Common Man character

Common Man character Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Common Man character, News & Media Website, Akola.

03/09/2024
*प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना मेस्टा जीवनगौरव*ककलांचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्...
18/01/2024

*प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना मेस्टा जीवनगौरव*

ककलांचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशनचा शिक्षण क्षेत्र आणि समाजसेवेतील बहुमोल योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाटयगृहात 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी सांगितले.

पत्रकारितेद्वारे तसेच लोकसाहित्य लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या विकासासाठी बहुमोल कार्य केले आहे. मुंबई विद्यापीठात लोककला अकादमी मध्ये समन्वयक आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून 2017 पर्यंत यशस्वीरित्या लोककलांच्या प्रशिक्षणाचे अध्यापन कार्य त्यांनी केले आहे. त्यांना आतापर्यंत पद्मश्री दया पवार पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संशोधन ग्रंथ पुरस्कार, कलादान पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Pune : पाण्याचे संकट होतेय गडद ! जिल्ह्यात धरणांतील साठा निम्म्याच्याही खाली...यंदा एल निनोमुळे मॉन्सून लांबणीवर जाण्याच...
15/04/2023

Pune : पाण्याचे संकट होतेय गडद ! जिल्ह्यात धरणांतील साठा निम्म्याच्याही खाली...
यंदा एल निनोमुळे मॉन्सून लांबणीवर जाण्याची शक्‍यता असून, जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आत्तापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील 26 धरणांपैकी 22 धरणांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील चार महिने पिण्यासाठी तसेच शेतीला पाणी मिळेल असे नियोजन पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांना करावे लागणार आहे.

मागील वर्षी जून 2022 अखेरपर्यंत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरण परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांमध्ये पाण्याचा येवा वाढला. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होत राहिली. त्यामुळे ऑगस्ट महिना अखेरपर्यंत सर्वच धरणे 100 टक्के भरली. तसेच परतीचा पाऊससुद्धा चांगला झाला होता. आता धरणांमधून शेतीला आवर्तन सुरू आहे. तसेच पिण्यासाठीसुद्धा धरणातून पाणी सोडले जात आहे. पुढील दोन महिन्यांत होणारे बाष्पीभवन या सर्व बाबींचा विचार करून प्रत्यक्षात किती पाणी मिळणार आहे, याचा विचार करून पाटबंधारे विभागाकडून नियोजन केले आहे.

खडकवासला साखळीत 12.99 टीएमसी साठा
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, आणि टेमघर या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. सद्यस्थितीत चारही धरणांमध्ये मिळून एकूण 12.99 टीएमसी म्हणजे 44.55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर भामा आसखेड धरणात 3.65 टीएमसी म्हणजे 47.61 टक्के पाणीसाठा आहे.

विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी.......देशभरात ड...
14/04/2023

विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी.......
देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भीमसैनिकांकडून जल्लोष साजरात केला जातोय.
अशातच विरामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकी दरम्यान विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरारच्या कारगिल नगर परिसरात गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले ?
विरारच्या कारगिल नगर येथील बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते.
त्यावेळी मिरवणूक ट्रॉलीवर ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील ६ जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. उमेश कनोजिया (१८), राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) आणि अस्मित खांबे (३२) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींपैकी अस्मित खांबे याची प्रकृती स्थिर असून उमेश, राहुल आणि सत्यनारायण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

तिघांनाही मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मिरवणुकीतून परताना ट्रॉलीवरील लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मरला धक्का लागल्याने वीजेचा झटका लागून ही दुर्घटना घडल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली. या दुर्घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.

एल निनो आणि लाल कंदिलाची घाई...एल निनो आणि ला निना आलटून पालटून येत राहतात. स्वाभाविकपणे आता एल निनोचे येणे अपेक्षित आहे...
08/04/2023

एल निनो आणि लाल कंदिलाची घाई...
एल निनो आणि ला निना आलटून पालटून येत राहतात. स्वाभाविकपणे आता एल निनोचे येणे अपेक्षित आहे.
पण एल निनोची जराशी चाहूल लागताच धोक्याचा लाल कंदील दाखवणे घाईचे ठरेल. निदान आगामी मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचे अधिकृत पूर्वानुमान जाहीर होईपर्यंत तरी वाट पाहणेच समंजसपणाचे ठरेल.

