Nagar Ghanta

Nagar Ghanta नमस्कार मित्रांनो,
खास बातम्या - व्हिडिओ साठी फॉलो करा.

21/02/2026

अहिल्यानगर ब्रेकिंग :
माजी महापौर यांचेवर
महिलेकडून गुन्हा दाखल,
अत्याचार केल्याचे आरोप

29/01/2026

खुमासदार अजित पवार....

28/01/2026


27/01/2026

श्रीरामपूरला अल्प्राझोलम पकडलं, मग शिरूरला जाऊन मेफेड्रोन (एमडी) कसे झाले?

शिरूरमध्ये विक्री करताना पकडण्यात आलेले मेफेड्रोन (एमडी) अहिल्यानगर जिल्ह्यातून एका पोलिसाच्या टोळीने पुरविल्याचे तपासात आढळून आले आहे. श्यामसुंदर गुजर या स्थानिक गुन्हे शाखेत मुद्देमाल कक्षाची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच तेथील ड्रग्ज बाहेर विकल्याचे आढळून आले आहे. तब्बल दहा किलो ड्रग्ज या गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अहिल्यानगरला एमडी ड़्रग्ज केव्हा आणि कोठे पकडण्यात आले होते, असा प्रश्न पडतो. याचे उत्तर यात अटक करण्यात आलेल्या पोलिसाकडूनच मिळाले आहे. मे २०२५ मध्ये पोलिसांनी श्रीरापूरमध्ये मोठी कारवाई केली होती. तेथे १३ कोटी ७७ लाख रुपयांचा ७० किलोचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. सुमारे २० गोण्यांमध्ये हा माल होता. मात्र. या उत्तरातून आणखी एक प्रश्न निर्माण होत आहे. कारण त्यावेळी श्रीरामपूर येथे जो अंमलीपदार्थ पकडण्यात आला होता, त्याचे नाव अल्प्राझोलम असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. तर शिरूर आणि नगरमध्ये आता पकडण्यात आलेला माल मेफेड्रोन (एमडी) असल्याचे सांगण्यात येत आहे. रासायनशास्त्रानुसार हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. असे असेल तर श्रीरापूरमध्ये जप्त केलेले अल्प्राझोलम आणि शिरूर-नगरमध्ये पकडलेले मेफेड्रोन (एमडी) यांचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्न आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला नगरला असताना मे २०२५ मध्ये श्रीरामपूरमध्ये ही कारवाई झाली होती. श्रीरामपूर एमआयडीसीमधून एका वाहनातून अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेला अल्प्राझोलम नामक पदार्थाच्या २१ गोण्या जप्त केल्या होत्या. या कारवाईत ७० किलो वजनाच्या तब्बल १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीच्या ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल नगरच्य़ा मुख्य़ालयात असलेल्या मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता. त्याचा ताबा पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याच्याकडे होता. त्याने साथिदारांच्या मदतीने त्यातून चोरी करून सुमारे १० किलो माल बाहेर काढला आणि त्याच्या जागी तेवढाच मैदा भरून ठेवला, असे सांगण्यात येते. हाच मुद्देमाल शिरूरच्या गुन्ह्यात आता मेफेड्रोन (एमडी) म्हणून सांगितला जात आहे.
वास्तविक या दोघांत फरक आहे.

अल्प्राझोलम (Xanax): हे प्रिस्क्रिप्शन औषध आहे, जे सामान्यीकृत चिंता विकार (GAD) आणि पॅनीक डिसऑर्डरसाठी वापरले जाते [६]. हे कायदेशीर आहे, परंतु त्याचा गैरवापर झाल्यास व्यसन लागू शकते.

एमडी (MDMA/Ecstasy/Molly): हे एक बेकायदेशीर अमली पदार्थ (Drugs) आहे. याला अनेकदा पार्टी ड्रग्स म्हणून ओळखले जाते आणि हे उत्तेजक (stimulant) आणि मतिभ्रम (hallucinogen) निर्माण करणारे आहे.

