Alibag Reporter Weekly

05/10/2024

अलिबाग शितोळे आळी मध्ये होतोय मरुआई देवीचा जागर !

21/08/2024

अलिबाग नगरपरिषदेचा सीसीटिव्ही घोटाळा. तक्रारदार संजय सावंत यांची "नवराष्ट्र" न्युजला दिलेली प्रतिक्रिया

17/06/2024

https://www.facebook.com/share/v/PDCsbHa47mQMC4FK/?mibextid=oFDknk

*जीव वाचवण्यासाठीच जीव धोक्यात घालण्याची रायगडकरांवर वेळ |*

MaxMaharashtra



*जीव वाचवण्यासाठी जीव धोक्यात का घालावा लागतोय रायगडच्या नागरिकांना, जाणून घ्या धम्मशील सावंत यांच्या या विशेष रिपोर्टमधून*

04/01/2024
02/01/2024

अलिबाग नगरपरिषदेचा अर्धवट कारभार.
ब्राम्हण आळी राममंदिरा समोरील गटारे अपूर्णच.
नागरीकांचे आरोग्य धोक्यात……
अलिबाग - ( संजय सावंत) नगरपरिषद अलिबाग यांच्या मार्फत सुरू असलेले अलिबाग ब्राम्हण आळी राममंदिरा समोरील गटाराचे काम गेले तीन महिने सुरू असून ते अर्धवट ठेवल्याने लगतच्या रस्त्यावर अपघात तसेच सांडपाण्यामुले डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. परिसरातील नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. अर्धवट बांधलेल्या गटारांवर झाकणे नीट लावली नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. छोटे मोठे अपघात होणे नित्याचे झाले आहे.
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत भूमिगत गटाराची योजना अलिबाग शहरात राबवली जाणार होती; परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प अपयशी ठरला. आता पुन्हा राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत नव्याने भूमिगत गटार योजना राबवली जाणार आहे. ८५ कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अलिबाग शहराची भौगोलिक रचना बशीसारखी आहे. खोदाई केल्यावर पाणी लागते. त्यामुळे हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच होरिझोन्टल डायरेक्शनल ड्रीलिंग या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. कमीत कमी उत्खनन असणार आहे. टेक्नॉलॉजीमार्फत भुयारी गटारासाठी नवीन प्रयोग राबवला जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे, असे असताना हा अर्धवट गटारांचा घाट ठेकेदारांना पोसण्यासाठी घातला आहे का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी विचारला आहे.

*शालेय शिक्षक झाला शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाचा सेवक*                                                                ...
05/12/2023

*शालेय शिक्षक झाला शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाचा सेवक*
*बातमीसाठी* 👇 *क्लिक* करा https://www.mymahanagar.com/raigarh/a-school-teacher-became-a-servant-of-the-education-ministers-office/676719/ •••••••••••••••••••••••••••••••••••••
आपल्या बातम्या,आतल्या बातम्या
*दैनिक आपलं महानगर*
*visit Web-mymahanagar*
✓आपलं महानगर-जिल्हा आवृत्ती✓
*१.मुंबई २.ठाणे ३.रायगड नवी मुंबई ४.नाशिक ५.पालघर*

जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्या तंबीनंतर जलजीवनच्या ठेकेदारांची तारांबळ.जलजिवनची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशास...
02/11/2023

जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्या तंबीनंतर जलजीवनच्या ठेकेदारांची तारांबळ.
जलजिवनची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशासनाचे जोरदार प्रयत्न.
अलिबाग - रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्यासोबत जलजिवन बाबत आढावा बैठक घेवून कडक कारवाईची तंबी दिल्यानंतर अधिका-यांसह ठेकेदारही ताळयावर आले असून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू झाली आहे.
चालु योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशासन प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रीया कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार ४२२ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत, या योजनांचे काम २०२४ पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आतापर्यंत 95 योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच रायगडमध्ये जलजीवनचे दहा टक्केही काम पूर्ण नाही, आणि जिल्हा परिषद प्रशासन १४२२ पैकी ९५ योजना पूर्ण झाल्याचे कौतुक करीत असल्याची टीका अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली होती. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या संगनमताने करोडोंची आर.ए.बिल उचलणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून केंद्र सरकारच्या “ईडी” कडे फसवणुकीबद्दल तक्रार दाखल करण्यात अशी मागणीच सावंत यांनी शासनाकडे केली होती.
संजय सावंत यांनी यापूर्वीच केंद्र सरकारकडे रायगड जिल्हयातील जलजिवन योजनेमधील अनागोंदी कारभारा बाबत तक्रार केली होती. त्यानंतर केंद्र शासनाने रा.जि.प.कडून अहवाल मागविला होता. याबाबत राजिपच्या पाणीपुरवठा विभागाने सावंत यांना ऑक्टोबर 2023 अखेरचा रायगड जिल्हयाचा प्रगती अहवाल माहितीसाठी दिला आहे.
ऑक्टोबर 2023 अखेरचा रायगड जलजिवन योजनेचा प्रगती अहवाल.
तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना
रायगड जिल्ह्यात अलिबाग मधील 8 योजना पूर्ण यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 10, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 22, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 50 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 26 , कर्जत 6 योजना पूर्ण यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 14, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 35, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 33 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 33 , महाड ४ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 48, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 31, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 41 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 16 , माणगाव 2१ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 6, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 46, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 29 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 42 ,म्हसळा 7 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 8, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 17, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 15 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 10 , मुरूड ७ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 7, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 9, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 8 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 27 , खालापरू 0 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 25, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 49, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 8 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6 ,पनवेल १ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 40, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 47, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 21 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 10 ,पेण 9 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 25, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 14, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 27 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 29 , पोलादपूर १3 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 4, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 36, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 20 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6 , रोहा 8 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 28, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 22, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 38 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 45 , श्रीवर्धन १4 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 8, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 13, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 15 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 7 , सुधागड १० यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 6, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 37, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 26 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6 , तळा 4 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 5, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 11, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 12 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 18 , उरण १ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 12, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 5, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 2 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना अशा एकूण 113 योजना पूर्ण झाल्या आहेतयासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 246, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 394, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 345 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 272 अशा प्रकारे एकूण 1257 योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याचा अहवाल रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संजय सावंत यांना दिला आहे.
113 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीनंतर कामांना वेग आला आहे. पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना ठेकेदार-अधिकारी यांना दिल्या आहेतयोजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत.
संजय वेंगुर्लेकर
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,रायगड जिल्हा परिषद.
Collector Raigad