एल निनो आणि ला निना हे स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. त्यांचा मराठीत सोपा अनुवाद करायचा म्हटला तर तो एक मुलगा आणि एक मुलगी, अथवा सुपुत्र आणि सुकन्या, असा करता येईल. पण हे स्पॅनिश शब्द मॉन्सूनच्या संदर्भात मराठीत इतके प्रचलित झाले आहेत की, त्यांचा मराठी पर्याय शोधायची जणू आता गरज राहिलेली नाही. त्यांचे अस्सल स्पॅनिश उच्चार एल निन्यो आणि ला निन्या असे असले तरी मराठीत त्यांना एल निनो आणि ला निना म्हटले जाते, ते काही वावगे नाही.
एल निनो या स्पॅनिश शब्दाचा संबंध युरोपमधील स्पेन देशाशी नसून तो दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाशी आहे; जेथे स्पॅनिश भाषा बोलली जाते. पेरू देशाच्या पश्चिमेस प्रशांत महासागर आहे आणि किनाऱ्यावरील बहुतेक लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. त्यांचा कित्येक शतकांचा अनुभव आहे की, काही वर्षी समुद्र तापलेला असतो आणि मग त्यांच्या जाळ्यात नेहमीइतके मासे पकडले जात नाहीत. कारण मासे थंड पाण्याच्या शोधात खोलवर गेलेले असतात. समुद्र तापायची प्रक्रिया मार्च-एप्रिलमध्ये सुरू होते आणि डिसेंबर महिन्यात नाताळच्या सुमारास ती सर्वाधिक प्रकर्षाने जाणवते. म्हणून या प्रक्रियेला एल निनो हे नाव पडले. त्याचा साधा अर्थ एक मुलगा एवढाच असला तरी एक पवित्र बालक, मानव रूपात जन्म घेणारा देवपुत्र येशू ख्रिस्त, असा अर्थ त्याच्याशी जोडला गेला.

एल निनोचा कालावधी संपल्यावर प्रशांत महासागर थंडावत जातो आणि त्या परिस्थितीला ला निना म्हटले जाते. समजून घेण्यासारखे हे आहे की, एल निनो आणि ला निना या चक्री वादळांसारख्या किंवा अतिवृष्टीसारख्या अधूनमधून घडणाऱ्या आकस्मिक घटना नाहीत. त्या दीर्घ काळ चालणाऱ्या वातावरणीय आणि सागरी प्रक्रिया आहेत ज्या आलटून पालटून बळावतात आणि नाहीशा होतात. पण त्यांच्यात एखाद्या घड्याळातील लंबकासारखी काटेकोर नियमितता नसते. परिणामी, आगामी वर्ष एल निनोचे असेल की ला निनाचे असेल की ते तटस्थ असेल हे निश्चितपणे सांगणे हवामानशास्त्रज्ञांपुढे नेहमीच आव्हान असते. डिसेंबर महिन्यात प्रशांत महासागराचे तापमान किती असेल याचे पूर्वानुमान मार्चमध्ये करणे सोपे नाही आणि ते चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एल निनो, ला निना आणि मॉन्सून आपल्यापासून खूप दूर असलेल्या प्रशांत महासागरावरील एल निनो आणि ला निना या प्रक्रिया आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण त्यांचा भारतीय मॉन्सूनशी जवळचा संबंध आहे. या संबंधाचा शोध कोणी नव्याने लावलेला नाही किंवा तो परदेशात काम करत असलेल्या शास्त्रज्ञांनी लावला, असेही नाही. खरे तर तो शोध शंभर वर्षांपूर्वी भारतातच लावला गेला होता. १९०४ ते १९२४ दरम्यान सर गिल्बर्ट वॉकर भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक होते. विभागाचे मुख्यालय त्याकाळी सिमला येथे होते.
भारतावर इंग्रजांची राजवट होती. इंग्रज साम्राज्याचा भौगोलिक विस्तार फार मोठा असल्याने वॉकर यांना सिमल्यात राहून जगभरातील वेधशाळांच्या नोंदी मिळवणे शक्य झाले. भारतीय मॉन्सूनचे विविध जागतिक सहसंबंध त्यांनी शोधून काढले आणि त्यावर आधारित मॉन्सूनचे पूर्वानुमान ते दर वर्षी देऊ लागले. प्रशांत महासागरावरील एल निनोशी संबंधित सदर्न ऑसिलेशनचा शोध वॉकर यांनी लावला. मॉन्सूनचे अनेक सहसंबंध आता कालबाह्य ठरले असले तरी एल निनो सदर्न ऑसिलेशनशी (एन्सो) गिल्बर्ट वॉकर यांनी जोडलेला सहसंबंध अजूनही मॉन्सूनचे पूर्वानुमान देण्याच्या प्रयत्नात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर एल निनो तापमानाशी संबंधित आहे, तर सदर्न ऑसिलेशन वायुदाबाशी संबंधित आहे. दोन्ही मिळून ते भारतीय मॉन्सूनला प्रभावित करतात.