अंमलीपदार्थ कायदा खूप किचकट आहे. तपासात तांत्रिक त्रुटी राहिल्या तर त्याचा फायदा आरोपींना होऊ शकतो. याची पोलिसांनाही माहिती आहे. त्यामुळे मुद्देमालाची योग्य त्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली जात असते. श्रीरामपूरमध्ये जप्त केलेल्या या मालाचे नाव त्यावेळी वेगळे सांगितले होते. हाच माल शिरूरच्या गुन्ह्यात मिळून आल्याचे सांगताना त्याचे नाव दुसरेच सांगितले जात आहे. हा नेमका घोळ मिटवावा लागेल.

या गुन्ह्यात सध्या राजकीय आरोपप्रात्यारोप सुरू आहेत. आरोप केल्याप्रमाणे अद्याप यात राजकीय व्यक्तींचा सहभाग आढळला नसल्याचे पोलिस सांगत आहेत. मात्र, तांत्रिक त्रुटी राहून आरोपींना फायदा होणार नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. गुन्ह्याचे राजकारण करून एकमेकांना अडकविण्याच्या प्रयत्नात आरोपी सुटता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी लागेल.

साभार - विजयसिंह होळं यांच्या भिंतीवरून

ड्रग्स रॅकेटचा धक्कादायक खुलासा: पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात!पुण्यात 2 कोटींच्या एमडी ड्रग्ससह गॅरेज चालकाला अटक केल्यानंत...
22/01/2026

ड्रग्स रॅकेटचा धक्कादायक खुलासा: पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात!

पुण्यात 2 कोटींच्या एमडी ड्रग्ससह गॅरेज चालकाला अटक केल्यानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आरोपीचे अहिल्यानगर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याशी संबंध उघड झाले असून त्या कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.


अहिल्यानगर मधे २५ वर्षाच्या आतील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. मागील काही महिन्यात असे प्रामुख्याने दिसून येत...
19/04/2025

अहिल्यानगर मधे २५ वर्षाच्या आतील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. मागील काही महिन्यात असे प्रामुख्याने दिसून येते. काही अल्पवयीनही आरोपी निष्पन्न होत आहेत. ही नगरकरांसाठी मोती काळजीची बाब आहे.

12/04/2025

#अहिल्यानगरपोलीस #धडाकेबाज
रामनवमी: बरीचशी अति तज्ञ मंडळी वेगवेगळे अंदाज बांधत होती व अनेक ठिकाणी तसे बोलत होती की, कोल्हापूर - नागपूर नंतर अहिल्यानगरचा नंबर आहे. आता इथे दंगे होतील, रामनवमी शांततेत होईल याबद्दलही शंका व्यक्त करत होती याशिवाय तसे 'इनपुट' येत असल्याचे सांगत होती; अर्थात त्यात किती तथ्य होते हे देव जाणे.
अहिल्यानगर पोलीस यांच्या चोख बंदोबस्तात सर्व व्यवस्थित , कोणत्याही व्यत्यया शिवाय आनंदाने पार पडले. सर्व लोकांनी उत्साहानेसहभाग घेतला . काही प्रमाणात मुस्लिम बांधवांनीही मिरवणूक पाहण्यास हजेरी लावली. अहिल्यानगरच्या नागरिकांनी आपले समतेचे , सर्वधर्मसंमभावाचे विचार वागण्यातून सिद्ध करून दाखवले.


( Patherdi, Devichand Rambhau Kambale, Ice-Cream Business, Motivational)

अहिल्यानगर : दि.२२/१०/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री.प्रताप दराडे सो यांना गुप्त बातमीदारामार्फत म...
23/10/2024

