24/10/2025
सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय..
1 नोव्हेंबर माझा वाढदिवस, खरं तर मागील अनेक वर्षांपासून खरंतर वाढदिवस साजरा करता आलाच नाही त्याला कारणही वेगवेगळे होती मात्र यावेळी वाढदिवस साजरा करणार आहे तो 3 नोव्हेंबर 2025 रोजी मराठवाड्यातील पूरग्रस्त जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत.. खरंतर दिवाळी अगोदरच धाराशिवाय लातूर जिल्ह्यातील मुलांना स्कूल बॅग भेटवस्तू म्हणून द्यायच्या होत्या परंतु दिवाळीची लगबग आणि शाळांना असलेल्या सुट्या हे पाहता हा उपक्रम आम्ही पुढे ढकलला आता 3 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होत आहेत म्हणून आम्ही 2 नोव्हेंबर रोजी रात्री मुक्कामाला लातूरला जाणार आहोत...
3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी लातूर मधील जिल्हापरिषद शाळांमध्ये बॅग वाटप करून तिथून धाराशिवमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना बॅग देऊन पुन्हा 3 नोव्हेंबर रोजी रात्री मुंबईला परतीचा प्रवास करण्याचा आमचा माणसं आहे.. सदर उपक्रमामध्ये Lokshakti Foundation, CA अनिल फरकांडे - सोमवंशी, राहुल मते आणि मित्र मंडळ - भोजदरी - पुणे, उद्योजक विलास डोंगरे, विजय अहिरे, हेमंत देसाई, सौरभ शिंदे नवी मुंबई शहरातील माजी नगरसेविका सायली नारायण शिंदे, नांदूर पठार ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ, आदींनी मोठ्या प्रमाणात हातभार लावला.. सदर उपक्रमामध्ये ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी अवश्य सोबत चला...
- विनोद लक्ष्मण पोखरकर
अध्यक्ष - लोकशक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र
शेती, माती आणि संस्कृतीशी नाळ जुळलेला एक मराठा