AkolaNews

AkolaNews या सदरात तुमचे सहर्ष स्वागत आहे. उच्च-गुणवत्तेची न्यूज आणि मनोरंजन आता थेट तुमच्या मोबाईल

ANN न्युज नेटवर्क आणि GTPL News Akola या सदरा खाली आम्ही माहिती, मनोरंजन, आणि तुमच्या परिसरातील स्थानिक बातम्या, राजकारण, टेक, जीवनशैली करमणूक, टिप्स,लाइव अपडेट, व्यवसाय, तंत्रज्ञान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपडेट विषयी आपल्याला माहिती देतो. आम्ही सर्व बातम्या विश्वसनीय संसाधनांमधून तुमच्यापर्यंत पोहोचवितो.

12/07/2025

कढी-भातातून विषबाधा ! १३ विद्यार्थिनी रुग्णालयात, ५ गंभीर

बुलढाण्यातील येळगाव पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेत विषबाधेचा प्रकार! कढी-भात खाल्ल्यानंतर १३ विद्यार्थिनी आजारी; ५ गंभीर. भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या शाळेत अन्न व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह.

👉 अधिक बातम्यांसाठी Akola News Network ला सब्सक्राइब.... फॉलो करा

12/07/2025

गोवंश वाहतुकीवर बजरंग दलाची कारवाई ! बैलगाडी पोलिसांच्या ताब्यात

अकोल्यातील डाबकी रोड परिसरात गोवंश वाहतुकीच्या संशयावरून बजरंग दलाने थेट कारवाई केली. बैलगाडी पोलिसांच्या ताब्यात; परिसरात तणावाचं वातावरण. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

👉 अधिक बातम्यांसाठी Akola News Network ला सब्सक्राइब.... फॉलो करा

12/07/2025

जिल्हा सामान्य रुग्णालयात थरार | नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्डमध्येच नातेवाईकांमध्ये तुफान मारामारी! गोंधळाचा थरार मोबाईलमध्ये कैद,
VIDEO सोशल मीडियावर व्हायरल. रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

👉 अधिक बातम्यांसाठी Akola News Network ला सब्सक्राइब.... फॉलो करा

11/07/2025

कुरूम ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारावर संतप्त नागरिकांचा एल्गार

अकोला जिल्ह्यातील कुरूम ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिक हैराण!
▪️ नाल्यांतून पाणी रस्त्यावर, गावात दुर्गंधी आणि रोगराईचा धोका
▪️ स्वच्छतेसाठी लाखोंचा खर्च… पण गावात घाणच घाण
▪️ सामाजिक कार्यकर्ते संतोष शिरभाते यांचा उपोषणाचा इशारा

काय खरंच ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार सुरू आहे?
कोण जबाबदार आहे या दुर्दशेला?
📢 पाहा ANN चा विशेष रिपोर्ट





#ग्रामपंचायतविरोधातआंदोलन #लोकशक्ती #जागरजनतेचा

11/07/2025

पडळकरांच्या वक्तव्यावर बुलढाण्यात संताप

ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बुलढाणा शहरात संतापाचा भडका!
आज सकाळी ख्रिश्चन समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आमदारकी रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

🪧 "धर्मगुरूंविषयी द्वेषमूलक भाषा सहन केली जाणार नाही!"
📢 शेकडो आंदोलक रस्त्यावर, सामाजिक सलोखा टिकवण्याचा निर्धार
📜 जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर, कायदेशीर कारवाईची मागणी

⛔ धार्मिक सलोखा धोक्यात येऊ नये म्हणून समाज एकवटला – सविस्तर पाहा हा रिपोर्ट.




#धर्मगुरूअपमान


11/07/2025

सात दिवस सूर्य गायब ! ढगाळ हवामानामुळे बियाणं कुजण्याचा धोका

गेल्या सात दिवसांपासून महाराष्ट्रात सूर्याचे दर्शन नाही!
आकाशात फक्त काळसर ढग आणि वातावरणात दमटता –
याचा थेट परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर होत आहे.

🌱 खरीप पेरणीनंतर बियाण्यांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने अंकुरण थांबले,
बियाणं कुजण्याची शक्यता आणि उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

👨‍🌾 शेतकरी आर्थिक संकटात; नियोजन कोलमडलं
🧒 वृद्ध व मुलांवर त्वचारोग, अस्वस्थतेचे परिणाम
☁️ हवामान विभागानुसार आणखी काही दिवस सूर्यदर्शन नाही

➡️ संपूर्ण माहिती पाहा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जागरूक व्हा!