अहिल्यानगर : दि.२२/१०/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री.प्रताप दराडे सो यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम हा अग्निशस्त्र (गावठी कटटा) खरेदी करुन विक्री करण्याकरीता घेवुन जाणार आहे. सदर माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला त्या ठिकाणी जावुन स्वत:ची सुरक्षितता बाळगुन खात्री करुन काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा, असा आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे स्टेशन ते शक्कर चौक जाणारे रोडवरील लोखंडी पुलावर सापळा लावला असता तेथे एक इसम संशयीतरीत्या पाठीवर काळया रंगाची बॅग लावुन चालत जात असताना मिळुन आला. त्यास पंचासमक्ष जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत त्याचे पाठीला असलेल्या काळया रंगाच्या बॅगेत गावठी बनावटीचे दोन लोखंडी अग्निशस्त्र व ४ जिवंत काडतुसे असा एकुण ८०,८००/- रु किंमतीचा मुददेमाल आरोपी नामे विशाल नामदेव चंद्रे वय २१ वर्षे रा. शनि शिंगणापुर मंदिरामागे, शिंगणापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर याच्याकडे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे सदर गावठी कट्यांबाबत विचारपुस केली असता त्याने अहिल्यानगर शहरातील बंटी ऊर्फ भावेश अशोक राऊत यांचेकडून खरेदी केले असून ते विक्री करीता घेवुन जात असले बाबत सांगितले असुन त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेत आणुन त्याचे विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोकाँ /२५४५ सतीष मारुती शिंदे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि नं /२०२४ शस्त्र अधिनियम १९४९ चे कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हा मसपोनि योगिता कोकाटे या करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सोो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सोो, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ प्रताप दराडे, व गुन्हे शोध पथकाचे मसपोनि / योगिता कोकाटे,पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सुर्यकांत डाके, पोकों/ अभय कदम, अमोल गाढे, अतुल काजळे,सतिष शिंदे, राम हंडाळ, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.

#विधानसभा #अफवा #लोकमत #पुढारी #सकाळ

अहमदनगर : संगमनेरमध्ये पती-पत्नीने गळफास घेऊन एकत्रच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. आठवड्याभरापूर्वी त्यांच्या ...
05/09/2024

अहमदनगर : संगमनेरमध्ये पती-पत्नीने गळफास घेऊन एकत्रच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. आठवड्याभरापूर्वी त्यांच्या 21 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केलीय. तर दोन वर्षांपूर्वी 16 वर्षांच्या मुलानेही असंच आयुष्य संपवलं. एक कुटुंब अवघ्या दोन वर्षात गळफास घेऊनच संपल्याने खळबळ उडाली आहे. संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकाजवळील असणाऱ्या वाडेकर गल्लीत ही घटना घडलीय. गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या 16 वर्षीय मुलाने घरात तर आठ दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या 21 वर्षीय मुलाने देखील गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर यांनी देखील आयुष्य संपवलं. घटनास्थळी पोलिसांना दोन चिठ्ठ्यासुद्धा आढळून आल्या आहेत.
गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांचा 21 वर्षीय मुलगा श्रीराज गणेश वाडेकर पुण्यामध्ये शिकत होता तेथे गळफास घेत त्याने आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वी वाडेकर दाम्पत्याच्या 16 वर्षीय मुलाने देखील राहत्या घरात आत्महत्या केली होती. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केलाय. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटल येथे पाठवले आहेत.
दरम्यान या दोन्ही पती-पत्नीच्या जवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यांच्या मुलाचा पुणे येथे जो मृत्यू झाला होता त्यात वाकड पोलिसांविषयी नाराजीचा काही मजकूर असल्याची चर्चा होत आहे. गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेत कार्यरत होते ते सध्या सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खासदारसाहेबांनी चालवलेल्या आंदोलनावर तुमचे अभिप्राय काय!
02/08/2024

खासदारसाहेबांनी चालवलेल्या आंदोलनावर तुमचे अभिप्राय काय!

01/08/2024

पंकजा मुंडे यांच्या भेटीबद्दल प्रकाश अंबेडकर Ghantaमी पाथर्डीकर Mi PathardikarLokmatSudhir KaradBJP OBC MorchaZee 24 TaasTV9 MarathiSTAR MarathiColors Marathi@

Address

Ahmednagar
Ahmednagar MIDC
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagar Ghanta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share