एल निनो आणि दुष्काळ
अलीकडच्या काळात सागरी तापमान मोजायचे काम हवामान उपग्रह करताहेत. त्याशिवाय समुद्रावर तरंगणारी आणि सागरी प्रवाहांबरोबर वाहत जाणारी स्वयंचलित उपकरणेही सागरी घटकांचे मोजमाप करत असतात. म्हणून एल निनोच्या अचूक नोंदी करणे आता शक्य आहे. पूर्वीच्या काळी व्यापारी जहाजांची या कामात मदत घेतली जायची आणि तापमानाच्या नोंदी व्यापारी जहाजांच्या मार्गांपुरत्याच मर्यादित असायच्या. तरीही मागील शंभर वर्षांच्या नोंदींचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी एल निनोविषयी बरीच ऐतिहासिक माहिती एकत्रित केली आहे.

या माहितीच्या विश्लेषणावरून दोन ढोबळ निष्कर्ष काढता येतात. पहिला हा की, प्रशांत महासागरावर जेव्हा ला निना परिस्थिती असते तेव्हा भारतावर जून ते सप्टेंबर महिन्यातील मॉन्सूनचा पाऊस बहुदा सामान्य असतो. म्हणजे ला निना भारतासाठी अनुकूल असतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे ला निना मागील सलग तीन वर्षे राहिला आणि त्याबरोबर भारतीय मॉन्सूनचा पाऊसही सलग तीन वर्षे चांगला पडला. दुसरा निष्कर्ष एल निनोविषयी आहे, जो मात्र इतका स्पष्ट नाही.
एल निनो परिस्थितीत प्रशांत महासागराचा विषुववृत्तीय भाग तापल्यामुळे त्यावरील हवा हलकी होऊन वर चढते. पुढे ती पश्चिमेकडे वाहू लागते आणि शेवटी ती हिंद महासागरावर खाली उतरते. यामुळे मॉन्सूनच्या प्रवाहात बाधा येते. या अभिसरणाला सर गिल्बर्ट वॉकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 'वॉकर सर्क्युलेशन' असे नाव दिले गेले आहे. संक्षेपात सांगायचे तर एल निनो भारतीय मॉन्सूनसाठी प्रतिकूल ठरू शकतो. पण प्रत्येक एल निनो मॉन्सूनला अपायकारक असतोच असे मात्र नाही. ऐतिहासिक नोंदी हे दाखवतात की काही एल निनो वर्षांत भारतावर दुष्काळ पडला होता; तर इतर काही एल निनो वर्षांत मॉन्सूनचा पाऊस सामान्य राहिला होता.