11/07/2025

गुरुपौर्णिमेला उगवा फाट्यावर भक्तांची मांदियाळी

गुरुपौर्णिमेनिमित्त उगवा फाटा (अकोला) येथील श्री काशी विश्वनाथ मुक्तेश्वर संस्थानात भक्तांचा महासागर उसळला!
🔱 महंत ब्रह्मस्वरूपानंद गिरीजी महाराज यांच्या सान्निध्यात भक्तांनी घेतलं गुरुपदाचं दर्शन
🎶 भजन, कीर्तन आणि महाप्रसाद – भक्ती आणि अध्यात्मिक उन्नतीचा संगम

वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भजनांनी वातावरण भक्तिमय केलं.
भाविकांनी दिवसभर हरिनामाच्या गजरात गुरूंच्या चरणी लीन होत महाप्रसादाचा लाभ घेतला.

🕉️ उगवा फाटा हे केवळ धार्मिक स्थळ नव्हे, तर भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू बनले आहे.

👉 संपूर्ण भक्तिमय क्षण पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि शेअर करा!







11/07/2025

नाल्यांचा अभाव, शेत तलावात ! अंत्री-गोद्री रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

चिखली तालुक्यातील अंत्री-गोद्री रस्त्याचं अपूर्ण नियोजन शेतकऱ्यांवर घातक ठरतंय!
सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्यांशिवाय रस्ता तयार केल्यामुळे,
पावसाचं पाणी थेट शेतात साचतंय, पिकं बुडालीयत – नुकसान हेक्टरी लाखोंचं!

शेतकरी विनायक सरनाईक, सुनील वायाळ यांचा आक्रोश:
"वेळोवेळी तक्रारी करूनही कोणी ऐकलं नाही. आता आम्हाला न्याय कोण देणार?"

➡️ सरकारने तत्काळ पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.




#शेतकरी_हंबरडा #सरकार_कधी_जागं_होणार

11/07/2025

पिसाळलेल्या कुत्र्याचा बुलढाण्यात धुमाकूळ ! १४ नागरिक जखमी

बुलढाण्यात एक पिसाळलेला कुत्रा शहरवासीयांचा जीवघेणा संकट ठरला!

आज सकाळपासून संगम चौक, जयस्तंभ चौक, हिरवे पेट्रोल पंप, आणि जिजामाता प्रेक्षागृह परिसरात या कुत्र्याने १४ नागरिकांना चावा घेतला, त्यात महिला आणि लहान मुलेही आहेत.

जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला जात आहे.
पिसाळलेला कुत्रा स्थानिकांनी पकडून ठार केल्याची माहिती आहे.

शहरातील कुत्रा नियंत्रण व्यवस्था अपयशी ठरत असल्याने नपावर टीकेची झोड उठली आहे.

➡️ संपूर्ण अपडेट पाहा आणि आवाज उठवा!



#प्रशासनाची_उदासीनता

11/07/2025

चार महिने, एकही पाऊल नाही ! कैलास नागरे यांच्या पत्नीचा आत्महत्येचा इशारा

"मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचं काय झालं?"

बुलढाण्यातील शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महतेनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्याच्या कुटुंबाचे पालकत्व घेण्याचं आश्वासन दिलं होतं... पण चार महिने उलटले तरी काहीच हालचाल नाही!

त्यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात आत्महत्येचा इशारा दिला आहे.
हा इशारा केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण शेतकरी समाजाच्या न्यायासाठी आहे.

बलिदानाचं राजकारण बंद करा – कृती करा!





#शेतकऱ्यांचा_आवाज
#विधवा_शेतकरी

11/07/2025

डाळीसाठी आमदारांचा राग, पण रुग्णालयात घाणीचा सडा

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड डाळ खवखवीत नसल्याने मंत्रालयात मारहाण करतात… पण त्यांच्याच मतदारसंघातील जिल्हा रुग्णालयात रुग्ण घाणीच्या गर्तेत अडकलेत!

स्वयंपाकघराजवळ साचलेली घाण, कुजलेला कचरा, दुर्गंधी आणि माशांचा त्रास —
आरोग्य खात्याच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय.
रुग्ण, कर्मचारी आणि नागरिक संतप्त, पण प्रशासन गप्प?

हे केवळ आरोग्याचं नव्हे, तर लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचंही प्रश्न आहे.

संपूर्ण रिपोर्ट पाहा आणि आपला आवाज उठवा!






#जनतेचा_विचार #रुग्णालयाची_दुर्दशा

11/07/2025

अकोल्यात कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज

श्रावणातील पवित्र कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासन सज्ज!
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने आणि विविध कावड मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, CCTV, ड्रोन निगराणी यांसारख्या सुविधा पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
शिस्तीचे पालन आणि सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

अकोल्याची कावड यात्रा शांततेत आणि भक्तीभावात पार पडावी, यासाठी प्रशासन व मंडळे एकवटली आहेत.
👉 अधिक बातम्यांसाठी Akola News Network ला सब्सक्राइब.... फॉलो करा





#अकोला_कावड_यात्रा #श्रावणमास #शांततेचा_संदेश

Address

Akola

Alerts

Be the first to know and let us send you an email when AkolaNews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AkolaNews:

Share