10/07/2025
मका पिकावर येणारी लष्करी अळी नियंत्रण करयाला अवघड नाही, तर आपण त्यासाठी योग्य पद्धत वापरत नाही,
फक्त किटकनाशक फवारणी करुन लष्करी अळी तर नियंत्रण होईल पण आपला खर्च वाढेल, आणि सुरवातीला नुकसान सुद्धा होईल,
👉म्हणून या लष्करी अळीला नियंत्रण करण्यासाठी सुरवातीला प्रकाश सापळा लावावे,
२.५ एकरात १ प्रकाश सापळा
१ मादी पतंग १०००-२००० अंडी १००-२०० च्या पुंजक्यामध्ये घालत असते,
म्हणून प्रकाश सापळा लावावा तर त्यामध्ये दररोज १०-२० पतंग येईल म्हणजे आपण १०,०००-२०,००० हजार अंडी आणि अळीच बिना खर्च नियंत्रण केल्यासारख होईल
👉त्यानंतर शेतातील अंडी पुंज शोधून त्याला नष्ट करावे,
👉सुरवातीला अळी एकाच पानावर राहते तर अशा पानाला तोडुन त्या अळिला किटकनाशक द्रावणात टाकावे, म्हणजे याचा प्रसार ईतर झाडावर होणार होणार नाही,
👉यासोबत आपण परोपजिवी मित्र किटकाचे अंडी असलेले card शेतात लावायच आहे,
एकरी ५०,००० अंडी २-३ वेळेस
👉भेटत असल्यास SLNPV वायरसची फवारणी करावी
👉सुरवातीला मका पिकावर बायोमिक्स ची फवारणी करावी,
१५० ग्रम किंवा मिली प्रती 15 लिटर पाणी,
👉येवढे उपाय केल्यानंतर रासायनिक किटकनाशकाची आवश्यक शक्यतो पडणार नाही, तरी
प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास खालील कोणत्याही एक किटकनाशकाची मका पिकाच्या पानावर आणि पोंग्यामध्ये फवारणी करावी
बाराझाईड ४० मिली
emamectin 10 gm + cloro 30 ml
Delegate 15 ml
कोराजन 7 मिली
निखिल चव्हाण MSc Agri किटकशास्त्र
[email protected]
#शेतकरीbrand #शेती #शेतीमाहिती #शेतकरी #मका