एल निनोची चाहूल

कारण हे आहे की, एल निनो मॉन्सूनसाठी महत्त्वाचा असला तरी तो मॉन्सूनचा एकमेव नियंत्रक नाही. हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिमालयाच्या पर्वत रांगा आणि संपूर्ण युरोप व आशिया खंड यांचा भारतीय मॉन्सूनच्या निर्मितीत आणि सक्रियतेत सहभाग असतो. भारतीय मॉन्सूनचे अनेक जागतिक सहसंबंध आहेत. हे आपण कधीही विसरू नये. भारतीय मॉन्सूनचे एक सरासरी सामान्य रूप बनवता आले तरी दर वर्षीचा मॉन्सून कोणत्या न कोणत्या बाबतीत अप्रतिम किंवा अद्वितीय असतो. मॉन्सून कधी लवकर येतो तर कधी उशिरा. कधी तो वेळेवर येतो पण नंतर खोळंबतो. कधी तो मध्येच विश्रांती घेतो. काही प्रदेश कधी कोरडेच राहतात, तर काही नद्यांना महापूर येतो. अशी अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे आहेत जी एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करण्यास मदत करू शकतात.

सन २०२०, २०२१ आणि २०२२ ही ला निना वर्षे होती. एल निनो आणि ला निना आलटून पालटून येत राहतात. म्हणून स्वाभाविकपणे आता एल निनोचे येणे अपेक्षित आहे. पण एल निनोची जराशी चाहूल लागताच धोक्याचा लाल कंदील दाखवणे घाईचे ठरेल. निदान आगामी मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचे अधिकृत पूर्वानुमान जाहीर होईपर्यंत तरी वाट पाहणे समंजसपणाचे ठरेल.

- युवराज नायर

पुण्याला हवे ऑगस्टअखेरपर्यंत 7.94 टीएमसी पाणी"एल-निनो'मुळे पाऊस लांबण्याची शक्यता विचारात घेऊन शहराला 31 ऑगस्टपर्यंत 7.9...
08/04/2023

पुण्याला हवे ऑगस्टअखेरपर्यंत 7.94 टीएमसी पाणी
"एल-निनो'मुळे पाऊस लांबण्याची शक्यता विचारात घेऊन शहराला 31 ऑगस्टपर्यंत 7.94 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे.

या मागणीवर जलसंपदा विभाग काय निर्णय घेते, यावर शहरातील पाणीकपात अवलंबून राहणार आहे.

महापालिकेकडून शहरासाठी सध्या खडकवासला धरणातून प्रतिदिन 1470 एमएलडी तर भामाआसखेड धरणातून प्रतिदिन 150 ते 170 एमएलडी पाणी शहरासाठी घेतले जाते. सध्या शहरात कोणतीही पाणीकपात नाही. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत 7.94 टीएमसी पाणी महापालिकेस राखीव ठेवले गेल्यास शहरावर उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट ओढावणार नाही.

मात्र, "एल-निनो'मुळे राज्यात यंदा पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यातच उन्हाळा तीव्र असण्याची चिन्हे आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून पाणी व्यवस्थापन आराखडा व आकस्मिक पाणीपुरवठा नियोजन आराखडा करा, असे आदेश राज्य शासनाने महापालिकेस दिले आहेत. उन्हाळ्यातील स्थितीबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागाची बैठक नुकतीच झाली.
शासनाच्या आदेशानुसार महापालिकेस 31 ऑगस्टअखेर शहरासाठी किती पाणी हवे, याची माहिती जलसंपदा विभागाला सादर केली आहे. त्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांसाठी खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून 7.94 टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र, अंतिम निर्णय शासन तसेच जलसंपदा विभाग घेणार आहे.

