03/07/2025
शेतकरी बापाची आत्महत्या...
हा फक्त एका माणसाचा मृत्यू नाही,
तर त्या न संपणाऱ्या कर्जाचं,
तुटलेल्या अपेक्षांचं, आणि
वाऱ्यावर उधळलेल्या स्वप्नांचं शोकगीत आहे.
त्या मातीशी बांधलेल्या हातांनी
शेवटी गळफास घेतला…
ज्यांना भरभरून पिकं द्यायची होती,
त्याच मातीने आता त्याला झाकून टाकलं.
घरातलं चूल धुरकट,
आईच्या डोळ्यात पाणी,
आणि मुलांच्या डोळ्यात उपासमारीचं सावट.
हे फक्त त्याच्या घरचं दु:ख नाही,
तर आपल्या व्यवस्थेचं पाप आहे.
शेतकरी बाप गेला…
आपल्यासाठी अन्न उगवणारा देव निघून गेला!