02/10/2023

खबर अलिबागच्या "व्हॉट्स ॲप चॅनल"ला खालील लिंकद्वारे फॉलो करा - संपादक - संजय प्रभावती गंगाराम सावंत.
Follow the Khabar Alibag channel on WhatsApp:

रायगडसाठी ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा पुरवठा सारख्या प्रमाणात करा;  ऍड. प्रविण ठाकूर यांची मागणी https://public.app/s/Ed5...
17/04/2021

रायगडसाठी ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा पुरवठा सारख्या प्रमाणात करा; ऍड. प्रविण ठाकूर यांची मागणी https://public.app/s/Ed57d

रायगडसाठी ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा  पुरवठा सारख्या प्रमाणात करा - ऍड.प्रविण ठाकूर यांची मागणी.          95 टक्के पुरवठ...
16/04/2021

रायगडसाठी ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा पुरवठा सारख्या प्रमाणात करा - ऍड.प्रविण ठाकूर यांची मागणी.


95 टक्के पुरवठा पनवेल,नवी मुंबईसाठी तर उर्वरीत रायगडसाठी फक्त 5 टक्के पुरवठा होत असल्याची बाब उघड.
अलिबाग - (संजय सावंत) ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा रायगड जिल्हयासाठी जो पुरवठा होतो त्यामधील 95 टक्के साठा पनवेल व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात होतो व उर्वरीत फक्त 5 टक्के साठा इतर जिल्यासाठी होतो अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे उर्वरित रायगड जिल्हयासाठीही योग्य प्रमाणात ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा पुरवठा होणे अत्यंत निकडीचे असल्याने रायगडच्या पालकंत्री आदितीताई तटकरे यांनी उर्वरित रायगड जिल्हयासाठीही योग्य प्रमाणात ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा पुरवठा होणेबाबत जिल्हाधिकारी रायगड यांना आवश्यक त्या कार्यवाहीचे आदेश दयावेत अशी मागणी काॅंग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ऍड.प्रविण ठाकूर यांनी केली आहे.
रायगडच्या पालकंत्री आदितीताई तटकरे यांना लिहीलेल्या पत्रामध्ये ऍड.प्रविण ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका तसेच नवी मुंबई क्षेत्रामध्ये रूग्णसंख्या अधिक आहे हे मान्य केले तरी उर्वरित रायगड जिल्हयामध्येही रूग्णसंख्या मोठया प्रमाणावर वाढत असल्याने योग्य प्रमाणात ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा पुरवठा होणे अत्यंत निकडीचे असल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही शेकडोंवरून हजारांवर आणि आता लाखांमध्ये पोहचली आहे. रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवते आहे. या कमतरतेबरोबरचं ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवतोय.
महाराष्ट्र नोंदणीकृत औषध विक्रेते संघटनेचे (एमआरपीएस) जिल्हा संघटक यांच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणा-या कंपन्यांकडून पुरवठा होत नाही. त्यांना सरकारने रायगड जिल्ह्यासाठी कमी किमतीत रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्त केलंय. पण त्यांच्याकडे इंजेक्शनचा पुरवठाच होत नाहीये. जिथे 500 इंजेक्शनची मागणी आहे तिथे दोन दिवसाला 60-70 इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. काही कंपन्या या खासगी रुग्णालयांना पुरवठा करत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे काळा बाजार होतोय.या सर्व बाबी लक्षात घेता पालकमंत्री आदितीताई तटकरे या बाबत लक्ष देवून तात्काळ कार्यवाही करतील अशी आशा ऍड.प्रविण ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

Address

Alibag
402 201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alibag Reporter Weekly posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category