15/10/2024
*==* *प्रेसनोट* *==*
*यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 48 वर्षे
▶️ **आलोसे* - राकेश पुंडलिक महाजन, वय - 42 वर्ष, पद - सहाय्यक अभियंता, वर्ग -2, म.रा.वि.वि.कं.म. सहाय्यक अभियंता कार्यालय, सुपा, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर मुळ रा. मु.पो. ताहराबाद, ता. सटाणा, जिल्हा नाशिक सध्या रा.दिपक सोनवणे यांच्या घरी भाडोत्री, नामपुर रोड, डिबी नगर, सटाणा, ता. सटाणा, जिल्हा नाशिक
▶️ *लाचेची मागणी*
5,000/- रुपये.
दिनांक -15/10/2024
▶️ **लाच स्विकारली*
5,000/ रुपये
दिनांक -15/10/2024
▶️ **हस्तगत रककम* -
5,000/-रुपये
▶️ *लाचेचे कारण*
तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांच्या फर्मला वाळवणे, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर येथील खाजगी रिसॉर्ट चे ठिकाणी ट्रांसफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून देणे करिता आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दि.14/10/2024 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.15/10/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक राकेश पुंडलिक महाजन, सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 5,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.15/10/2024 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांचे कडून 5,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध सुपा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्री.राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर.
▶️ **सापळा पर्यवेक्षण अधिकारी**
श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर
▶️ *सापळा पथक*
पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, चापोहेकॉ. दशरथ लाड
▶️ **मार्गदर्शक* -
*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
▶️ *सहकार्य* -
*1)श्री. स्वप्निल राजपूत, वाचक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. मुख्य अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित, नाशिक परिमंडळ, नाशिक
---------------------------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================