एमडी24न्यूज़

एमडी24न्यूज़ जय भारत जय संविधान जय बहुजन महापुरुष

01/01/2025

बोगस लेआउट प्रकरण;मनपाचा आवेक्षक गायब

सोलापूर : दि.२५ (एमडी 24 न्यूज) शहरातील बोगस लेआउट प्रकरणात महापालिकेच्या नगररचना कार्यालयातील आवेक्षक राजकुमार मेश्राम यांचा शोध घेण्यात येत आहे. मेश्राम जुळे सोलापुरातील एका सोसायटीत राहायला होते; पण त्यांच्या घराला कुलूप आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत या सोसायटीमधील अनेक सदस्यांशी चर्चा करून मेश्राम यांचा माग काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

सोरेगाव आणि दहिटणे येथे बोगस लेआउटची प्रकरणे उघडकीस आली आहेत. शहरात अशी अनेक प्रकरणे असल्याचे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बांधकाम व्यवसायात गैरप्रकार करणाऱ्या लोकांनी मनपाचे आवेक्षक राजकुमार मेश्राम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसे जबाब त्यांनी पोलिसांना दिले आहेत. यावर मेश्राम यांच्याकडून खुलासा आलेला नाही. मेश्राम बऱ्याच दिवसांपासून गायब आहेत. मेश्राम जुळे सोलापुरात ‘आयएमएस’ स्कूल परिसरातील एका सोसायटीमध्ये राहतात; पण घराला कुलूप आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांशी चर्चा केली. मेश्राम कुठे असतील, अलीकडच्या दिवसांत कोणाशी बोलणे झाले होते का, याबद्दलची माहिती जाणून घेतल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.


*सलगरवस्ती येथील प्रकरणाकडे लक्ष*

सलगरवस्ती येथील बोगस लेआउट प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बोगस नकाशाच्या आधारे खरेदी-विक्री करण्यात आली आहे. हे नकाशे कोणाकडून प्राप्त झाले याचा शोध घेतला जात असल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांना आवश्यक असलेली कागदपत्रेही नगररचना कार्यालयाकडून तत्काळ उपलब्ध करून दिली आहेत. या प्रकरणात केव्हा गुन्हा दाखल होईल,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

15/12/2023

७४ वर्षापूर्वीच्या रेडिओची चोरट्याला कळली किंमत

दुर्मिळ रेडिओचा तपास शहर पोलिसांपुढील जणू आव्हानच

सोलापूर : दि‌.०६ (एमडी 24 न्यूज) सोलापुरातील सदर बझार परिसरातील एका घरातून अज्ञात चोरट्याने एक रेडिओ चोरून नेला. आज रेडिओ-टेपरेकॉर्डरचा जमाना कालबाह्य झालेला असला तरी त्या रेडिओची खरेदी १९४७ सालातील होती. चोरट्याला ७४ वर्षापूर्वीच्या रेडिओची कळली किंमत असून ह्या दुर्मिळ रेडिओचा तपास सदर बझार पोलिसांसमोरील जणू एक आव्हानच असल्याचे दिसून येत आहे.

सात रस्ता, सदर बझार भागातील बँक ऑफ इंडियाजवळ फारूक लाडलेमशाक शेख यांचे घर आहे. ते गुरूवारी, दि. ०४ फेब्रुवारी रोजी पहाटे आपल्या घराला कुलुप लावून, नेहमीप्रमाणे खिडकीत आडोशाला चावी ठेवून मॉर्निंग वॉकला गेले होते. चोरट्याने त्या संधीचा गैरफायदा घेऊन, त्या चावीने घराचे कुलूप उघडून बेडरूममधील टेबलावर ठेवलेला रेडिओ चोरून नेला.

चोरट्याने घरातील रेडिओ चोरून नेताना, कोणाला चोरीचा संशय येऊ नये म्हणून घराला पूर्ववत कुलूप लावून गेल्याचे फारूक शेख यांनी एमडी 24 न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.
(बाईट : फारूक शेख )

या रेडिओ चोरीप्रकरणी फारुक लाडलेमशाक शेख यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यात चोरीस गेल्या रेडिओची किंमत अवघी ३५० रुपये असली तरी, ती स्वातंत्र्यपूर्व काळातील, १९४७ ची खरेदी आहे. त्यामुळे त्याची आजची तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर ती रक्कम फार मोठी आहे.

