URUJ NEWS.

URUJ NEWS. News paper

चवीची जादू की आरोग्याला धोका? रेस्टॉरंट्समधील 'टेस्टिंग पावडर'चे सत्यआजकाल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील जेवण आपल्याला घरी...
16/09/2025

चवीची जादू की आरोग्याला धोका? रेस्टॉरंट्समधील 'टेस्टिंग पावडर'चे सत्य

आजकाल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील जेवण आपल्याला घरी बनवलेल्या जेवणापेक्षा अधिक चविष्ट का वाटतं? याचं एक मोठं कारण म्हणजे 'टेस्टिंग पावडर', ज्याला आपण अजिनोमोटो किंवा मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) असंही म्हणतो. ही एक अशी पांढरी पावडर आहे, जी पदार्थांची चव अनेक पटींनी वाढवते. पण चवीच्या या जादूच्या मागे आरोग्यासाठी काही धोके दडलेले आहेत का?
अजिनोमोटो म्हणजे काय?
अजिनोमोटो हे एक रासायनिक नाव असून, ते ग्लुटामिक ॲसिडचं सोडियम मीठ (sodium salt) आहे. ग्लुटामिक ॲसिड हे एक नैसर्गिक अमिनो ॲसिड असून ते टोमॅटो, मशरूम, चीज आणि सोया सॉससारख्या पदार्थांमध्ये आढळतं. अजिनोमोटो ही नैसर्गिक नाही, पण ती या नैसर्गिक पदार्थांचीच चव कृत्रिमरित्या तयार करते.
ही पावडर पदार्थांना एक विशिष्ट ‘उमामी’ (Umami) चव देते. उमामी ही गोड, आंबट, खारट आणि कडू या चार मूलभूत चवींनंतरची पाचवी चव मानली जाते. यामुळेच चायनीज, थाई आणि इतर अनेक पदार्थांची चव अधिक आकर्षक आणि ‘जिभेवर रेंगाळणारी’ बनते. म्हणूनच, अनेक मोठे शेफ आणि रेस्टॉरंट्स याचा वापर करतात.
आरोग्याला धोका आहे का?
जगभरातील अन्न आणि औषध प्रशासन (FDA) सारख्या संस्थांनी एम.एस.जी.ला ‘सामान्यतः सुरक्षित’ (Generally Recognized As Safe - GRAS) मानलं आहे. पण तरीही, काही लोकांना त्याच्या अतिसेवनामुळे काही त्रास होऊ शकतो.
* चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम: हा एक सामान्य त्रास आहे. एम.एस.जी. असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यावर काही लोकांना डोकेदुखी, गरगरणे, घाम येणे, छातीत धडधडणे किंवा मानेमध्ये जडपणा जाणवतो.
* अस्थमा आणि ॲलर्जी: अस्थमा असलेल्या काही व्यक्तींमध्ये एम.एस.जी.मुळे श्वसनाचे त्रास वाढू शकतात. तसेच, काही लोकांना त्वचेवर पुरळ उठणे किंवा ॲलर्जीचा अनुभव येऊ शकतो.
* लठ्ठपणा: काही संशोधनानुसार, एम.एस.जी. भूक वाढवतो, ज्यामुळे माणूस जास्त खातो आणि वजन वाढू शकतं.
आपण काय काळजी घ्यावी?
अजिनोमोटो पूर्णपणे विषारी नाही, पण त्याचा अतिवापर टाळणे महत्त्वाचे आहे.
* घटकांची यादी तपासा: पॅकेज्ड फूड घेताना त्याच्या घटकांमध्ये ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ किंवा ‘MSG’ असे शब्द आहेत का ते तपासा.
* हॉटेलमध्ये विचारपूस करा: तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर, पदार्थांमध्ये अजिनोमोटोचा वापर केला आहे का, हे विचारू शकता.
* समतोल राखा: शक्यतो बाहेरचे जेवण कमी खा आणि घरगुती, नैसर्गिक आणि सात्विक पदार्थांना प्राधान्य द्या. यामुळे तुम्ही फक्त एम.एस.जी.च नाही, तर इतर अनेक हानिकारक पदार्थांपासूनही दूर राहाल.
थोडक्यात, अजिनोमोटो हा चवीला आकर्षक बनवणारा एक घटक आहे, पण आरोग्याच्या दृष्टीने त्याचा समतोल वापर आवश्यक आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य निर्णय घ्या.

