26/06/2024
बिनपाण्याचं बेट
अहमदनगर शहरात राहणारे लोक हे नेमक समजू शकतील.
नगर-कल्याण रस्ता नेप्तीचौकातून जातो.या रस्त्याने नेप्ती चौकातून शंभर मीटर अंतरावर सीना नदीचा पूल आहे.पुलाच्या पलीकडे साधारण दोन किलोमीटर परिसरात अनेक कॉलनी आहेत आणि हे जवळपास १२-१५००० लोकवस्तीचे उपनगर झालेले आहे.
सीना नदीच्या पुलावरून बऱ्याचदा पावसाचे पाणी जाते कारण पात्र अरुंद आणि पुल लहान आहे.म्हणून नवीन पुलाचे काम सुरु झालेले आहे.जुना पूल पाडलाय आणि तात्पुरता पर्यायी रस्ता नदीत मोठे पाईप टाकून त्यावर माती मुरूम टाकून वर सिमेंट काँक्रीट टाकून केलेला आहे.
जर मोठा पाउस आला आणि नदीला पूर आला तर हा रस्ता लवकर पाण्याखाली जाईल ज्याला कोणतेही गार्डस्टोन अथवा कठडे नाहीत.
शहरातून कल्याणरोडला जाण्यासाठी रेल्वेस्टेशन रोडवरून लिंक रोडने जायचं म्हटल तर त्याच खोदकाम करून ठेवलेलं आहे नवीन रस्त्यासाठी.मग पर्याय उरला पुणे बायपासला जाऊन पुन्हा माघारी येणे.
दुसरा पर्याय एमआयडीसीमार्गे जाणे, त्यासाठी निंबळक चौकात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करून ठेवलेलं आहे , त्यामुळे थेट मनमाड रोडवर जाऊन बायपास मार्गे कल्याण रोडला येणे.
भरीला भर म्हणून मनमाड रोडने डीएसपी चौकात जाणारी ट्रॅफिक रस्त्याच्या कामासाठी शहरातून वळवली आहे त्यामुळे संपूर्ण शहरात पुढले तीन आठवडे वाहतूक कोंडी ठरलेली आहे.
पुणे रस्ता किंवा एमआयडीसी रस्ता कुठूनही जायचं म्हटल तरी शहरातून शंभर मीटर अंतरासाठी कमीतकमी पंधरा किलोमीटर लांबीचा वळसा पडणार हे नक्की.
हे अस आहे आमच बिनपाण्याच बेट.
- आनंद शितोळे