कोट्यवधींच्या उधळपट्टीला 'ब्रेक'; संकल्पनांच्या पाट्या, अनावश्यक सुशोभीकरणाला दिला फाटामहापालिकेच्या एका वर्षातील प्रशास...
14/03/2023

कोट्यवधींच्या उधळपट्टीला 'ब्रेक'; संकल्पनांच्या पाट्या, अनावश्यक सुशोभीकरणाला दिला फाटा

महापालिकेच्या एका वर्षातील प्रशासक राजवटीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे नगरसेवकांकडून 'स' यादीतील निधीच्या कोट्यवधींच्या उधळपट्टीला लगाम लागला.
संकल्पनांच्या पाट्यापासून चौकाचौकांतील अनावश्यक शिल्प, सुशोभीकरण, पिशव्या, बकेट वाटपापर्यंतच्या अनावश्यक अशा अनेक कामांना ब्रेक लागला. परिणामी, करदात्या पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची बचत झाली आहे. पुणे महापालिकेत नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डात, प्रभागात आवश्यक कामे करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांकडून 'स यादी'च्या माध्यमातून स्वतंत्र निधीची अंदाजपत्रकात तरतूद केली जाते.

मात्र, गेल्या काही वर्षांत या 'स यादी'च्या निधीचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले. काही लाखांतील ही तरतूद आता कोट्यवधी रुपयांवर गेली. साधारणपणे सत्ताधारी नगरसेवक पाच कोटी, विरोधी पक्षांतील नगरसेवकाला अडीच ते तीन कोटी आणि प्रमुख पदाधिकार्‍यांना मात्र दहा ते पंधरा कोटींचा निधी देण्याची प्रथा पडली. त्यामुळे दरवर्षीच्या अंदाजपत्रकात जवळपास सातशे ते आठशे कोटींचा निधी नगरसेवकांना 'स यादी' म्हणून द्यावा लागतो.
यामधील गंभीर बाब म्हणजे या निधीतून नगरसेवकांकडून बकेट, पिशव्या, बाकडी, चौकाचौकांमध्ये शिल्प, भिंती रंगविणे, संकल्पना पाट्या लावणे, सुस्थितीतील रस्ते, पदपथ उखडून ते नव्याने करणे अशा कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याची चढाओढ सुरू होती. अनेकदा स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा विरोध होऊनही ही कामे सुरूच राहात. धक्कादायक म्हणजे नगरसेवकांच्या 'स यादी'तील निधीतच सर्वाधिक गैरकारभाराचे प्रकार घडतात.

नातेवाइकांनाच ही कामे मिळावीत, यासाठी निविदा प्रकियेत रिंग करण्यापासून अवाच्या सव्वा टक्केवारी, निकृष्ट कामे आणि कामे न करता बिले काढणे असेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. आता प्रशासक राजवटीमुळे चालू वर्षभरात 'स यादी'खाली खर्च होणारा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे ही उधळपट्टी वाचली आणि अनावश्यक कामांना ब्रेक लागला. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांसाठी हा निधी वापरता येणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

कसबा-चिंचवडची पोटनिवणुकीची आज मतमोजणी; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?पुण्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll) आ...
02/03/2023

कसबा-चिंचवडची पोटनिवणुकीची आज मतमोजणी; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
पुण्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll) आणि कसबा (Kasaba Bypoll) पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. कसब्यात या दोघांमध्ये सध्या चांगलीच चुरशीची लढत दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार झाला. स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील, असा अंदाज स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कसब्यात मतमोजणीच्या 20 फेऱ्या

मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

चिंचवडमध्ये मतमोजणीच्या 37 फेऱ्या

सकाळी आठ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे.

प्रतिष्ठेची निवडणूक

ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं आणि राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. सत्तांतर झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीवरुन राज्याची पुढची गणितं ठरणार आहे.
प्रतिष्ठेची निवडणूक

ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं आणि राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. सत्तांतर झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीवरुन राज्याची पुढची गणितं ठरणार आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यानंतर आज निकाल...

