19/07/2025
अंबाजोगाई :- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,येडेश्वरी फाऊंडेशन आणि आलिम्को यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंचायत समिती कार्यालय,अंबाजोगाई येथे “दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधन मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर”संपन्न झाले.
यावेळी माजी आमदार श्री. पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख ,गटविकास अधिकारी श्रीमती. दिवाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.लोमटे यांचेसह “अलिम्को” संस्थेची संपूर्ण टीम उपस्थित होती.