15/09/2025

जायकवाडी आपातकालीन दरवाजेही उघडले..

13/09/2025

समाजवादी पार्टी आने वाले सभी इलेक्शन के लिये तयार.(अँड. शिवाजी कांबळे)

विशेष रेल्वे...
13/09/2025

विशेष रेल्वे...

Gold Rate...
13/09/2025

Gold Rate...

Limited seats available.Book know...👇
11/09/2025

Limited seats available.
Book know...👇

सर्व सन्माननीय वीजग्राहकांना कळविण्यात येते की उद्या दि. १२/०९/२०२५ वार शुक्रवार  रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 या वेळ...
11/09/2025

सर्व सन्माननीय वीजग्राहकांना कळविण्यात येते की उद्या दि. १२/०९/२०२५ वार शुक्रवार रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 या वेळेत DPDC अंतर्गत 33 के.व्ही. अंबाजोगाई वाहिनीच्या शिफ्टिंगच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे सदर ठिकाणी 11 के.व्ही. योगेश्वरी फिडर जवळ असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक अंतर राखून हे काम केले जाणार आहे.त्यामुळे 11 के.व्ही. योगेश्वरी फिडरवरील विद्युत पुरवठा दिनांक १२/०९/२०२५ रोजी वरील वेळेत बंद राहणार आहे.
त्यामुळे मिल्लत नगर, गणेश नगर,रिंग रोड, छत्रपती चौक, योगेश्वरी नगरी,तथागत चौक, मानवलोक, रणजित नगर, आनंद नगर, विठ्ठल रुक्माई मंदिर परिसर व ग्रामीण भागातील या फीडर वरील सर्व ग्राहक या भागातील विद्युत पुरवठा बंद राहिल याची नोंद सर्व ग्राहकांनी घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे.
हि नंम्र विनंती......!

टिप:- जर पाऊस आला तर वेळेत व तारखेत बदल होऊ शकतो🙏🙏 याची नोंद सर्व सन्माननीय ग्राहकांनी घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे.

महावितरण
अंबाजोगाई उपविभाग

*महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या तज्ज्ञ अभ्यास समिती मंडळावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची निवड**_डॉ.र...
11/09/2025

*महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या तज्ज्ञ अभ्यास समिती मंडळावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची निवड*

*_डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत_*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या तज्ज्ञ अभ्यास समिती मंडळावर अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची निवड झाली आहे. डॉ.इंगोले यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अर्थात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही नोंदणीकृत डॉक्टरांसाठीची सरकार नियुक्त समिती आहे. या समितीद्वारे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्सला अधिकृत मान्यता देणे तसेच दवाखाने व वैद्यकीय आस्थापना यांना मान्यता देणे किंवा नाही देणे याविषयी ही समिती कार्य करते. महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय आस्थापनांवर महाराष्ट्र शासन या समितीद्वारे नियंत्रण ठेवते. वैद्यकीय उपचार करताना डॉक्टर व रूग्णालयाद्वारे योग्य प्रकारचा उपचार झाला आहे किंवा नाही, यामध्ये कुठे निष्काळजीपणा झाला आहे का..? याच्या पडताळणी करिता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची राज्य सरकार द्वारा नियुक्त ही समिती असते. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध डॉक्टर्स व रूग्णालयांद्वारे झालेल्या मेडिकल निगलिजन्स केसेस या समितीद्वारे योग्य आहेत किंवा नाहीत याविषयी निर्णय घेतला जातो. त्यानुसार शासन गुन्ह्याचे स्वरूप ठरवून त्यावर डॉक्टर्स किंवा रुग्णालय प्रशासनावर कार्यवाही करते. घटनात्मकरित्या ही समिती अत्यंत जबाबदारीची व महत्त्वाची आहे. अशा महत्त्वाच्या समितीवर अंबाजोगाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची निवड झाली आहे ही तमाम अंबाजोगाईकरांच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची गोष्ट आहे असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. डॉ.इंगोले यांचे मनोविकृतीशास्त्रातील आतापर्यंतचे योगदान, सामाजिक कार्यातील सहभाग व विविध शासकीय समित्यांवर विविध पदावर कार्य केल्याची नोंद महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने घेत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या मेडिकल निगलिजन्स केसेसच्या स्क्रुटिनायझिंग कमिटीवर केली आहे. डॉ.इंगोले हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. विविध क्षेत्रात ते उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अंबाजोगाईतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी तसेच सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील विविध मित्र मंडळींनी आनंद व्यक्त करीत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