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे तर कसबामध्ये दुहेरी लढत होत आहे. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेते भाजपच्या उमेदावाराच्या
प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या.

https://youtu.be/D-FYp3ozVlc
19/02/2023

https://youtu.be/D-FYp3ozVlc

#शिवबाइंग्रजीप्राथमिकशाळाअकोला #शिवबा #शिवबाअकोला

DDC NEWS - दीड कोटीच्या बीलासाठी कंत्राटदाराचे कुटूंबासह १६ महिन्यांपासून आझाद मैदानात उपोषण मुंबई : परभणी येथील रस्त्या...
10/02/2023

DDC NEWS - दीड कोटीच्या बीलासाठी कंत्राटदाराचे कुटूंबासह १६ महिन्यांपासून आझाद मैदानात उपोषण

मुंबई : परभणी येथील रस्त्याच्या केलेल्या कामाच्या दीड कोटीच्या बीलासाठी झगडत असतानाच, पीडब्लूडी अधिका-यांकडून झालेल्या त्रासामुळे एका कंत्राटदाराला घरदार विकून पत्नी, मुलांसह रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. राजू चिन्नप्पा हुलगुंडे असे त्या कंत्राटदाराचे नाव आहे. पीडब्लूडी अधिका-यांच्या त्रासामुळे सुखी संसाराची राखरांगोळी झाली असून, विवाहीत मुलगीही गमवावी लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून कंत्राटदार राजू हुलगुंडे आपल्या पत्नी, लहान मुलासह मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे फडणवीस सरकार आलं, मात्र अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब, आम्हाला न्याय द्या.. अशी कळकळीची विनंती हुलगुंडे कुटूंबिय करीत आहेत.

नांदेड येथे राहणारे कंत्राटदार राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत परभरणी जिल्हयातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस ते पुर्णा या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्या कामाचे त्यांना १४ लाख ५५ हजार ८५७ रूपये प्राप्त झाले, मात्र उर्वरित बिलाची रक्कम १ कोटी ५६ लाख रूपये अद्यापर्यंत त्यांना मिळालेली नाही. सदर रकमेचे बील रेकॉर्ड करण्यासाठी पीडब्लूडी अधिकारी टक्केवारीची २० लाख रूपये रक्कम आगाऊ मागत आहेत. रस्त्याचे काम मिळावे यासाठी त्यांनी मुलीचे दागिने विकून पीडब्लूडी अधिका-यांना आगाऊ १० लाख रूपये दिले हेाते. अधिका-यांच्या त्रासामुळे आम्ही घरदार गहाण ठेवून दागिने विकून काम केलं. आता २० लाख कुठून देणार ? असे सवाल राजू यांनी केला. आम्हाला न्याय हवाय अशी मागणी ते करीत आहेत. नांदेड येथे उपोषण केल्याने त्यांना अमानुष मारहाण झाल्यानंतर हुलगुंडे यांनी न्यायासाठी मुंबई मंत्रालयाकडे धाव घेतली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरला. २५ ऑक्टोबर २०२१ पासून हुलगुंडे कुटूंबाने आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. तब्बल १६ महिने होऊनही हुलगुंडे कुटूंबिय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
परभणी अधिका-यांकडून अमानुष मारहाण, २० लाख रूपये दिले तरच बील रेकॉर्ड करू …
नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागासमोर कंत्राटदार राजू हुलगुंडे यांनी उपोषण केले होते. मात्र रात्रीच्यावेळी त्या दांम्पत्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. परभणी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता खुशाल देवीदास पाडेवार
मुख्य अभियंता पांढरे, कनिष्ठ अभियंता संजय बाबुराव देवडे, उपकार्यकारी अभियंता सोनवणे उपअभियंता बिराजदार, कनिष्ठ अभियंता फुलपगार, पांचाळ यांच्यासह आणखी तिघेजण अशांनी मारहाण केल्याचे आरोप राजू यांनी केला. पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव नंबर लिहून घेतले, सकाळी बोलवतो असे सांगितले. पण आमची तक्रार लिहूनही घेतली नाही. उलट पोलिसांनी आम्हाला दमदाटी करून हाकलून लावले असे राजू यांनी सांगितले. बील रेकॉर्ड करण्यासाठी धातकर साहेबांनी कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे यांना बील रेकॉर्ड करण्यासाठी सांगितले, त्यांनी होकार दर्शविला. पण धोंडगे यांनी आम्हाला भेटही दिली नाही. २० लाख रूपये दिले तरच बील रेकॉर्ड करू अशी मागणी अधिका-यांनी केल्याचे राजू यांनी सांगितले. त्यामुळे न्यायासाठी आम्ही उपोषणला बसलो. परंतु अधिका-यांनी अमानुषपणे मारहाण करून आम्हाला हाकलून लावले. पोलिसांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायासाठी आम्ही मुंबईला आलो, घरदार, दागिने विकले, पैसे गेले, लेकरू गेलं… आम्हाला न्याय हवाय असे राजू यांनी डोळयातील अश्रूं पुसत सांगितले.

