What's up अलिबाग

What's up अलिबाग We are in branding and ad agency with it's base in Alibag. With a very efficient and updated team

Providing solutions in Digital Branding, Social Media, Business Development, Graphic and Visual Communication, Films and Television.

दिवस आठवा - महाकाली 🌹व्हिडियोसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा !https://www.instagram.com/reel/DA7Vtc9C7wU/?igsh=MTZ3...
10/10/2024

दिवस आठवा - महाकाली 🌹

व्हिडियोसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा !
https://www.instagram.com/reel/DA7Vtc9C7wU/?igsh=MTZ3d3R6ZGVrZmlmYQ==

#नवदुर्गा_नवरात्रविशेषमालिका

रौद्र रूपात असलेल्या महाकाली देवीची मंदिरात प्रतीष्ठापना केली आणि ती शांत झाली अशी अख्याईका या देवीबद्दल सांगितली जाते.

दिवस आठवा : देवी महाकाली 🌹

मालिकेच्या आठव्या दिवशी आपण दर्शन घेणारं आहोत देवी महाकालीचे. नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला मंदिराचा परीसर अगदी ऐसपैस आहे, आत महाकाली अवतारातली विशेष मुर्ती आहे. मंदिराबाहेरची सुंदर पोखरण येणाऱ्या भाविकांना आपसूकच त्या वातावरणाच्या प्रेमात पाडते.

व्हिडियो साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DA7Vtc9C7wU/?igsh=MTZ3d3R6ZGVrZmlmYQ==

नवरात्रीच्या काही दिवसच आधी या मालिकेचं शूट आम्ही केलं असल्याने बऱ्याच मंदिरांमध्ये डागडुजीची कामं सुरू होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोजक्याच गोष्टी आम्ही चित्रित करू शकलो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अर्थातच या सगळ्या मंदिरांना वेगळीच झळाळी आलेली असते..किंबहुना देवींचे सजलेलं आणि मोहक रूप सुद्धा याच काळात आपल्याला पाहायला मिळते.

#चौल

दिवस सातवा : हिंगुळजा देवी 🪷व्हिडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://www.instagram.com/reel/DA4xFEjC...
09/10/2024

दिवस सातवा : हिंगुळजा देवी 🪷

व्हिडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DA4xFEjCNUa/?igsh=MWk1OG9oaTE0MjE2NA==

आत्तापर्यंतच्या व्हिडीओला येणाऱ्या likes, shares च्या रुपात मिळणाऱ्या आपल्या प्रतिसादावरून आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडतोय हे कळतं, तरीही तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही अधिक उत्सुक आहोत !

निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या माथ्यावर वसलेली आई हिगलाज माता अर्थात हिंगूळजा माता अलिबाग किंवा रायगड नव्हे तर महाराष्ट्रातल्या असंख्य भाविकांच श्रध्दास्थान आहे.

दिवस सातवा : हिंगुळजा देवी 🪷

चौल मधल्या कोणत्याही मंदिरापेक्षा हे मंदीर अधिक उंचावर आहे. तिथपर्यंत पोहचताना, तिथल्या आल्हाददायक निसर्गाचा.. आजूबाजूच्या हिरवळीचा आनंद घेत पायऱ्या चढत वर पोहचल की तीथल्या निसर्गरम्य वातावरणाने चढवाचा सगळा क्षीण कुठच्याकुठे पळून जातो. मंदिराचं वातावरण, समोरची दिपमाळ, त्रीशूल, तुळशीवृंदावन सगळंच प्रसन्न करणारं आहे. मंदिरात देवीची प्राचीन मुर्ती आहे, जागृत असणारी ही हिगलाज माता नवसाला पावते अशी भावीकांची श्रद्धा आहे.

व्हिडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DA4xFEjCNUa/?igsh=MWk1OG9oaTE0MjE2NA==

आत्तापर्यंतच्या व्हिडीओला येणाऱ्या likes, shares च्या रुपात मिळणाऱ्या आपल्या प्रतिसादावरून आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडतोय हे कळतं, तरीही तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही अधिक उत्सुक आहोत !

नवरात्र विशेष मालिकेतील आजचा सहावा दिवस !आज दर्शन घेणार आहोत, असंख्य भाविकांचे आस्थेचं प्रतीक आणि श्रद्धास्थान असलेल्या ...
08/10/2024

नवरात्र विशेष मालिकेतील आजचा सहावा दिवस !
आज दर्शन घेणार आहोत, असंख्य भाविकांचे आस्थेचं प्रतीक आणि श्रद्धास्थान असलेल्या आई शितला देवीच 🌺

Fridayfilms Production

भाविकांच्या प्रचंड श्रध्देच असं चौल मधलं आणखीन एक जागृत देवस्थान म्हणजे शितला देवी माता मंदिर !

