22/03/2025
*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली दलित चळवळ*
जन्म -;14 एप्रिल 1891 महू या गावी
1907 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण
प्राचीन भारतातील व्यापार या विषयात एम ए केले
भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाकडून पीएचडी पदवी मिळवली
प्रॉब्लेम ऑफ रुपी या विषयावर लंडन विद्यापीठाने बीएससी ही पदवी दिली
1923 मध्ये बॅरिस्टर ही परीक्षा उत्तीर्ण झाले
*2) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी केलेली कार्य*
मार्च 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्य परिषदेत शाहू महाराजांनी दलित चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले
1920 मध्ये मूकनायक साप्ताहिक सुरू केले
20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली, अध्यक्ष आंबेडकर व सचिव सिताराम शिवतकर होते या सभेची ब्रीदवाक्य होते *शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा*
19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे बहिष्कृत सभेचे अधिवेशन करून चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याची ठरले त्यानुसार 25 मार्च रोजी 14 तळ्यावर सत्याग्रह करण्यात आला
25 व 26 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद भरवण्यात आली त्यावेळी मनस्मृती या ग्रंथाची दहन करण्यात आले
तीन मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश सत्याग्रह 1934 पर्यंत हा सत्याग्रह सुरू राहिला यामध्ये स्त्रियांचाही सहभाग होता 1934 मध्ये आंबेडकरांच्या अध्यादेशानेच सत्याग्रह मागे घेण्यात आला
*डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य*
1928 मध्ये दलितांच्या शिक्षणासाठी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी स्थापन केले
1945 मध्ये मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्याचबरोबर मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज स्थापन केले
1950 ला औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज ची स्थापना केली
1945 साली 20 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिका व इंग्लंडला पाठवले
*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय चळवळ*
1919 मध्ये दलितांना राजकीय हक्क देण्यासाठी नेमलेल्या साऊथबरो यांच्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटीमध्ये इंग्लंड सरकारने आंबेडकर व वीरा शिंदे यांची निवड केली बाबासाहेबांनी मतदानाचा हक्क उमेदवारीचा हक्क अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ इत्यादी मागण्या केल्या
1927 च्या सायमन कमिशन कडे आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्का- संबंधी व मुंबई प्रांतातील राजकीय हक्काविषयी दोन मसुदे खलीते कमिशन कडे पाठवले सायमन कमिशन ने अस्पृश्यांना राजकीय हक्क द्यावेत अशी शिफारस केली मात्र त्यातील काही तरतुदींना विरोध केला
19 मार्च 1928 रोजी मुंबई कायदेमंडळात महार वतन बिल मांडले महार वतने खालसा करून त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे काम व वेतन ठरवण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी करण्यात आली
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनही गोलमेज परिषदांना हजर राहून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा आग्रह धरला, जातीय निवाडयात स्वतंत्र मतदारसंघ मिळाले मात्र गांधीजींच्या उपोषणामुळे त्यांनी माघार घेत पुणेकरार केला स्वतंत्र मतदार संघा ऐवजी राखीव जागा 148 पैकी 18% देण्याची ठरले
15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून 1937 च्या निवडणुका लढवल्या त्यामध्ये त्यांनी13 जागा जिंकल्या
13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे जाहीर सभेत मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली
18 जुलै 1942 रोजी शेड्युल कास्ट फॅन्ड्रेशन या नव्या पक्षाची स्थापना केली
त्यानंतर त्यांना रिपब्लिकन पार्टीची स्थापना करावयाची होती मात्र त्यांची त्यापूर्वीच निधन झाले त्यांचे स्वप्न त्यांच्या एन शिवराज ,दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रुपवते या सहकाऱ्यांनी 1957 मध्ये हा पक्ष स्थापन करून पूर्ण केली
*राज्यघटना निर्मिती*
मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यामुळेच ते भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो बौद्ध बांधवांना सोबत घेऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यात आली
6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले
______________________
*वार्तांकन*
*भगवान एस जाधव (पत्रकार)*
सौजन्य_आधुनिक भारताचा इतिहास