मंत्रालय आमच्या खिशात, तत्कालीन मंत्र्यांचा आदेश जुमानला नाही
हुलगुंडे यांनी न्यायासाठी तत्कालीन सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी चव्हाण यांनी संबधित अधिका-यांना चांगलेच झापले. गरीबाचे बील देऊन टाका असा सज्जड दम अधिका-यांना भरला होता. मात्र काही दिवसातच ठाकरे सरकार गेल्याने अधिका-यांनी त्यांचा आदेशही पाळला नाही. तू मंत्रालयात जा, अन्यथा कुठे जा, मंत्रालय आमच्या खिशात आहे, असा परभरणीच्या अधिका-यांनी दम भरल्याचे राजू यांनी सांगितले. आम्हाला मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घ्यायची आहे, पण भेट होत नाही, ते आम्हाला न्याय देतील अशी आशा हुलगुंडे यांनी व्यक्त केली.

10/02/2023


DDC NEWS - दीड कोटीच्या बीलासाठी कंत्राटदाराचे कुटूंबासह १६ महिन्यांपासून आझाद मैदानात उपोषण

मुंबई : परभणी येथील रस्त्याच्या केलेल्या कामाच्या दीड कोटीच्या बीलासाठी झगडत असतानाच, पीडब्लूडी अधिका-यांकडून झालेल्या त्रासामुळे एका कंत्राटदाराला घरदार विकून पत्नी, मुलांसह रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. राजू चिन्नप्पा हुलगुंडे असे त्या कंत्राटदाराचे नाव आहे. पीडब्लूडी अधिका-यांच्या त्रासामुळे सुखी संसाराची राखरांगोळी झाली असून, विवाहीत मुलगीही गमवावी लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून कंत्राटदार राजू हुलगुंडे आपल्या पत्नी, लहान मुलासह मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे फडणवीस सरकार आलं, मात्र अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब, आम्हाला न्याय द्या.. अशी कळकळीची विनंती हुलगुंडे कुटूंबिय करीत आहेत.