दिवस सहावा : शितला देवी 🌺

गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे सुंदर मंदिर उभारलंय. मंदिराबाहेरच स्थानिक विक्रेत्यांकडून देवीच्या ओटीला लागणारं सामान, परीसरातली खास ताजी फुलं, चौलची प्रसिध्द चिक्की नारळीपाक सगळं इथे मिळतं. मंदिरात प्रवेश करताचं कम्मालीच प्रसन्न वाटतं.
गाभाऱ्यातला देवीचा चांदीचा मुखवटा लक्ष वेढून घेतो. प्रदक्षीणा मारताना गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला कौल लावण्याचीही इथे प्रथा आहे. मंदिराबाहेर गुलमादेवी, खोकलूदेवी, खरजूदेवीच्या पाषाण मुर्ती आहेत ज्याला गुळ, आलं आणि खजूर असा नैवद्य दाखवला जातो. नवरीत्रोत्सव आणि गोपीळकाला हे सण इथे विशेष साजरे केले जातात याशीवाय वर्षभर इथे येणाऱ्या भावीकांची गर्दी दिसून येते !

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DA2MiV9CXCo/?igsh=Mm54YzZ3anAzbmJr

पुर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.https://www.instagram.com/reel/DAxBpEmqIs6/?igsh=MXU3a3hrMmc2Z...
06/10/2024

पुर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DAxBpEmqIs6/?igsh=MXU3a3hrMmc2Z2xkNQ==

चौल विशेष मालिकेतला आजचा भाग, आजची reel कशी वाटली ते comment नक्की सांगा !!

Fridayfilms Production

"नवदुर्गा" या आपल्या नवरात्र उत्सवाच्या विशेष मालिकेतला आजचा चौथा दिवस, आणि आज आपण दर्शन घेणार आहोत गोलबा देवीचं.

दिवस चौथा : गोलबादेवी 🍁

या मंदिराची पुर्नबांधणी २०१९ मध्ये झाल्यामुळे मंदिराची वास्तू ही नवीच वाटते. पांढऱ्याशुभ्र वस्त्रातली देवीची मुर्ती पाहीली की मन अगदी प्रसन्न होतं. पुजना साठी इथे मुर्तीसोबतच देवीचा धातूचा मुखवटा आणि काही शिळा सुध्दा पहायला मिळतात.
भक्तिमय वातावराणासोबत चौलमधली शांतता ही या मंदिरात निवांतपणे अनुभवता येत !

पुर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DAxBpEmqIs6/?igsh=MXU3a3hrMmc2Z2xkNQ==

चौल विशेष मालिकेतला आजचा भाग, आजची reel कशी वाटली ते comment नक्की सांगा !!

दिवस तिसरा : देवी कृष्णाई 🏵️
05/10/2024

दिवस तिसरा : देवी कृष्णाई 🏵️

चौल गावाच्या वेशीवर आलं की सगळ्यात पहिल मंदीर आपल्या नजरेस पडतं, ते म्हणजे कृष्णाई मातेच्या मंदिराची छोटीशी पण लोभस वास्तू !

दिवस तिसरा : देवी कृष्णाई 🏵️

अगदी मुख्य रस्त्यालगतच्या कोपऱ्यात असाणारं हे छोटंसं मंदिर, बाजूलाच असणाऱ्या हिरव्यागार डोंगरामुळे पटकन भुरळ पाडतं. मंदिरातली देवीची मुर्ती ही दगडाची असून संगमरवरी चौथऱ्यावर स्थापित आहे. नवरात्रीत देवीसमोर भजन किर्तन तसेच आईच्या जागराचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात.

ज्यांनी ज्यांनी चौल गावातील ही पुरातन देवळ बघितली नाहीयेत, त्याच्यासाठी खास ही Special Reel Series आम्ही बनवली आहे. जास्तीत जास्त भाविक इथे दर्शनाला इकडची शांतता अनुभवायला यावीत, जेणेकरून चौलच किंबहुना अलिबागच्या पर्यटनाला आणखी चालना मिळेल.

उद्देश आणि उपक्रम आवडला असेल तर व्हिडीओ like आणि share नक्की करा !!!

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील link वर click करा.
https://www.instagram.com/reel/DAuee-GiixF/?igsh=MWVoMHNhMHNrZXYyMw==

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अलिबाग आणि अलिबाग आजूबाजूच्या गावातल्या छोट्या मोठया दुकानदार, व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी.. आ...
23/08/2024

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अलिबाग आणि अलिबाग आजूबाजूच्या गावातल्या छोट्या मोठया दुकानदार, व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी.. आता तुमच्या व्यवसायाची व्हिडियो जाहिरात करा तुमच्या बजेट मध्ये !

तेव्हा दिलेल्या नंबर वर लग्गेच कॉल करा आणि social media वर आपला business viral करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचा !!

गणपती बाप्पा मोरया !!! 🌺

कामिका एकादशी | ३१ जुलै २०२४स्थळ : Shree Tirupati Balaji Mandir Alibag
31/07/2024

कामिका एकादशी | ३१ जुलै २०२४
स्थळ : Shree Tirupati Balaji Mandir Alibag

अलिबाग आणि आजूबाजूच्या गावांमधील इच्छुक आणि उदयोन्मुख रंगकर्मींसाठी त्यांच्या हक्काचा रंगमंच.. विजयश्री!राज्यस्तरीय एकपा...
28/01/2024

अलिबाग आणि आजूबाजूच्या गावांमधील इच्छुक आणि उदयोन्मुख रंगकर्मींसाठी त्यांच्या हक्काचा रंगमंच.. विजयश्री!