माजलगांव ग्रामीण रुग्णालय मध्ये डोस देताना बाळाच्या मांडीत सुई खुडली तरी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व सिस्टर यांना  बडतर्...
08/09/2025

माजलगांव ग्रामीण रुग्णालय मध्ये डोस देताना बाळाच्या मांडीत सुई खुडली तरी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व सिस्टर यांना बडतर्फ करा. मुस्ताक कुरेशी.

माजलगांव. माजलगांव ग्रामीण रुग्णालय येथे प्रसूती झाल्यानंतर बाळाला वेळोवेळी डोस द्यावे लागतात. यासाठी पालक विशेष काळजी घेवून ज्यादिवशी शासकीय रुग्णालयात डोस दिले जाते त्यादिवशी खास करून बाळाला शासकीय रुग्णालयात घेवून जावून डोस देतात. तब्बल सहा महिन्यांपूर्वी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बाळाला डोस द्यायला बाळाला गेल्यानंतर उपस्थित परिचारिकांनी बाळाच्या मांडीत डोस दिले. डोस दिल्यानंतर बाळ घरी गेल्यावर रडत होते. नेमका त्याला काय त्रास आहे? हे पालकांना समजून येत नव्हते. बाळ सारखे मांडीला हात लावून आपल्या वेदना सांगण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी ज्याठिकाणी डोस देण्यात आले त्याठिकाणी एक गाठ निर्माण झाली, ती गाठ नेमकी कशाची आहे? यासाठी पालक वारंवार रुग्णालयात जावू लागते. त्यानंतर ती गाठ कशाची आहे पाहण्यासाठी शेवटी बाळाच्या मांडीचा तब्बल सहा महिन्यानंतर दिड इंच लांब सुई काढण्यात आली

डोस दिल्यानंतर बाळाच्या मांडीला सुरुवातीला एक गाठ आली. ती गाठ डोस दिल्यानंतर आली असल्याचा पालकांना संशय होता. तरीही पालक वारंवार रुग्णालयात जावून ती गाठ कशाची आहे यामुळे चिंतेत होते. शेवटी एक्सरेमध्ये त्या गाठीत सुई असल्याचे दिसून आले. तब्बल सहा महिन्यानंतर सुई असल्याची माहिती मिळाली. शेवटी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या सतर्कतेने बाळाची सुई काढण्यात आली. तब्बल सहा महिन्यानंतर ही शस्त्रक्रिया झाली. पालकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे भरभरून आभार मानले. दरम्यान माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तब्बल सहा महिने बाळाला त्रास सहन करावा लागला तर पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. यासाठी संबंधितांवर हलगर्जी पणा करणाऱ्या डॉक्टर व नर्स यांची सखोल चौकशी करण्यात यावी .
माजलगांव ग्रामीण रुग्णालय मध्ये डोस देताना दुर्लक्ष करणाऱ्या नर्स व डॉक्टरांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी ‌.

माजलगांव ग्रामीण रुग्णालय मध्ये डोस देताना बाळाच्या मांडीत सुई तुटून राहीले तरीही दुर्लक्ष करणाऱ्या नर्स व डॉक्टरांची सखोल चौकशी करून बडतर्फ करण्यात यावे.अशी मागणी महाराष्ट्र युवक प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष मुस्ताक कुरेशी यांनी केली.

Address

Sadar Bazar
Ambajogai
431517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when URUJ NEWS. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share