नांदेड येथे राहणारे कंत्राटदार राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत परभरणी जिल्हयातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस ते पुर्णा या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्या कामाचे त्यांना १४ लाख ५५ हजार ८५७ रूपये प्राप्त झाले, मात्र उर्वरित बिलाची रक्कम १ कोटी ५६ लाख रूपये अद्यापर्यंत त्यांना मिळालेली नाही. सदर रकमेचे बील रेकॉर्ड करण्यासाठी पीडब्लूडी अधिकारी टक्केवारीची २० लाख रूपये रक्कम आगाऊ मागत आहेत. रस्त्याचे काम मिळावे यासाठी त्यांनी मुलीचे दागिने विकून पीडब्लूडी अधिका-यांना आगाऊ १० लाख रूपये दिले हेाते. अधिका-यांच्या त्रासामुळे आम्ही घरदार गहाण ठेवून दागिने विकून काम केलं. आता २० लाख कुठून देणार ? असे सवाल राजू यांनी केला. आम्हाला न्याय हवाय अशी मागणी ते करीत आहेत. नांदेड येथे उपोषण केल्याने त्यांना अमानुष मारहाण झाल्यानंतर हुलगुंडे यांनी न्यायासाठी मुंबई मंत्रालयाकडे धाव घेतली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरला. २५ ऑक्टोबर २०२१ पासून हुलगुंडे कुटूंबाने आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. तब्बल १६ महिने होऊनही हुलगुंडे कुटूंबिय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
परभणी अधिका-यांकडून अमानुष मारहाण, २० लाख रूपये दिले तरच बील रेकॉर्ड करू …
नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागासमोर कंत्राटदार राजू हुलगुंडे यांनी उपोषण केले होते. मात्र रात्रीच्यावेळी त्या दांम्पत्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. परभणी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता खुशाल देवीदास पाडेवार
मुख्य अभियंता पांढरे, कनिष्ठ अभियंता संजय बाबुराव देवडे, उपकार्यकारी अभियंता सोनवणे उपअभियंता बिराजदार, कनिष्ठ अभियंता फुलपगार, पांचाळ यांच्यासह आणखी तिघेजण अशांनी मारहाण केल्याचे आरोप राजू यांनी केला. पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव नंबर लिहून घेतले, सकाळी बोलवतो असे सांगितले. पण आमची तक्रार लिहूनही घेतली नाही. उलट पोलिसांनी आम्हाला दमदाटी करून हाकलून लावले असे राजू यांनी सांगितले. बील रेकॉर्ड करण्यासाठी धातकर साहेबांनी कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे यांना बील रेकॉर्ड करण्यासाठी सांगितले, त्यांनी होकार दर्शविला. पण धोंडगे यांनी आम्हाला भेटही दिली नाही. २० लाख रूपये दिले तरच बील रेकॉर्ड करू अशी मागणी अधिका-यांनी केल्याचे राजू यांनी सांगितले. त्यामुळे न्यायासाठी आम्ही उपोषणला बसलो. परंतु अधिका-यांनी अमानुषपणे मारहाण करून आम्हाला हाकलून लावले. पोलिसांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायासाठी आम्ही मुंबईला आलो, घरदार, दागिने विकले, पैसे गेले, लेकरू गेलं… आम्हाला न्याय हवाय असे राजू यांनी डोळयातील अश्रूं पुसत सांगितले.

मंत्रालय आमच्या खिशात, तत्कालीन मंत्र्यांचा आदेश जुमानला नाही
हुलगुंडे यांनी न्यायासाठी तत्कालीन सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी चव्हाण यांनी संबधित अधिका-यांना चांगलेच झापले. गरीबाचे बील देऊन टाका असा सज्जड दम अधिका-यांना भरला होता. मात्र काही दिवसातच ठाकरे सरकार गेल्याने अधिका-यांनी त्यांचा आदेशही पाळला नाही. तू मंत्रालयात जा, अन्यथा कुठे जा, मंत्रालय आमच्या खिशात आहे, असा परभरणीच्या अधिका-यांनी दम भरल्याचे राजू यांनी सांगितले. आम्हाला मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घ्यायची आहे, पण भेट होत नाही, ते आम्हाला न्याय देतील अशी आशा हुलगुंडे यांनी व्यक्त केली.

09/02/2023

उद्यम से देश निर्माण का संकल्प लेकर 24 दिसंबर को मुंबई से शुरू हुई इस रेलयात्रा को इस बार जागृति अमृत काल यात्रा का नाम दिया गया है। मंगलवार को यात्रा का पड़ाव देवरिया में था। यात्रा में शामिल सभी युवा यात्रियों ने ग्रामसभा बरपार व आसपास के गांवों का भ्रमण किया।
यात्रा के संस्थापक शशांक मणि ने कहा कि जागृति रेल यात्रा पिछले 14 वर्षों से उद्यमिता से देश निर्माण का संकल्प लेकर 24 दिसंबर से आठ जनवरी तक चल रही है। प्रधानमंत्री की प्रेरणा से 15 पर्यटन स्थल का भ्रमण करने, इनोवेशन और शोध को जीवन शैली बनाने और आजादी की 75वीं वर्षगांठ पर पांच प्रण देकर हमारी विरासत पर गर्व करने और विकसित राष्ट्र बनने का इसमें आह्वान किया गया है। संस्था ने इन 14 वर्षों में एक हजार से ज्यादा उद्यमी बनाए हैं जो अपना स्टार्टअप चला रहे हैं। साथ ही सात हजार से अधिक लोगों को उद्यमिता से प्रभावित किया है।

Address

Akola
444407

Telephone

+919766612354

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Common Man character posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Common Man character:

Share