फारूक शेख यांचे वडील लाडलेमशाक शेख यांनी
हा कॉस्सोर (COSSOR) कंपनीचा रेडिओ, नव्या पेठेतील वॉटसन रेडिओज या दुकानातून ०६ फेब्रुवारी १९४७ रोजी ३५० रुपयांना खरेदी केला होता. ज्या काळी रेडिओ ऐकण्यासाठी परवाना घ्यावा लागत होता. त्यामुळे ह्या कॉस्सोर कंपनीच्या रेडिओकडे एक दुर्मिळ रेडिओ म्हणून पाहिले जात आहे.
( रेडिओ खरेदी पावती अन् रेडिओ वापर परवाना फोटो )

या चोरी प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुरुवारी दुुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार नदाफ या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. ह्या दुर्मिळ रेडिओचा तपास सदर बझार पोलिसांकडील जणू एक आव्हानच आहे.

01/01/2023

नगरसेवक पदाचा गैरवापर करून केलेली कामे उघड केल्यानेच माझ्या बदनामीचा कट : सैफन शेख

सोलापूर : दि.०१ (एमडी२४न्यूज) पदाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकाम केल्याचे प्रकरण उघडकीस आणल्याचा राग मनात धरून नगरसेविका फिरदोस पटेल या आपल्यावर खोटेनाटे आरोप करून आपली बदनामी करीत असून त्यांचा बोलविता धनी वेगळाच असून त्याचा शोध घेण्याची खरी गरज आहे.

नगरसेविका फिरदोस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मौलाली चौक परिसरात अनाधिकृत कार्यालय थाटले आहे. त्यांचे हे प्रकरण आपण महापालिकेत बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून माहिती अधिकाराखाली उघड केलेआहे. तेव्हापासून सातत्याने त्या आपल्याला टार्गेट करून कशात तरी गुंतविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता तर चक्क त्यांनी महिला असल्याचा आधार घेत माझ्यापासून त्यांना धोका असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिले आहे. परंतु एका प्रामाणिक पत्रकाराच्या लेखणीची त्यांना एवढी भीती का वाटावी, की त्यांनी आपल्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करावी, हा आपला सवाल आहे. उलटा चोर कोतवाल को दाटे असाच हा काहीसा प्रकार असून या प्रकरणाचा समाज माध्यमांनी सुद्धा व्यापक भूमिकेतून विचार करण्याची आज गरज आहे. लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केल्याने कदाचित त्यांच्या मनामध्ये नगरसेवक पद जाण्याची भीती निर्माण झाली असावी. त्यातूनच त्यांनी आपल्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचल्याचे आपल्याला वाटत आहे.

✍ एमडी२४न्यूज मुख्य....✍

डाॅ.मोक्षगुंडम विश्वैश्वरया यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. अभियंता दिनाच्या शुभेच्छा द्वारा द...
15/09/2022

डाॅ.मोक्षगुंडम विश्वैश्वरया यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.

अभियंता दिनाच्या शुभेच्छा द्वारा देत इंजिनिअर्स चा दिवस करा स्पेशल!

15 सप्टेंबर महिन्यात सेलिब्रेशनसाठी खूप दिवस आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 15 सप्टेंबर! भारतात 15 सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणार्‍या इंजिनिअर्सच्या सन्मानार्थ कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतात या क्षेत्राची पायाभरणी करणारे अभियंता आणि वैज्ञानिक डाॅ.मोक्षगुंडम विश्वैश्वरया यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधत 15 सप्टेंबर हा अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. मग तुमच्या इंजिनिअर मित्र मंडळींना,नातेवाईकांना, भावंडांना इंजिनियर्स डे च्या शुभेच्छा देतो आणि द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.

डाॅ.मोक्षगुंडम विश्वैश्वरया यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. डाॅ. विश्वैश्वरया यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या गौरवासाठी भारत सरकारने 15 सप्टेंबर या तारखेस अभियंता दिन साजरा करण्याचे ठरवले. भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले होते.

 #पारशी_समाजाचे सोलापूर टेक्सटाईल मध्ये मुख्य योगदान पारशी पुजारी विष्टाष्प मुंशी यांची एमडी 24 न्यूजशी बोलताना म्हणाले....
16/08/2022

#पारशी_समाजाचे सोलापूर टेक्सटाईल मध्ये मुख्य योगदान पारशी पुजारी विष्टाष्प मुंशी यांची एमडी 24 न्यूजशी बोलताना म्हणाले...

https://youtu.be/t9rGJcdVgOI

Adresse

Democratic Republic Of The

Téléphone

+919483222111

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque एमडी24न्यूज़ publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Contacter L'entreprise

Envoyer un message à एमडी24न्यूज़:

Partager