राज्यस्तरीय एकपात्री आणि द्वीपात्री अभिनय स्पर्धा (वर्ष सातवे)
स्पर्धेबद्दलची सगळी माहिती Vijayshree Alibag - विजयश्री अलिबाग किंवा Fridayfilms Production या पेजेसवर उपलब्ध होईल.

नक्की सहभागी व्हा !!!

हे मंदिर तूम्ही पाहिलंय का?हे आहे रामनाथ-अलिबाग मधील "राममंदिर" !कान्होजी आंग्रे यांच्या काळातील हे मंदिर साधारणपणे २३० ...
22/01/2024

हे मंदिर तूम्ही पाहिलंय का?

हे आहे रामनाथ-अलिबाग मधील "राममंदिर" !

कान्होजी आंग्रे यांच्या काळातील हे मंदिर साधारणपणे २३० वर्षापेक्षाही जुनं आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे अलिबाग मधील पुरातन मंदिर आज भरजरी वस्त्र नेसल्यासारखं वाटतं होतं.
मंदिरात गेल्यावर लक्षात येतं, आधुनिकतेच्या या युगात जुनेजाणतेपणाचा आब आणि बाज राखत मंदिर स्वतःचीच एक वेगळी ओळख पटवून देतं.

अगदी काही महिन्यापूर्वी पर्यंत इथे आजूबाजूला वाढलेली झाडी आणि नकळतपणे का होईना, या वास्तू कडे झालेलं दुर्लक्ष.. यामुळे इथे तेव्हढी रेलचेल होतं नव्हती, पण आजच्या अयोध्येतील रमलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचं औचित्य किंबहूना निमित्त साधून या देखण्या आणि पुरातन मंदिराच रुपंड पालटलेलं आज पाहायला मिळालं आणि खूप बरं वाटलं !!

अलिबागमधील लोकांना ही माहिती असण्याची शक्यता आहे, पण ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्यासाठी.. आज नाही जमलं तरी, एकदा नक्की जाऊन या !!!

Post and photo credit : Kiran Vijay Sashte

15/01/2024

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या स्पर्धक कलाकारांनी "मोठी" केलेली, त्यांच्या हक्काची स्पर्धा.. विजयश्री !
स्पर्धेच्या यशाचा हा उंच उडणारा पतंग असाच आसमंतात विहरत राहो आणि स्पर्धक - प्रेक्षकांसोबत असलेल्या आमच्या नात्यामधली ही गोडी तीळगुळाच्या गोडव्या प्रमाणे वाढत राहो हीच ईच्छा !!

सर्व स्पर्धक व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा !!!
#मकरसंक्रांत



Fridayfilms Production
Fridayfilms Pro

12/01/2024

महाराष्ट्रातील कलाकारांच्या "हक्काची", रायगड जिल्ह्यातली "मानाची", अलिबाग तालुक्यातील "एकमेव" अभिनय स्पर्धा.. यशस्वी सातवे वर्ष !

२० फेब्रुवारी २०२४ | अलिबाग

प्रवेश प्रक्रिया सुरू !

10/01/2024

🎭 विजयश्री २०२४ 🏆

ज्येष्ठ नाट्यलेखक व दिग्दर्शक कै. विजय(दादा) बारसे यांच्या स्मृतींस अर्पण, फ्रायडेफिल्म्स अलिबाग आयोजित.. राज्यस्तरीय एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा.

२० फेब्रुवारी २०२४ | अलिबाग

विजयश्री २०२४ | राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा | अलिबागFollow for more details : Fridayfilms Production
06/01/2024

विजयश्री २०२४ | राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा | अलिबाग

Follow for more details : Fridayfilms Production

महाराष्ट्रातील कलाकारांच्या "हक्काची",
रायगड जिल्ह्यातली "मानाची" अशी
अलिबाग तालुक्यातील "एकमेव" अभिनय स्पर्धा !

"विजयश्री २०२४ - वर्ष सातवे"
राज्यस्तरीय एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा

आपली तारीख fix आहे, २० फेब्रुवारी
तेव्हा चला, लागा तयारीला...

नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आमच्या याच फेसबुक पेज सोबत जोडलेले रहा, भेटूया !!!

आजपासून.. लहान मुलांसाठी अभिनयाची ओळख कार्यशाळा !संपर्क : 7666 11 5726Actory Fridayfilms Production
01/05/2023

आजपासून.. लहान मुलांसाठी अभिनयाची ओळख कार्यशाळा !

संपर्क : 7666 11 5726

Actory
Fridayfilms Production

आजपासून ! 🎭🙏

ज्यांना हे workshop attend करायची इच्छा आहे, पण अजूनही प्रवेश घेतला नसेल त्यांनी दुपारी २.०० वां परस्पर हॉल वर आलात तरी चालेल.

Fridayfilms Production | Fridayfilms Pro

Address

Alibag
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when What's up अलिबाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share