्वप्न अशक्य नाही. ❤️


त्यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा सगळं काही हरवल्यासारखं वाटत होतं. पण मनात होती एक आग – स्वतःच्या मर्यादा ओ...
14/10/2025

त्यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा सगळं काही हरवल्यासारखं वाटत होतं. पण मनात होती एक आग – स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची आणि जगाला दाखवण्याची. ही गोष्ट आहे पॅरालिम्पिक पदक विजेत्या सिमरन शर्मा आणि तिच्या नवऱ्या गजेन्द्र सिंह यांच्या संघर्षमय प्रवासाची, ज्या प्रेम आणि त्यागाने सगळ्यांचं मन जिंकलं.

सिमरन जन्मतः दृष्टिदोष असलेली होती. पण तिने आयुष्याच्या प्रत्येक अडथळ्याला आव्हान दिलं. धावण्याची आवड तिच्या डोळ्यांत नव्हती, पण मनात मात्र तीव्र होती. गजेन्द्र, जो तिचा नवरा आणि प्रशिक्षक दोन्ही आहे, त्याने तिचं स्वप्न स्वतःचं मानलं. त्याने केवळ तिच्या सोबत धाव घेतली नाही, तर तिच्या यशासाठी स्वतःचं सगळं काही पणाला लावलं.

सिमरनला प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी लागणारा खर्च भागवणं सोपं नव्हतं. सरकारी मदत आणि स्पॉन्सर मिळत नव्हते. पण गजेन्द्रनं हार मानली नाही. त्याने आपल्या नावावरची शेती विकली — फक्त एवढ्यासाठी की सिमरनचं स्वप्न पूर्ण व्हावं. “तिने धावावं, ती जिंकावी, तिचं नाव भारतासाठी उजळावं,” एवढंच त्याचं स्वप्न होतं.

त्यांच्या आयुष्यात कठीण दिवस आले. घर चालवणं, प्रशिक्षण देणं, प्रवास खर्च — सगळं काही अवघड झालं. पण सिमरन आणि गजेन्द्र दोघांनीही कधीही तक्रार केली नाही. उलट, त्यांनी एकमेकांवरचा विश्वास अजून मजबूत केला. आणि अखेर त्या विश्वासाचं सोनं झालं — सिमरन शर्मानं भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकून दाखवलं.

त्या एका पदकानं केवळ देशाचं नाव उजळलं नाही, तर हजारो महिलांना आणि अपंगत्व असलेल्या लोकांना नवी दिशा दिली. सिमरन म्हणते, “मी धावते माझ्या पतीच्या विश्वासावर. तो माझे डोळे आहे, मी त्याचं स्वप्न आहे.” ही वाक्यं ऐकताना प्रत्येकाला जाणवतं — यश म्हणजे फक्त मेहनत नाही, तर त्याग, प्रेम आणि न संपणारा विश्वास आहे.

आज सिमरन आणि गजेन्द्र देशभर प्रेरणादायी जोडी म्हणून ओळखले जातात. त्यांनी दाखवून दिलं की, परिस्थिती कितीही कठीण असो, जर नात्यात प्रेम आणि ध्येयावर विश्वास असेल, तर अशक्य असं काहीच नाही.

“पत्र्याच्या घरातून थेट 2BHK फ्लॅटपर्यंत... अरुण कदम यांच्या संघर्षाची गोष्ट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!” 🏠💫एकेकाळी महानगर...
14/10/2025

“पत्र्याच्या घरातून थेट 2BHK फ्लॅटपर्यंत... अरुण कदम यांच्या संघर्षाची गोष्ट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!” 🏠💫

एकेकाळी महानगरपालिकेत कर्मचारी, आणि आज मराठी चित्रपटसृष्टीतील ओळखले जाणारे नाव — दादूस अरुण कदम! पण त्यांच्या आयुष्याचा प्रवास सोपा नव्हता.

पत्र्याच्या घरातून सुरू झालेला प्रवास आज ठाण्यातील 2BHK फ्लॅटपर्यंत पोहोचला आहे — आणि या प्रत्येक पावलामागे त्यांच्या पत्नी वैशाली कदम यांचा हात आहे. 💖
दोघांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने झालं, पण त्यांची कहाणी थोडी वेगळीच. जेंव्हा अरुण कदम मुलगी बघायला गेले, तेंव्हा त्यांनी तिला लगेच होकार न देता म्हणाले — “आपण एकमेकांना जाणून घेऊ या.”
लग्नाच्या आधी त्यांनी वैशालीला प्रामाणिकपणे विचारलं, “तुझं कोणावर प्रेम आहे का?” आणि स्वतःच्या भूतकाळाबद्दलही तिला सांगितलं. कारण त्यांचं मत साधं आणि स्पष्ट होतं — “लग्न हे विश्वासावर उभं राहतं.” ❤️

आज त्यांच्या लग्नाला तब्बल २९ वर्षं झाली आहेत. त्यांची मुलगी सुकन्या आज एका मुलाची आई आहे — आणि त्यामुळे अरुण कदम खऱ्या अर्थानं ‘दादूस’ झाले आहेत! 👴🏻👶

संघर्ष, प्रामाणिकपणा आणि प्रेम — या तीन गोष्टींनी उभारलेला अरुण कदम यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

आसामची “फॉरेस्ट क्वीन” – मुनमुनि पायेंग 🌿1 मिलियन झाडे – हरित भविष्यासाठी तिचं मिशन! 🌱भारताच्या “फॉरेस्ट मॅन” म्हणून ओळख...
13/10/2025

आसामची “फॉरेस्ट क्वीन” – मुनमुनि पायेंग 🌿
1 मिलियन झाडे – हरित भविष्यासाठी तिचं मिशन! 🌱

भारताच्या “फॉरेस्ट मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जादव पायेंग यांच्या कन्या मुनमुनि पायेंग आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत आहे — एक धाडसी संकल्प घेऊन:
👉 मजुली बेटावरील पूरग्रस्त गावांमध्ये 10 लाख स्थानिक झाडांची लागवड.

