12/06/2025
प्रतीक जोशी हे गेली सहा वर्षे लंडनमध्ये स्थायिक झाले होते. एक यशस्वी सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभं केलं होतं.
भारतात राहणाऱ्या आपल्या पत्नी आणि तीन लहान मुलांना लवकरच लंडनमध्ये आणून, सर्वांनी एकत्र नवीन आयुष्याला सुरूवात करायचं त्यांचं स्वप्न होतं. या स्वप्नासाठी त्यांनी वर्षानुवर्षे संयम, नियोजन आणि अथक परिश्रम केले.
फक्त दोन दिवसांपूर्वी, त्यांच्या पत्नी डॉ.कोमी व्यास या एक कुशल वैद्यकीय व्यावसायिक. यांनी आपल्या भारतातील नोकरीचा राजीनामा दिला. बॅगा भरल्या गेल्या, नातेवाईकांना निरोप दिला गेला, आणि मनात उत्साहाचे आणि अपेक्षांचे वादळ घेऊन, संपूर्ण कुटुंब एअर इंडिया फ्लाइट १७१ मध्ये लंडनकडे रवाना झालं.
त्यांनी विमानात बसल्यावर एक आनंदाने भरलेला सेल्फी काढला, कुटुंबीयांना पाठवला. तोच सेल्फी त्यांच्या एकत्रित शेवटच्या क्षणांचा साक्षीदार ठरला.
कारण, त्या फ्लाइटचा अपघात झाला. एक प्रवासी अत्यंत आश्चर्यकारकरित्या वाचला. याच जन्मी काही सेकंदांनी त्याचा पुनर्जन्म झाला असंच म्हणायला हवं.
प्रतीक, कोमी आणि त्यांच्या तीन निष्पाप मुलांचं आयुष्य एका क्षणात संपलं. जे स्वप्न त्यांनी उभं केलं होतं. तेच त्यांचं अंतिम पडाव ठरलं.
या भीषण दुर्घटनेने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या सर्व नागरिकांना मनापासून श्रद्धांजली.
आपल्या प्रार्थनांतून आपण त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशीच विनम्र भावना बाळगूया...
(माहिती साभार सोशल मीडिया)