तिचं स्वप्न फक्त झाडं लावण्याचं नाही, तर —
🌿 ओसाड झालेल्या भूमींचं पुनरुज्जीवन,
🌿 जैवविविधतेचं संरक्षण,
🌿 आणि हवामान बदलाच्या संकटाविरुद्ध मजुली बेटाला अधिक सक्षम बनवणं आहे.

प्रत्येक झाडासोबत ती आशेचा धागा विणते, निसर्गाला उपचार देते, आणि समाजाला हरित उद्यासाठी एकत्र येण्याची प्रेरणा देते. 🌏

मुळांपासून ते स्थैर्यापर्यंत, मुनमुनि पायेंग ही आसामची खरी “इको वॉरिअर” आहे. 💚

---



जगभरातील माहितीसाठी Follow करा!

प्रयागराजचे शैलेंद्र कुमार सिंह गौर हे नाव आज नवसंशोधनाच्या दुनियेत झळकू लागलं आहे. अवघ्या एका लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 1...
12/10/2025

प्रयागराजचे शैलेंद्र कुमार सिंह गौर हे नाव आज नवसंशोधनाच्या दुनियेत झळकू लागलं आहे. अवघ्या एका लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 176 किलोमीटर चालणारं अनोखं इंजिन त्यांनी तयार केलं आहे. अलाहाबाद विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर शैलेंद्र यांनी तब्बल 18 वर्षं या संशोधनासाठी घालवली.

2017 मध्ये त्यांनी 100 सीसी टीव्हीएस बाईकवर सहा-स्ट्रोक इंजिनचा प्रयोग सुरू केला. त्यातून मिळालेला मायलेज इतका विलक्षण होता की त्यांनी स्वतःच आश्चर्य व्यक्त केलं. आज जगात दोन किंवा चार-स्ट्रोक इंजिन सर्वसामान्य आहेत, पण शैलेंद्र यांनी बनवलेलं हे सहा-स्ट्रोक इंजिन दुप्पट कार्यक्षम आहे.

सामान्य इंजिन केवळ 30% इंधन ऊर्जा वापरतात, पण शैलेंद्र यांच्या इंजिनमध्ये ती कार्यक्षमता 70% पर्यंत वाढते. त्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होते आणि प्रदूषणही लक्षणीय कमी होते. या इंजिनमधून कार्बन मोनॉक्साइड जवळपास शून्य प्रमाणात बाहेर पडतो आणि सायलेंसरचे तापमानदेखील कमी राहते.

सर्वात खास गोष्ट म्हणजे हे इंजिन फक्त पेट्रोलवर नाही, तर डिझेल, सीएनजी आणि इथेनॉलवरही चालू शकतं. त्यामुळे भविष्यात हे इंजिन बहुपयोगी ठरण्याची शक्यता अधिक आहे. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये एका लिटर पेट्रोलमध्ये 120 किमीपर्यंत प्रवास साध्य झाल्याचंही सिद्ध झालं आहे.

या संशोधनासाठी शैलेंद्र यांनी स्वतःची सर्व संपत्ती ओतली — अगदी घरदेखील विकून त्यांनी वर्कशॉप उभारलं. सध्या त्यांच्याकडे दोन पेटंट आहेत आणि आणखी काही प्रक्रियेत आहेत. मात्र हा शोध मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यासाठी त्यांना ऑटोमोबाईल कंपन्यांच्या सहकार्याची गरज आहे.

शैलेंद्र यांची कहाणी दाखवते की मर्यादित संसाधनांतही अमर्याद इच्छाशक्तीने अशक्य शक्य करता येतं. त्यांच्या या क्रांतिकारी इंजिनमुळे केवळ इंधन बचतीचा नवा मार्ग खुला झाला नाही, तर भारत प्रदूषणमुक्त भविष्यात पाऊल टाकण्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहे.

🚀🇮🇳

बिहारमधील गया जिल्ह्यातील 'लौंगी भुईयां'ने एकट्याने ३ किलोमीटर लांबीचा कालवा खोदला जेणेकरून डोंगरावरून पडणारे पाणी त्याच...
27/08/2025

बिहारमधील गया जिल्ह्यातील 'लौंगी भुईयां'ने एकट्याने ३ किलोमीटर लांबीचा कालवा खोदला जेणेकरून डोंगरावरून पडणारे पाणी त्याच्या गावात साठवता यावे म्हणून, त्याला ३ किमी लांबीचा कालवा बांधण्यासाठी ३० वर्षे लागली.

08/07/2025

Bhimashankar Trek....
🔱हर हर महादेव🔱

Address


410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wangdoos Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wangdoos Production:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share